sorry म्हणून वर्षाचा शेवट करा गोड.. नातेसंबंध टिकण्यास होईल मदत

sorry म्हणून वर्षाचा शेवट करा गोड.. नातेसंबंध टिकण्यास होईल मदत

चूक झाली तरीही कधी कधी sorry म्हणण्यासाठी अनेक जण खूप वेळ लावतात. योग्यवेळी sorry म्हटले नाही तर ती अढी मनात राहून जाते. खूप जणांना sorry म्हणायचं असतं पण ते त्यासाठी इतका वेळ काढतात की, त्यांच्या नात्यात कटुता कधी येते ते कळत नाही. तुमचंही असं sorry म्हणायचं राहून गेलं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या नव्या वर्षाची सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या वर्षाचा शेवट गोड करा.

#Lucky2020: कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार अप्रतिम वर्ष

Sorry बोलण्याने तुम्ही होणार नाही लहान

shutterstock

अनेकदा होतं असं की चूक असूनही आपण sorry बोलत नाही. कारण  sorry बोलण्यामुळे आपणच चुकीचे होते आणि समोरच्या व्यक्तीला आपली चूक कळली नाही असे अनेकांना वाटते. जर तुम्हीही हा विचार करत असाल तर आताच मनातून ही गोष्ट काढून टाका. तुमची चूक नसेल  पण तुमच्या sorry बोलण्याने तुमचे नाते टिकून राहात असेल तर मग तुम्ही sorry बोलायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात असून द्या. तुमच्या sorry बोलण्याने तुममही लहान होणार नाही तर महान होणार आहात. 

 

चूक तुझी ना माझी

कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात की, चूक कोणाची याचा निकालच लावता येत नाही. अशावेळी तुम्ही समोरचा माफी मागेल याची वाट पाहू नका. तुम्ही sorry बोलून विषय संपवून टाका. भांडणांना काही काळ झाल्यनंतर आपल्याला कधी कधी उगाच वाटत राहते की, चूक माझी होती का? मी सॉरी बोलायला हवे होते का? असे तुम्हालाही कधी वाटले असेल तर तुम्ही स्वत:हून sorry बोला. चूक कोणाची होती यावर वाद घालण्यापेक्षा वाद मिटणारा असा sorry शब्द बोला.

#Lucky2020: या राशीच्या लोकांनी कधीही करु नये संसार होतील हे त्रास

आयुष्यभर मनाला लागणार नाही कुणकुण

तुम्ही आजुबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहिली असतील जी केवळ योग्यवेळी भांडण न सोडवल्यामुळे खराब झाली आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे होऊ द्यायचे नसेल तर  मग तुम्ही आताच तुमच्यापासून दुरावलेल्या व्यक्तीला sorry म्हणा. कदाचित तुमचे नाते पुन्हा पूर्ववत होणार नाही. पण तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात असलेला गैरसमज थोड्याफार प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. 

नात्याची नवी सुरुवात

shutterstock

कधी कधी बिनसलेले नाते चांगले करण्यासाठी sorry हा शब्द पुरेसा असतो. तुम्ही कितीही चिडला असाल तरी तुम्हाला हा शब्द ऐकल्यानंतर तुमचा राग शांत होऊ शकतो. तुम्हाला नात्याची नवी सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला अगदी मनापासून sorry बोला. त्यांचा राग शांत करण्यास तुम्हाला मदत होईल. 


आता sorry या शब्दाचे फायदे ऐकल्यानंतर जर तुम्ही 2019 मध्ये कोणाचे मन दुखावले असेल तर त्याला योग्यवेळी sorry बोला.  कारण तुम्हाला नव्या वर्षात आनंदाने प्रवेश करायचा आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला दुखवले असेल तर त्याला आताच गाठा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

https://www.popxo.com/shop/zodiac-collection/