सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम

सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम

बहुतांश जणांचा कमरेखालील भागात अचानक तीव्र वेदना होऊ लागतात. थकवा किंवा अधिक काम केल्यानं वेदना होत असाव्यात, असा विचार करत ही लोक दुखण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. साधारण वाटणारे हे दुखणे सायटिका आजार असू  शकतो. सायटिकामध्ये कमरेखालील संपूर्ण भाग हळूहळू निकामी होऊ लागतो. योग्य वेळी यावर उपचार केल्यास होणारे गंभीर नुकसान टाळले जाऊ शकतात. 

सायटिका म्हणजे काय?

सायटिका मज्जातंतूमध्ये ही शरीरातील सर्वात मोठी मज्जातंतू आहे, जी कमरेखालील भागातून सुरू होऊन नितंबाद्वारे तुमच्या टाचांपर्यंत पोहोचते. यामुळेच सायटिका मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण झाल्यास कमेरखालील संपूर्ण भाग प्रभावित होतो. सुरुवातीला केवळ कमरेमध्ये वेदना जाणवतात. पण यानंतर होणाऱ्या वेदना असह्य ठरू शकतात. कमरेनंतर हळूहळू तुमचे नितंब (Hips) त्यानंतर पायापर्यंत दुखणे वाढत जाते. या समस्यांमुळे कमरेखालील भागात दुखण्याव्यतिरिक्त अशक्तपणा किंवा मुंग्या आल्यासारखं वाटू शकतं.तसंच दोन्ही पायांऐवजी एकाच पायात हा त्रास जाणवू शकतो. 

(वाचा : चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने)

सायाटिका होण्यामागील कारण

चुकीच्या पद्धतीनं उठण्याबसण्याच्या सवयीमुळे सायटिका मज्जातंतूवर दबाव येतो. 

- स्लिप्ड हर्निएटेड डिस्क (Slipped herniated disc)  

- स्पायनल स्टेनोसिस (पाठीच्या कण्याच्या नसेसंबंधित समस्या)

- पिरिफोर्मिस सिंड्रोम (नितंबातील पातळ स्नायूंची समस्या)

- पेल्विकला झालेली दुखापत किंवा फ्रॅक्चर  

- ट्युमर

(वाचा : उपवासात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या कारणे)

सायटिका आजाराची लक्षण

- कंबर, नितंब आणि पायांमध्ये हलक्या स्वरुपात दुखणे

- कमरेच्या तुलनेत पायांमध्ये अधिक वेदना होणे

- एकाच पायात तीव्र वेदना जाणवणे

- पायांसह पायांचीही बोटेही दुखणे 

- कंबर आणि पायांमध्ये मुंग्या येणे

- पायांमध्ये जीव नसल्याची जाणीव होणे

(वाचा : हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण 'या' दोन गोष्टी ठेवा लक्षात)

सायटिका आजारावर घरगुती उपाय

1. गरम-थंड पाण्याचा शेक
गरम किंवा थंड पाण्यात कापड भिजवा आणि पिळू घ्या. जेथे वेदना जाणवत आहेत त्या ठिकाणी काही वेळासाठी ओले कापड ठेवावे. पाच ते सहा मिनिट गरम किंवा थंड पाण्यानं शेक द्यावा. दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा. या उपचार पद्धतीमुळे तुम्हाला सायटिका मज्जातंतूला आलेली सूज तसंच सायटिकाच्या दुखाण्यातून आराम मिळतो.

2. हळद 
तिळाच्या तेलात हळद पावडर मिसळून पेस्ट तयार करावी. जो भाग दुखत आहे त्यावर ही पेस्ट लावून हलक्या हातानं मसाज करावा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. संशोधनानुसार, हळदीमध्ये दुखापत झालेल्या मज्जातंतूचं आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे.

3.कोरफड
कोरफडीच्या गरामध्ये एक कप पाणी घेऊन मिक्सरमध्ये वाटावे. एका ग्लासमध्ये तयार झालेल्या रसात लिंबू आणि मधाचा समावेश करावा आणि त्याचं सेवन करावे. तज्ज्ञांनुसार, कोरफडीच्या अर्कामध्ये मज्जातंतूचे दुखणे दूर करण्याची क्षमता आहे.
सायटिकाची ही लक्षण आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित आपल्या डॉक्टरांकडे जाऊन यावर योग्य त्या उपचार पद्धती सुरू कराव्यात. अन्यथा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.