वरूण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ सिनेमाचा थ्रीडी ट्रेलर रिलीज

वरूण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ सिनेमाचा थ्रीडी ट्रेलर रिलीज

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘स्ट्रीट डान्सर 3D’ (Street Dancer 3D Trailer) सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमामध्ये वरुण धवन (Varun Dhawan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रमुख भूमिकेत आहेत. डान्सर्सचं जग मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्दर्शक रेमो डीसूझा यांचा हा तिसरा सिनेमा आहे. एका डान्सरचा प्रत्येक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न रेमो डीसूझा यांनी केल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सिनेमामध्ये वरूण धवनची इंडियन टीम श्रद्धा कपूरच्या पाकिस्तानी टीमसोबत पंगा घेताना दिसणार आहे. वरुण धवनला पाकिस्तानी डान्सर इनायत म्हणजेच श्रद्धा कपूरला डान्सिंग बॅटलमध्ये हरवण्याची तीव्र इच्छा असते, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)

नोरा फतेहीच्या घायाळ करणाऱ्या अदा

या सिनेमामध्ये अभिनेत्री नोरा फतेही, शक्ति मोहन आणि प्रभू देवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामध्ये प्रभु देवा पाकिस्तानी टीमच्या गुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये नोरा फतेहीचा डान्सदेखील जबरदस्त दिसत आहे. ट्रेलरमध्ये  रेन डान्सपासून स्‍टेज परफॉर्मन्सपर्यंत बरंच काही दाखवण्यात आलं आहे. धमकेदार असलेला हा सिनेमा 24 जानेवारी 2020 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. हा सिनेमा हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही पाहायला मिळणार आहे. 
रेमो डीसूझा यांच्या 'ABCD' सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2'  या चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. एबीसीडी 2 मध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूरची जोडी झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर स्ट्रीट डान्सरमध्येही वरूण-श्रद्धाची जोडी दिसणार आहे.  या चित्रपटाला #rulebreakers असं हॅशटॅग देण्यात आलं आहे.  

(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत)

स्ट्रीट डान्सर्सची धमाल

स्ट्रीट डान्सरमध्ये वरूण एका पंजाबी तरुणाची भूमिका निभावणार आहे तर श्रद्धा कपूर पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं शुटिंग अमृतसर आणि लंडनमध्ये करण्यात आले आहे.  या चित्रपटात एबीसीडीमधील 'बेगुनाह' हे लोकप्रिय गाणं पुन्हा रिक्रिएट केलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे. यापूर्वीच्या या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं असल्याने आता 'स्ट्रीट डान्सर' बाबतदेखील प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

(वाचा : शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड)

हे देखील वाचा

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की पाहा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहेत नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स. जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखेच. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काउंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.