पोटाची चरबी वाढण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

पोटाची चरबी वाढण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

आपण नेहमी आजूबाजूला पाहतो की, पोटाची चरबी वाढत आहे अशा अनेकांच्या तक्रारी असतात. तुमचं वजन कधी कसं वाढतं आणि अचानक तुमचं पोट कधी आणि कसं मोठं दिसायला लागतं याची तुम्हाला कल्पनाही येत नाही. भाजी खाल्ल्याने वजन वाढतं का असाही प्रश्न अशावेळी पडतो. तर याचं उत्तर हो आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. तुम्हाला पोटात चरबी वाढण्याची नक्की कारणं काय आहेत याची कल्पना आहे का? चरबी वाढताना पटकन वाढते पण ती कमी होताना मात्र आपली हालत खराब होत असते. त्यासाठी अनेक प्रकारचं डाएट, व्यायाम हे सगळं करताना नाकी नाऊ येतात. पण हे सगळं करण्याआधी तुम्ही तुमच्या आहारावरच नीट नियंत्रण आणलं तर चरबी जमा होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आपल्या आहारात काय असून नये आणि नक्की कोणत्या भाज्यांमुळे आपल्या पोटातील चरबी वाढते ते जाणून घेऊया. तुमच्या पोटातीलही चरबी वाढली असेल तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी नक्की या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला खरंच पोटातील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही बटाटा वेफर्स, फ्रेंच फ्राईज, कांद्याची भजी, ओनियन रिंग्ज, हिरवा टॉमेटो, तळलेले पदार्थ आणि तळलेल्या भाज्या खाणं बंद करायला हवं. कारण पोटात चरबी जमण्यासाठी या गोष्टी जास्त कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया कशामुळे वाढते पोटातील चरबी - 

1. पॅक करण्यात आलेलं सलाड

Shutterstock

तुम्हाला पोटातील चरबी कमी करायची असेल अथवा वजन लवकरात लवकर घटवायचे असेल तर तुम्ही पॅक्ड सलाड खाण्यापासून दूर राहा. पॅक करण्यात आलेलं सलाड तुमचं वजन तर वाढवतंच तसं तुम्हाला दुसऱ्या शारीरिक समस्यादेखील वाढवून देतं. पॅक करण्यात आलेल्या सलाडमध्ये अनेक प्रकारच्या भाजी असतात आणि ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त असल्याने तुमचं वजन पटकन वाढण्यास मदत होते. पॅक्ड केलेल्या भाज्या जास्त वेळ राहतात आणि चांगल्या असतात असं आपल्याला वाटतं पण तसं अजिबात नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊन पोटात चरबी जमण्यास अधिक मदत मिळते. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे याप्रकराचं सलाड खाण्याला जास्त प्राधान्य देण्यात येतं.  ते वेळीच बंद करायला हवं. 

बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

2. कोबीमुळे वाढतं वजन

Shutterstock

तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. गोबी, ब्रसेल्स स्प्राऊट्स आणि ब्रोकोलीसारख्या भाज्या या आपल्या शरीरात चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. काही प्रमाणात याचं सेवन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. पण अति प्रमाणात या भाजी खाल्ल्यास, तुमचं वजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही कोबीच्या भाजीपासून लांबच राहिलेलं चांगलं. बऱ्याचदा कोबी आपल्या प्रत्येकाच्या घरात किमान आठवड्यातून दोन वेळा असतो. पण पोटातील चरबी कमी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही कोबीपासून नक्कीच लांब राहा. 

शरीरातील चरबी होते व्यायामने कमी, कशी असते प्रक्रिया

3. मक्याचे दाणे

Shutterstock

बऱ्याच जणांना अगदी नाश्त्यामध्येही स्वीट कॉर्न अर्थात मक्याचे दाणे खाणं आवडतं. पण स्वीट कॉर्नमुळेही वजन वाढण्याची आणि चरबी निर्माण  होण्याची शक्यता असते. तुम्ही नेहमी ग्रील्ड बर्गरबरोबर मक्याचे दाणे आणि कोल्ड ड्रिंक असं कॉम्बिनेशन घेत असाल तर तुमच्या पोटातील चरबी वाढण्यासाठी याचा हातभार लागतो. स्वीट कॉर्नमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असतं. तसंच मक्याच्या या दाण्यांमुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. साखरेची पातळी वाढली की साहजिकच तुमच्या पोटातील चरबीदेखील वाढते आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ लागतो. त्यामुळे जर पोटातील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही मक्याचे दाणे सतत खाणं टाळायला हवं. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

4. बटाटा

Shutterstock

सर्वांनाच माहीत आहे की,  बटाट्यामध्ये आढळणाऱ्या कार्बोहाटड्रेट्समुळे आपलं वजन वाढतं. तसंच बटाटा पटकन पचत नाही. तो पोटात चरबी बनून राहतो. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर बटाट्याचं सेवन सोडून द्यायला हवं. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटप्रमाणेच स्टार्चचं प्रमाणदेखील अधिक असतं जे आपल्या शरीरातील चरबी वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे कोणत्याही भाजीत बटाटा घालून खाण्यापेक्षा नुसती भाजी खा. त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. 

या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे पोटातील चरबी वाढण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय फास्ट फूडचं सतत सेवन, कोल्ड ड्रिंक हे पदार्थदेखील तितकेच कारणीभूत आहेत. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी नक्की टाळा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.