आला थंडीचा महिना... हा...! उन्हाळा-पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते. म्हणून आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला आवर्जून दिला जातो. बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कपाटातलं स्वेटर, मफलर, कानटोपी, हुडी असं एक-एक करून बरंच काही बाहेर येऊ लागतं. कारण रोज तेच-तेच स्वेटर कसं वापरणार? म्हणजे सवाल फॅशन स्टेटसचा सुद्धा असतो ना. बहुतांश जणांना हिवाळ्यात आरोग्यासोबत फॅशनची देखील तितकीच काळजी असते. हिवाळ्यात फॅशनसंदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, विशेषतः महिला वर्गाला. नेमकं कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत, ज्यामुळे थंडीचाही त्रास होणार नाही आणि आपण स्टायलिश देखील दिसू...असं मोठं प्रश्नचिन्ह अनेकींसमोर कायम असतं. पूर्वी कसं हिवाळ्यात केवळे मोजक्याच रंगांचे स्वेटर, मफलर, शाल इत्यादींची फॅशन असायची. पण आता ऋतुनुसार नाही तर प्रत्येक दिवशी फॅशनचे ट्रेंड्स बदलतात. त्यामुळे हिवाळ्यात स्टायलिश फॅशन करण्यासाठी तुमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या हिवाळ्यात तुम्हाला बेस्ट फॅशनिस्टा व्हायचं असेल वाचा या शानदार टिप्स.
हिवाळ्यात वुलन कुर्तींचा पर्याय एथनिक, स्टायलिश आणि कम्फर्टेबलदेखील असतो. वुलन कुर्तीमुळे तुम्हाला स्टायलिश लुकदेखील मिळतो आणि थंडीपासून बचाव देखील होतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी, जॉब करणाऱ्या महिलांपासून ते गृहिणींपर्यंत सर्वांसाठी हा पर्याय उपयुक्त आहे.
काहींना कपड्यांवर कोणत्याही प्रकारची एम्ब्रॉयडरी किंवा प्रिटेंड डिझाइन आवडत नाही. एकूणच त्यांना प्लेन रंग अधिक पसंत असतो. प्लेन रंगाच्या कुर्तीमुळे कॉर्पोरेट आणि रॉयल लुक मिळतो.
वाचा : ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहात, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
तुम्हाला स्कार्फ सांभाळण्याचा कंटाळा प्रचंड कंटाळा येत का. पण जर तुम्हाला कुर्तीलाच जोडलेला स्कार्फ मिळाल्यास? तर हा पर्यायदेखील बाजारात उपलब्ध आहे. स्कार्फ नेक वुलन कुर्तीचा तुम्ही पार्टी वेअर म्हणून देखील वापर करू शकता. गडद रंगाच्या कुर्तीवर तुम्ही फिकट रंगाचा स्कार्फ अशी रंगसंगतीत सुंदर दिसेल.
वुलन कुर्तीमधील हाय नेक कुर्ती हे नवीन कलेक्शन आहे. याचा सध्या बाजारात ट्रेंड सुरू आहे. हाय नेक (गळा बंद डिझाइन)मध्ये तुम्हाला प्लेन किंवा एम्ब्रोयडरी असलेली कुर्ती मिळेल. हाय नेक कुर्तीमध्ये तुम्हाला अधिक कम्फर्टेबल वाटेल. यामध्ये तुमचा मानेचा भाग पूर्णतः कव्हर होतो. यावर हलक्या स्वरुपातील हँड वर्कदेखील असतं, ज्यामुळे कुर्तीचा हा प्रकार अतिशय आगळावेगळा दिसतो.
वुलन कुर्तींमध्ये मॉन्ट्रेक्स डिझाइन अतिशय प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला लांब हात, हवा तसा गळ्याचा आकार, गळ्याभोवती डिझाइन असा एक वेगळा ट्रेंडी लुक मिळेल.
आज कोणते कपडे घालावेत? हा प्रश्न रोजच प्रत्येक महिलेसमोर कायम असतो. ते ही कपाटात कपड्यांचा अक्षरशः खच पडलेला असताना. तुम्हालाही वाटतं का कित्येक सुंदर कुर्ती, ड्रेस आणि साड्या कपटात केवळ पडून आहेत. पण हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी माझ्याकडे नवीन कपडेच नाहीत, असं तुम्हाला वाटतंय? इतकं टेन्शन घेण्याची काहीच आवश्यकता नाही, तुम्ही विंटर-समर आउटफिट्स म्हणजे जुन्या कपड्यांचं फ्युजन करून ते वापरू शकता
हिवाळ्यात तुम्ही स्कार्फ, स्टोल आणि शॉलचा वापर करून वेगवेगळी फॅशन करू शकता. थंडीपासून बचावही होईल आणि आकर्षक लुकदेखील मिळेल. स्कार्फमध्येही विविध रंग आणि प्रकार तुम्हाला मिळतील. उदाहरणार्थ स्क्वेअर स्कार्फ, इन्फिनिटी स्कार्फ, रेक्टअँगल स्कार्फ, बंडाना स्कार्फ इत्यादी. टॉप किंवा ड्रेसला मॅचिंग असा स्कार्फ तुम्ही वापरू शकता.
उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही बरेच ट्रेंडिंग जॅकेट्सचा पर्याय तुमच्या समोर असता. जॅकेट, स्वेट कोट त्यावर एक छान स्कार्फही घेऊ शकता. केवळ वेस्टर्न लुकवरच नाहीतर इंडियन वेअरवरही तुम्ही जॅकेट वापरू शकता. एक वेगळा स्वॅगवाला लुक मिळेल.
हिवाळ्यात त्वचेसंबंधी समस्या अधिक निर्माण होतात. त्यामुळे शक्यतो सैल कपडे परिधान केल्यास फायदेशीर ठरले. यावेळेस तुम्ही धोती पँट्सचा वापर करू शकता. त्यावर एखादा टॉप, टी-शर्ट, टी-बॅक आणि जॅकेट घालता येईल
वाचा : 'ओम'कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता
अनाकर किंवा लेहंग्यासोबत एक सुंदर नाजूक जॅकेट परिधान केल्यास अतिशय सुंदर-ग्लॅमरस लुक तुम्हाला मिळेल. तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. व्हेलवेट किंवा सिल्क जॅकेटची निवड करा आणि लुक नक्की ट्राय करून पाहा.
बदलत्या फॅशन स्टाइलनुसार स्वतःला अपडेट कसं ठेवावं, हे मात्र अनेकदा काही केल्या समजत नाही. त्यात हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी बराच विचार करावा लागतो.तसं पाहायला गेलं तर फॅशन इंडस्ट्रईमध्ये श्रग हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. श्रग तुम्ही जीन्स किंवा लाँग स्कर्टवरदेखील वापरू शकता. बाजारात विविध रंग आणि आकारांमध्ये श्रग तुम्हाला सहज मिळतील.
आजकाल प्रिटेंड श्रगची फॅशन सुरू आहे. जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस म्हणजे टॉप किंवा जीन्स वापरणं आवडत असेल तर त्यावर प्रिटेंड श्रग परफेक्ट दिसतं. यामध्येही विविध पर्यायदेखील तुम्हाला मिळतील. यासोबत लाँग नेकपीसदेखील वापरू शकता. हा लुक अतिशय आकर्षक दिसेल आणि महत्त्वाचे म्हणजे थंडीमध्ये तुमचं संरक्षणदेखील होईल.
वाचा - हिवाळ्यासाठी श्रग्स
काही रंग आणि डिझाइन असे असतात, जे कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर उठून दिसतात. लाँग श्रग कोणत्याही कपड्यांवर सुंदर दिसतात. केवळी जीन्सवरच नाही तर एखाद्या ड्रेसवरदेखील असं श्रग छान दिसतात आणि एक वेगळाच लुक मिळतो. ऑफिस ड्रेसवर देखील लाँग श्रगचं कॉम्बिनेशन अगदी भन्नाट दिसतं.
आजकाल विविध प्रकाराच्या स्टायलिश स्लीव्ह्ज श्रगची बरीच फॅशन सुरू आहे. तुम्ही कित्येक सेलिब्रिटीजना अशा श्रगमध्ये पाहिलं असेल. यामध्येही लाँग, शॉर्ट, बेल स्लीव्ह्ज, फ्लेअर्ड कॉलर असे विविध पर्यायदेखील उपलब्ध आहोत.
कितीही थंडी असली तरी काही जणींना हात पूर्णतः झाकलेले आवडत नाहीत. अशा मैत्रिणींनी ड्रेस किंवा जीन्सवर क्रॉप श्रग वापरावा. क्रॉप श्रग उंचीनं लहान असतात, पण अतिशय स्टायलिश असतात. जर तुम्ही एखादा प्रिंटेड ड्रेस वापरला असेल तर त्यावर प्लेन रंगाचा श्रग परिधान करावा.
नेहमीच जीन्समध्ये वावरणं तसं बोअरिंग असते. अशातच महिनो-न-महिने कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिलेल्या ड्रेस कधीतरी परिधान करण्याची तुमची इच्छा होत असेल तर स्वतःला अडवू नका. तुमच्याकडे असलेले सुंदर इंडियन वेअर घालण्यासाठी एखाद्या सोहळ्याची वाट पाहू नका.
सुंदर लाँग स्कर्ट परिधान करण्याची तुमची इच्छा आहे, पण यासाठी केवळ तुम्ही हिवाळा संपण्याची वाट पाहताय? तर तुम्ही चुकत आहात...स्कर्टवर विंटर कोट किंवा जॅकेट, मॅचिंग दुपट्टा किंवा वुलन लेगिन्ससह तुम्ही हिवाळ्यात मस्तपैकी तयार व्हा.
हल्ली विविध रंगांमध्ये शॉल आपल्याला बाजारात मिळतात. डिझायन, एम्ब्रॉयडरी असलेले शॉलदेखील उपलब्ध आहेत. दुपट्ट्याऐवजी शॉल वापरल्यास सुंदर एथनिक लुक तुम्हाला मिळेल. ज्या दिशेनं तुम्ही साडीचा पदर सोडलेला असेल त्याच्या विरूद्ध दिशेनं शॉल हातावर घ्या. यानं तुम्हाला अतिशय सुंदर आणि सोज्वळ असा लुक मिळेल.
तुम्ही बऱ्याच महिलांना थंडीमध्ये साडीवर स्वेटर घातलेला पाहिलं असेल. पण ही फॅशन जुनाट झाली आहे. पण याहून तुम्हाला हटके काही करायचं असल्यास तुम्ही स्वेटरचा ब्लाउज म्हणून वापर करू शकता. यामुळे एका ग्लॅमरस लुक मिळेल. पूर्ण हातांचा किंवा छोट्या बाह्यांचा स्वेटर तुम्ही वापरू शकता. यावर मॅचिंग ज्वेलरीदेखील परिधान करा.
हटके इंडो-वेस्टर्न लुकसाठी तुम्ही जीन्सवर एखादी साडी नेसू शकता. असं फ्युजन केल्यास तुमच्याकडे अनेकांच्या नजरा आपोआप तुमच्याकडे वळतीलच. महत्त्वाचे म्हणजे जीन्समुळे तुमच्या पायांना थंडी देखील वाजणार नाही. तुमच्याकडे असलेल्या जीन्सच्या रंगानुसार साडीची निवड करा. डिझायनर ब्लाउज, साडी आणि जीन्समुळे एक वेगळच फॅशन फ्युजनचा अनुभव तुम्ही घ्याल.
कपड्यांच्या फॅशनची समस्या आपण सोडवली, मग आता अॅक्सेसरीज देखील शोध घ्यायला हवा. तुम्ही ज्या काही अॅक्सेसरीज खरेदी करण्याचा विचार करत आहात त्यापासून तुम्हाला थंडीचा त्रास होणार नाही आणि फॅशनेबल लुकदेखील मिळेल.
कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कान झाकणे अतिशय महत्त्वाचे असतं. पण संपूर्ण दिवस शॉल किंवा मफलरनं कान झाकून ठेवले तर केलेल्या फॅशनचं काय करायचं? चिंता करू नका. तुम्हाला थंडीही वाजणार नाही आणि तुम्ही अगदी झक्कासदेखील दिसाल,असा पर्याय बाजारात उपलब्ध आहे.ते म्हणजे इअर मफ, यात तुम्हाला विविध रंग, आकार, ट्रेंडी लुकदेखील मिळतील.
जर तुम्हाला इअर मफ आवडत नसतील तर तुम्ही विंटर कॅप वापरून पाहू शकता. विंटर कॅपमुळे तुमच्या कानांसह डोक्याचंही थंडीपासून संरक्षण होईल. फॅशन आणि थंडीपासून स्वतःचा बचाव अशा दोन्ही गोष्टींचा फायदा तुम्हाला होईल.
थंडीमध्ये अनेकांचे हात थंड पडून ते दुखण्याचा, वाकडे होण्याचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये आणि सोबत फॅशनसुद्धा व्हावी, यासाठी तुम्ही फर असलेले किंवा मखमली हातमोजे वापरू शकता.
हात मोज्यांप्रमाणेच कित्येक प्रकारचे पायमोज्यांचाही पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार हवे तसे मोजे हल्ली बाजारात, ऑनलाइन मिळतील. गुडघ्यांपर्यंत लांबदेखील मोजे वापरून तुम्ही फॅशन करू शकता. यामध्ये डिझाइन, प्रिटेंड डिझाइन, रंगीबेरंगी किंवा एकाच रंगाचेही मोजे तुम्हाला मिळतील. यामधीलच आणखी एक प्रकार म्हणजे वॉर्मर, हे तुम्ही शॉर्ट स्कर्टवर वापरू शकता.
हिवाळ्यातही फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्हाला महागड्या कपड्यांची खरेदी करण्यााची आवश्यकता नाही. तुमच्याकडे आहेत त्या कपड्यांना आगळावेगळा फ्युजन लुक देऊन तुम्ही फॅशनिस्टा होऊ शकता. उदाहरणार्थ स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता.
तुम्ही एखादा सुंदर ड्रेस किंवा उबदार स्वेट टीशर्ट वापरू शकता. त्यावर एखादी साजेशी अशी कॅपदेखील घेऊ शकतो. बाजारात तुम्हाला निरनिराळ्या प्रकाराचे, डिझान्सचे उबदार हातमोजे आणि पायमोजेही मिळतीत.
थंडीच्या दिवसांत सैल कपडे घातल्यानं अधिक त्रास होतो. अशा वेळेस तुम्हाला आवडीचा ड्रेस वापरता यावा यासाठी एकहून अधिक पातळ कपड्यांचा वापर करू शकता. उदाहरणार्थ हिवाळ्यात हाता-पायांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी तुम्हील ड्रेसवर लेगिन्स, गुडघ्यापर्यंत असणारे बूट, पायमोजे वापरू शकता. साडी नेसण्याची इच्छा झाल्यास हाय नेक ब्लाउज किंवा स्वेटर ब्लाउज वापरावा.
बहुतांश तरुणींंना हिवाळ्यात या प्रश्न पडतोच. कारण थंडीमध्ये ड्रेस,शॉर्ट स्कर्ट वापरणं कठीण असते. पण जर तुम्ही शॉर्ट स्कर्टवर गुडघ्यापर्यंत असणारे मोजे किंवा स्कर्ट मॅचिंग अशी लेगिन्स वापरली तर थंडीचा त्रास होणार नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.