यश कधी मिळेल सांगता येत नाही, KFC मागील यशोगाथा

यश कधी मिळेल सांगता येत नाही, KFC मागील यशोगाथा

यश कधी मिळेल हे कोणालाच कधी सांगता येत नाही. अपयशानंतर यश येतं हे तुम्ही जर कुठून ऐकलं असेल तर ते मात्र खरं आहे. आशा न सोडता जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश मिळणारचं. मग ते मिळवण्यासाठी तुमचं म्हातारपण का न येवो… असंच काहीसं घडलं KFC च्या मालकाबाबत. आज ज्याचं कुरकुरीत आणि क्रंची चिकन आपण खूप आवडीने खातो. त्यांना हे सगळं सुरु करायला फार वेळ लागला. आज अमेरिकेतील एक उत्तम फ्राईड स्नॅक्स म्हणून ते प्रसिद्ध आहे. पण ते एका रात्रीत प्रसिद्ध झालं नाही. तर त्यांना हे यश कमवायला बराच वेळ लागला. आज आपण जाणून घेऊया हीच यशोगाथा

हारलँड सॅन्डार्स (Harland Sanders) यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. पण लहानपणापासूनच त्यांना संघर्ष पाहावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षी वडील गेल्यामुळे आणि घराचा मोठा मुलगा असल्यामुळे त्यांच्या अंगावर जबाबदारी येऊन पडली. काम करण्याचे वय नसतानाही त्यांना काम करावे लागले. दोन भावांना सांभाळण्यासाठी त्यांनी घरी राहून जेवण करायलाही सुरुवात केली. नंतर घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केला.इतक्या लहान वयातही त्यांनी मेहनत केली. मेहनत करुन पैसा जमवला आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. 

तुमच्या डॅमेज केसांना या टिप्स वापरून करा पूर्ववत

 


 

 

Instagram

इतक्या लहान वयात जबाबदारी आल्या पण त्यातून सुखाचा मार्ग शोधताना त्यांनी लग्नही फारच लवकर केले. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी लग्न केले. त्यांना मुलंही लवकर झाली. कुटुंबाला पोसण्याइतका पैसा ते कमवत होते. पण हे कौटुंबिक सुखही त्यांनी फार काळ मिळालं नाही. त्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलं. त्यानंतर एकट्याने दिवस काढताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण एकट्याने आयुष्य जगणेही फार सोपे नव्हते. नोकरी करुन रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्याकडे फार पैसा नव्हता. अशावेळी त्यांना काय करावे कळत नव्हते. खिशात पैसा हवा म्हणून त्यांनी फ्राईज चिकन विकायला सुरुवात केली. खास मसाल्यामध्ये घोळवून फ्राय केलेले चिकन पटकन कोणी घेणार नव्हतेच. पण त्यांनी लगेचच हार न मानता दारोदारी जाऊन हे चिकन विकलं. लोकांना ते आवडू लागलं. चिकन विकून त्यांनी जे पैसे कमाले त्या पैशामधून त्यांनी इंडियानामधील केंचुनी या त्यांच्या गावामध्ये एक छोटसं दुकान सुर केलं. कालांतराने त्यांनी त्याचं दुकान रेस्टॉरंटमध्ये बदललं, हळुहळू त्यांनी एक एक करत चिकनसोबत अन्य काही रेसिपीज विकायला सुरुवात केली. त्याच्या या यमी स्नॅक्सला लोकांनी पसंती दिली. आणि मग एका मागोमाग एक त्यांनी रेस्टॉरंट उघडायला सुरुवात केली.

सध्याच्या घडीला KFC संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. KFC म्हणजे केन्चुकी फ्राईज चिकन अस याचा अर्थ आहे. इंडियानामधील केन्चुकी या त्यांच्या गावाच्या नावावरुनच याला नाव देण्यात आले. ठिकठिकाणी याच्या फ्रॅन्चायझी आहेत. वयाच्या अशा घडीला त्यांना यश मिळाले ज्यावेळी त्यांना काम न करता आरामाची गरज होती. पण त्यांनी त्यांच्यातील ही जिद्द सोडली नाही. उलट त्यांनी मेहनत केली आणि पैसा कमावला आणि असे यश मिळवले की, त्यांनी त्यांची छाप जगभरात सोडली. त्य़ामुळे यश मिळवण्याचे ठराविक वय नसते तर जिद्द महत्वाची असते. ती तुम्ही कधीही सोडायला नको.

 पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

Instagram

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.