त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं बीट (Beetroot)

त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं बीट (Beetroot)

बीट हे आपल्या शरीरासाठी लाभदायक असतं हे सर्वांना माहीत आहे. पण तरीही ते खाण्यासाठी सहसा कोणाला आवडत नाही. पण सलाडमध्ये आपण बीटाचा वापर करून नक्कीच ते खातो. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे बीट (beetroot). बऱ्याच जणांना याची चव आवडत नाही. पण याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्ही स्वतःला बीट खाण्यापासून थांबवू शकणार नाही. तुम्हाला जर नुसतं बीट उकडवून खायला आवडत नसेल तर तुम्ही त्याचं सलाड बनवून खाऊ शकता. केवळ केसांसाठीच नाही तर तुमची त्वचा अधिक उजळवण्यासाठीही बीटाचा फायदा होतो. याशिवाय बीटाचे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. तेच आपण या लेखातून जाणून घेऊया - 

बीट खाण्याचे फायदे -

बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण अनेक जणांना ते माहीत नसतात. जाणून घेऊया नक्की काय आहेत बीटाचे फायदे 

Also Read What Is Vitamin D In Marathi

ऑक्सिजन वाढवण्याचं करतं काम

Shutterstock

बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे. 

केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट

Shutterstock

बीटामध्ये असणारं फॉस्फरस हे केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट समजण्यात येतं. खरंतर केसांच्या वाढीसाठी बीट हा नैसर्गिक सोर्स आहे. केसांची वाढ करण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. तुम्ही नियमित बीट आपल्या जेवणामध्ये खाल्लं अथवा बीटाचा ज्युस रोज प्यायलात तरीही तुमच्या केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो. बीटामुळे केसांमध्ये रोमछिद्र उघडतात आणि त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते. 

चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर

त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर

Shutterstock

केवळ केसच नाही तर त्वचेवर रंगत आणण्याासाठीही याचा फायदा होतो. बीट खाल्ल्याने तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. यात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हे तुमची त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत करतात.त्यामुळे तुमची त्वचा अधिक उजळण्यासाठी मदत मिळते. तसंच हिमोग्लोबिन शरीरातील वाढलं की, तुमचा चेहरा साहजिकच अधिक उजळतो. यामध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठीही याची मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात तर न चुकता बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे तुमचं शरीर अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते. 

या ज्यूस थेरपीने तुम्हाला मिळेल Long Lasting सौंदर्य

प्रतिकारकशक्ती वाढवतं

Shutterstock

मची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग करून घेता येतो. कारण यामध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. तसंच बीटाचा आणि गाजराचा रस तुम्ही एकत्र करून प्यायलात तर तुम्हाला नैसर्गिक साखर तर मिळतेच शिवाय तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास, नियंत्रणात राहण्यास मदत  मिळते. 

जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर

अधिक थकवा जाणवत असल्यास

Shutterstock

तुम्हाला लवकर थकवा येत असेल आणि ऑक्सिजनचाही त्रास होत असेल तर हे तुमच्या शरीरातील कमी रक्तामुळे होतं. अशावेळी तुम्ही बीटाचा रस नक्की प्यावा. याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. यामध्ये नैसर्गिक ऑक्सिजन असल्याने तुम्हाला त्वरीत ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. 

वाचा - तुरटीचा वापर कसा करावा

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.