ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका

‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका

‘मुलीचं लग्न उत्तम पद्धतीनं पार पडलं की आम्ही मोठ्या जबाबदारीतून मुक्त होऊ’, हे वाक्य तुम्ही कोणाच्या-न्-कोणाच्या आईवडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून ऐकलंच असेल. मुलगी वयात आल्यानंतर कुटुंबीयांना तिच्या लग्नाची चिंता सतावू लागते. कित्येक घरांमध्ये मुलगी जन्माला येताच तिचे पालक लग्नासाठी पै-न्-पै जमवू लागतात. मुलीनं वयाची पंचवीशी ओलांडली की नातेवाईक लगेचच लग्नावरून तिला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारू लागतात. आईवडिलांनाही आपल्या मुलीसाठी चांगला पती शोधण्याची घाई असतेच. पण या सर्व गोंधळात एखाद्या मुलीच्या भावनांचा फार क्वचितच विचार केला जातो. तिच्या लग्नाबाबतच्या काय कल्पना आहेत? जोडीदाराबाबत तिचे काय विचार आहेत? याचा शोध घेणे नातेवाईकांना तितकंस महत्त्वाचे वाटत आहे. बहुतांश वेळा हीच परिस्थिती मुलाच्याही बाबतीतही निर्माण होते. मुलाला एखाद्या चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळताच पालक त्याचे दोनाचे चार हात करण्यासाठी मागे लागतात.  

(वाचा : लग्नानंतर बदलतं मुलींचं आयुष्य, अशी करा मानसिक तयारी)

आई-वडीलदेखील लग्नासाठी आणतात दबाव

काही नातेवाईक तर स्वतःहून आपल्या ओळखीतल्या नात्याची शिफारस करतात. सतत लग्नाच्या विषयामुळे मुला/मुलींची प्रचंड चिडचिड होते. पण ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ ही परिस्थिती असल्यामुळे नीट रागदेखील व्यक्त करता येत नाही. त्यामुळे केवळ दुर्लक्ष करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर उरतो. ठराविक काळ उलटल्यानंतर पालकदेखील लग्नासाठी दबाव आणू लागतात. अखेर रोजच्या कटकटीला कंटाळून मुलगा/मुलगी इच्छेविरोधात लग्न करण्यासाठी तयार होतात. तुम्हीदेखील याच समस्येचा सामना करत आहात का? यामुळे निरर्थक विचारांचा ताण येतोय का? या तणावातून तुमची सुटका करण्यासाठी आम्ही काही टिप्स तुमच्यासाठी आणले आहेत. 

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

ADVERTISEMENT

थेट आणि स्पष्टपणे मुद्दा मांडा

कोणत्याही प्रकारच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सर्वात चांगला आणि योग्य मार्ग म्हणजे त्या समस्येचा सामना करणे. तुम्ही केवळ शांत बसून राहिलात तर कधीही त्या तणावातून किंवा समस्येतून बाहेर येऊ शकणार नाहीत. तुम्हाला लग्न करण्यासाठी वेळ हवा असेल तर  याबाबत आपल्या आईवडिलांकडे स्पष्टपणे आपलं म्हणणे मांडणं योग्य मार्ग असेल. कदाचित तुम्हाला आपले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असेल किंवा करिअरला वेळ द्यायचा आहे, असे वैध कारण आपल्या आईवडिलांना सांगा. आईवडिलांशी बोलणं शक्य नसल्यास आपल्या मोठ्या भावंडासह किंवा जवळच्या व्यक्तीला मन की बात सांगा. म्हणजे त्यांच्या माध्यमातून तुमचं लग्न न करण्यामागील कारण आईवडिलांपर्यंत पोहोचेल. 

(वाचा : गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

 

निश्चित वेळ ठरवून द्या

जेव्हा तुम्ही पालकांना लग्नासाठी नकार देता तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की,‘कधीपर्यंत असं घरात बसून राहणार आहात?’. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे लग्नासाठी त्यांना एक निश्चित वेळ ठरवून द्या. उदाहरणार्थ एखाद्या ठराविक वयापर्यंत तुम्हाला लग्न करायचं नाही किंवा करिअरचा एखादा टप्पा गाठल्याशिवाय लग्नाचा विषय नको, असे सांगून तुम्ही पालकांची मनधरणी करू शकता. लग्नाच्या समस्येवर उपायदेखील मिळेल आणि ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत तुमच्याकडे वारंवार लग्नाचा विषयदेखील निघणार नाही.विशेष म्हणजे ध्येय गाठण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

ADVERTISEMENT

प्रेमानं समजवा

तुम्ही लग्नासाठी नकार दिल्यानंतर आईवडील अतिशय नाराज होतात. अशावेळेस त्यांची प्रेमानं समजूत घाला. त्यांना सांगा जग आपल्याबाबत काय म्हणतंय, याचा तुम्हाला फरक पडत नाही. आपल्यासाठी लोकांपेक्षा आईवडीलच महत्त्वाचे आहेत हे त्यांना पटवून द्या. यामुळे ते तुमच्या भावना समजून घेतील आणि निर्णयांचा आदरदेखील करतील. प्रेमानं समजावल्यानंतर आई-बाबादेखील तुमच्यावर लग्नासाठी दबाव आणणार नाहीत. या टिप्स अंमलात आणणल्यानंतर एखादा नातेवाईक जेव्हा तुमच्या वडिलांकडे स्थळ घेऊन येतील तेव्हा तुमचे बाबाच त्यांना स्पष्ट सांगतील की माझा मुलगा/ मुलगी सध्या शिक्षण किंवा करिअरवर लक्ष्य केंद्रित करत आहे. सध्या त्याचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. अशा पद्धतीनं सर्व प्रेशर ते स्वतःहून दूर करतील.  

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

15 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT