गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात

गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात

गरम पाणी पिण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहिती आहेतच. सकाळच्या विधी सुरळीत होण्यासाठी, वजन घटवण्यापासून ते त्वचेच्या समस्यापर्यंत... आरोग्याच्या असंख्य समस्यांपासून क्षणात आराम मिळावा यासाठी बहुतांश जण दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात. पण गरम पाणी प्यायल्यानं शरीरावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या गोष्टीचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्यापासून होणाऱ्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं आणि हिच बाब गरम पाणी पिण्यासंदर्भातही लागू होते. आवश्यकतेनुसार गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास त्याचे फायदे होण्याऐवजी आरोग्यास नुकसान पोहोचू शकतात.   

गरम पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या :

शरीराच्या आतील अवयवांचं नुकसान

गरम पाणी अधिक प्रमाणात प्यायल्यास तोंडाचा अल्सर, जळजळ होऊ शकते. शरीराचा संवेदनशील भाग असलेल्या पचनप्रक्रियेवर सर्वाधिक दुष्परिणाम होतो. गरम पाण्याचं तापमान शारीरिक तापमानाच्या तुलनेत जास्त असते. या तापमानाशी समतोल राखण्यात आपलं शरीर असमर्थ ठरते. त्यामुळेच पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतात. 

(वाचा : हेल्दी आणि हॉट दिसायचंय? त्वचा, केस,आरोग्यासाठी पेपरमिंट ऑईल आहे बहुगुणकारी)

किडनीवर होतो परिणाम

शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचं काम करण्यासाठी आपल्या किडनीमध्ये भक्कम केशिका प्रणाली (Capillary System) असते.  म्हणून जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास विषारी पदार्थ बाहेर फेकण्याची प्रक्रिया आणखी चांगल्या पद्धतीनं कार्य करेल, असं होत नाही. याउलट गरम पाण्यामुळे किडनीवर अतिरिक्त भार येऊन शरीरास हानिकारक ठरू शकते. 

(वाचा : तुम्हाला हिवाळ्यात दही खायला आवडतं का, मग हे नक्की वाचा)

शरीरातील पाण्याचं समतोल बिघडतं

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गरम पाण्याच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातील पाणीपातळी समतोल राहण्यास अडचणी निर्माण होतात. याशिवाय, एकाच वेळेस जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास मेंदूतील पेशींना सूजदेखील येऊ शकते. मेंदूतील रक्तपेशी सुजल्यास तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.  

(वाचा : 'ओम'कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)

इलेक्ट्रोलाइट (Electrolyte) होतं पातळ

शरीरात पाण्याची पातळी वाढते त्यावेळेस रक्तातील इलेक्ट्रोलाइटवर याचा परिणाम होऊन ते पातळ होते. रक्त आणि पेशीमध्ये समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पाणी करते. पण अतिरिक्त गरम पाण्याच्या सेवनामुळे इलेक्ट्रोलाइट पातळ होतं आणि यामुळे पेशींना सूज येते. यामुळेच डोकेदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. 

(वाचा : गाढ झोप हवी आहे का, रात्री 'या' 5 अन्नपदार्थांचं करा सेवन)

झोप पूर्ण होण्यात अडथळे

गरम पाणी प्यायल्यानं रात्रीच्या वेळेस मेटाबॉल्जिम (चयापचय क्षमता) वाढते. परिणाम तुमच्यावर रात्री वारंवार लघवीला जाण्याची वेळ येते आणि यामुळे झोप पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होतात. 

(वाचा : सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग 'हा' आजार घेईल तुमचा जीव)

हे देखील वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.