‘अर्जुन रेड्डी’ सिनेमात (Arjun Reddy) प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार आहे. साउथसहीत बॉलिवूडमध्येही विजयची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. विजयला बॉलिवूड सिनेमांमध्ये पाहण्याची त्याच्या चाहत्यांची ईच्छा आहे. 'अर्जुन रेड्डी' आणि 'डियर कॉमरेड'सारख्या शानदार सिनेमांत दमदार अभिनय करून विजय देवरकोंडानं सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता बॉलिवूडमधील दिग्दर्शक/निर्माता करण जोहर (Karan Johar)देखील विजयसोबत काम करायचं आहे. यासंदर्भात करण आणि विजयमध्ये बोलणी देखील झाली, पण काम फिसकटल्याची माहिती समोर आली आहे.
यशराज (Yashraj) बॅनरनंही विजय देवरकोंडासमोर तीन सिनेमांच्या कराराबाबतचा प्रस्ताव मांडला आणि प्रोडक्शन हाउसनं कलाकारला तब्बल 48 कोटी रुपये मानधन देण्यासाठी तयारी देखील दर्शवली आहे. पण या वृतावर अद्याप यशराज बॅनर किंवा विजय देवरकोंडातर्फे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
(वाचा : अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...)
विजय देवरकोंडाला बॉलिवूडकडून मोठमोठ्या ऑफर्स येत आहेत. गेल्या चार वर्षांत विजय 'पेली चुपूलु', 'अर्जुन रेड्डी', 'महानती', 'गीता गोविंदम' आणि 'टॅक्सी ड्रायवर' सारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे. 2016मध्ये आलेल्या 'पेली चुपूलु' सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारनं सन्मानित देखील करण्यात आलं होतं. सध्या तो ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)
'अर्जुन रेड्डी' सिनेमाचा रीमेक ‘कबीर सिंह’नं अनोखा विक्रम नोंदवला आहे. शाहिदच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेल्याचा रेकॉर्ड नोंदवला. याची पुष्टी खुद्द गुगलकडून देण्यात आली. या सिनेमामुळे शाहिदच्या बॉलिवूडमधील करिअरला नवं वळण प्राप्त झालंय. रिलीजनंतर सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण शाहिदच्या अभिनयाचे चाहत्यांसह बॉलिवूडकरांनी तोंडभर कौतुक केलं. या सिनेमाच्या निमित्तानं चाहत्यांना शाहिदचं निराळंच रूप पाहायला मिळालं. कियाराच्या नो मेक-अप लुकनंही सिनेरसिकांवर मोहिनी घातली. बॉक्सऑफिसवर कबीर सिंह सिनेमानं तब्बल 250 कोटी रुपयांहून अधिक रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षक आजही युट्यूब हा सिनेमा सर्च करत आहेत. यातील गाणी तर सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड गाजली. आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आणि प्ले-लिस्टमध्ये कबीर सिंहची गाणी कायम आहेत.
(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत)
‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’
संदीप रेड्डी वांगा यांनीच तेलुगू आणि हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. सिनेमात दाखवल्याप्रमाणे वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या कबीर सिंहला (शाहिद कपूर) कॉलेजमधील प्रीतिवर प्रेम जडतं. हे प्रेमदेखील काही काळासाठी किंवा क्षणिक नाही तर जिवापाड प्रेम असते. पण कौटुंबिक समस्यांमुळे या दोघांमध्ये दुरावा येतो. यामुळे कबीर सिंह मानसिकरित्या पूर्णतः कोलमडतो, पण त्याचं प्रीतिवरील प्रेम काही आटत नाही. त्यातही मोठी अडचण असते ते म्हणजे त्याला येणारा राग. नैराश्यात कबीर सिंहला अंमली पदार्थांचं व्यसन लागते. कबीरच्या झीरो अँगर बॅलन्समुळे त्याच्या आणि प्रीतिच्या आयुष्यात गुंतागुंत वाढत जातो. हॅप्पी ए़ंडिंग कसं होते, यासाठी सिनेमा तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर नक्की पाहा. 'कबीर सिंह'चं बजेट जवळपास 60 कोटी रुपये एवढं होतं आणि सिनेमानं त्याही पेक्षा अधिक कोटी रुपयांची कमाई करत रेकॉर्ड नोंदवला आहे. 2019 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला सिनेमा असा विक्रमही कबीर सिंहनं नोंदवला आहे.
हे देखील वाचा :
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.