आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की, उचकी लागली म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत आहे. पण उचकी लागणं ही साधारण गोष्ट आहे. सामान्यतः उचकी लागल्यावर काही वेळाने आपोआप थांबते. बरेचदा पाणी प्यायल्याने किंवा दीर्घ श्वास घेतल्यानेही उचकी थांबते. पण कधी कधी बराच वेळ उचकी थांबत नाही. चला जाणून घेऊया उचकी येण्यामागची नेमकी कारणं आणि त्यावरील काही सोपे उपाय -
डायाफ्राम नावाच्या मांसपेशी हृदय आणि फुफ्फुस्साला पोटापासून वेगळं करतात. श्वासोश्वाच्याबाबतीतही यांची मुख्य भूमिका असते. जेव्हा या मांसपेशींमध्ये काही कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन होतं तेव्हा आपल्या फुफ्फुस्सांमध्ये हवा जाण्यासाठी जागा तयार होते. जेव्हा या मांसपेशींचं आकुंचन वारंवार होऊ लागतं. तेव्हा आपल्याला उचकी लागते. उचकी लागल्यावर जो आवाज येतो तो ग्लोटिस (वोकल कॉर्ड्स म्हणजेच कंठातील मोकळ्या जागेतून) च्या लवकर-लवकर बंद होण्याने येतो.
वरील परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते आणि उचकी येण्यामागे ठराविक असं कारण नाही. पण काही सामान्य कारण खालीलप्रमाणे.
* गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने, खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने.
* मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने. स्मोकिंग केल्याने.
* तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते.
* हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते.
खरंतर उचकी काहीवेळाने आपोआप थांबते. पण बऱ्याच वेळानेही उचकी न थांबल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
* थंड पाणी प्या किंवा बर्फाचा खडा तोंडात ठेवून हळूहळू चोखा.
* दालचीनीचा एक तुकडा तोंडात टाकून तो चघळा.
* दीर्घ श्वास घ्या आणि जेवढं शक्य असेल तेव्हा रोखून धरा. असं दोन तीनदा केल्यासही उचकी थांबते.
* पेपरबॅगमध्ये तोंड घालून श्वास घ्या. यामुळे श्वसन प्रक्रिया नॉर्मल होण्यास मदत मिळते.
* लसूण, कांदा किंवा गाजराच्या रसाचा वास घ्या.
* काळी मिरी वाटून बारीक चूर्ण करा. दोन ग्रॅम चूर्ण मधात मिसळून खा.
* जीभखाली साखरेचा खडा किंवा चॉकलेट धरा आणि ते चघळा.
* जमीनीवर आडवं व्हा आणि गुडघे तुमच्या छातीजवळ घ्या. असं केल्याने डायाफ्राममधील गडबड लगेच दुरूस्त होते.
* 20 ग्रॅम लिंबाच्या रसात 6 ग्रॅम मध आणि थोडंसं काळ मीठ मिक्स करा आणि हे चाटण चाटा.
खरंतर उचकी तुम्हाला 48 तासांपर्यंत वारंवारही येऊ शकते. पण हा त्रास जास्त होऊ लागल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण वारंवार लागणारी उचकीही बरेचदा दमा, निमोनियासारख्या श्वासांनिगडीत रोगांचीही संकेत असते.
नोट: जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास किंवा अॅलर्जी असल्यास घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला अवश्य घ्या.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.