पनीर पालक, आलू पालक असे अनेक पालकाचे पदार्थ आहेत ज्यांची अगदी नावं ऐकली तरीही तोंडाला पाणी सुटतं. पालक खाल्ल्याने अनेक फायदे शरीराला मिळतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसातही पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये जास्त प्रमाणात लोह असतं. त्यामुळे लहान मुलं आणि गर्भवती महिलांनाही याचा फायदा होतो. इतकंच नाही तर पालक भजीपासून ते अगदी पालक कटलेटपर्यंत अनेक लज्जतदार डिश आपण बनवत असतो. पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की पालक सतत खात असाल तर त्याचे तोटेही होऊ शकतात. यावर तुमचा विश्वास बसेल का? तर हो तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल. काही लोकांनी आपल्या जेवणात सतत पालकाचा वापर करणं बंद करायला हवं. विशेषतः किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्ती आणि ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी याची जास्त काळजी घ्यायला हवी. या लेखातून पालक अति खाल्ल्याने काय नुकसान होतं हे आपण बघणार आहोत.
पालक खाणं हे शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे. पण सतत पालक खाल्ल्याने तुमच्या शरीराला नुकसानही होतं. हेच नुकसान नक्की काय होतं हे आपण पाहूया -
पालकमध्ये ऑक्सेलेटचा समावेश असतो. जर पालक जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाऊ लागलं तर त्यामुळे किडनी स्टोन अर्थात मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात पालक खायला हवा. मुतखड्याचा त्रास झाल्यास, पोटदुखी आणि इतर त्रासही वाढतात. त्यामुळे वेळीच योग्य प्रमाणात पालक खाणं फायदेशीर ठरतं. आवडतं म्हणून अति प्रमाणात पालक खाऊ नये. आठवड्यातून एकदा पालक खाणं योग्य आहे.
पालकमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात, जे रक्तामध्ये गुठळ्या निर्माण करण्याचं काम करतात. अशावेळी तुम्ही जर जास्त प्रमाणात पालक खाल्लं तर रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते. रक्ताशी संबंधित आजार असलेल्या लोकांना सहसा पालक खाणं टाळावं. कारण पालक खाल्ल्याने रक्त पातळ होऊन त्यावर कोणत्याही प्रकारच्या औषधांचा परिणाम होत नाही.
पालकमधील आढळणारे ऑक्सेलेट केवळ मुतखड्याची समस्या निर्माण करतात असं नाही तर यामुळे खनिजं अर्थात मिनरल्सदेखील पूर्ण मिळत नाहीत. विशेषतः कॅल्शियम आणि लोह सुकू न देण्याचं काम पालक करतं. त्यामुळे पालक जितकं शरीराला चांगलं असतं तितकंच ते वाईटही ठरतं. त्यामुळे त्याचं नक्की नुकसान काय आहे हे माहीत करून घ्या आणि त्याचप्रमाणे पालक आपल्या आहारात समाविष्ट करून घ्या.
शरीरातील युरिक अॅसिड पालकमुळे वाढतं आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वास्तविक पालकमध्ये प्युरीन्स आणि काही असे केमिकल कंपाऊंड असतात जे शरीरातील युरिक अॅसिड वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे सांधेदुखीला अधिक त्रासदायक ठरतं.
चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम
उच्च रक्तदाब आणि ब्लड प्रेशर कमी होण्याचा त्रास बऱ्याच लोकांना असतो. पालक खाणं हे उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना नक्कीच फायदेशीर ठरतं. पण पालक खाल्ल्याने बऱ्याचदा रक्तदाब कमी होतो. जे तुमच्या शरीरासाठी घातक ठरतं. त्यामुळे प्रमाणात पालक खावा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.