ADVERTISEMENT
home / Travel in India
गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही…मग तुम्ही कधी जाताय?

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही…मग तुम्ही कधी जाताय?

‘गुलाबी शहर’ असा उल्लेख जरी कोणी केला तरी वेळ न दवडता आपल्या ओठांवर नाव येते ते म्हणजे ‘जयपूर’चे. राजस्थानमधील जयपूर हे देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटकांसाठीही आकर्षण आहे. म्हणूनच या ठिकाणी परदेशांची कायमच गर्दी असते. जयपूरमधील किल्ले, वाडे त्यांचे ऐतिहासिक अस्तित्व, येथील लोकं, इथली खानपान व्यवस्था सगळे काही वेगळे आहे. शहराचे नाव जरी गुलाबी शहर असे असले तरी विविध रंग या ठिकाणी पाहायला मिळतात. जयपूरबद्दल इतके काही वाचल्यानंतर मी जयपूरपासून या नव्या वर्षाची सुरुवात केली. तुम्हीही जयपूरबद्दल बरेच काही ऐकले असेल आणि तिथे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी हे नक्की वाचा.

#foodie असाल तर मग तुम्ही अहमदाबादला जायलाच हवं

सबकुछ गुलाबी..

हवामहल

Instagram

ADVERTISEMENT

राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘गुलाबी शहर’ या नावाने ओळखले जाते. त्याला गुलाबी शहर का म्हणतात त्याची प्रचिती तुम्हाला येईल ते या शहरात पाय ठेवल्यानंतर. येथील प्रत्येक इमारतील एखाद्या वाड्याप्रमाणे आहेत. एक सारख्या दिसणाऱ्या गल्ल्या आणि प्रत्येक इमारतीचा गुलाबी रंग आजही तसाच टिकून आहे. दुकानांच्या पाट्या लिहण्याची पद्धत एकसारखी आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने पाट्या लिहलेल्या दिसतील ते ही अगदी शुद्ध हिंदीत. हा गुलाबी रंग तुम्ही विचार करत असलेला गुलाबी रंग नाही बरं का! हा रंग लाल आणि केशरी रंगाचे मिश्रण आहे पण हा रंग तुम्हाला गुलाबी रंग असल्याप्रमाणे भासतो. 

(जुन्या दाखल्यानुसार जयपूरमधील इमारती या आधी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या होत्या. पण 1876 साली इंग्लडची राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट जयपूरमध्ये येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर स्वच्छ केले जात होते. शिवाय सगळीकडे सजावट केली जात होती. जयपूरचे राजा सवाई रामसिंह यांनी  शहरातील सगळ्या शहरांना एका विशिष्ट गुलाबी रंगात रंगवायचे ठरवले. सगळ्यांची मान्यता मिळवल्यानंतर येथील प्रत्येक इमारतीला गुलाबी रंग देण्यात आला. आणि तो आजही 2020 मध्ये तसाच टिकून आहे.)

जाणून घ्या इतिहास

अंबर महल

Facebook

ADVERTISEMENT

आता तुम्ही गुगल केल्यानंतर सर्वसाधारणपणे तुम्हाला अंबर फोर्ट, जल महल, हवा महल, सिटी पॅलेस, जंतरमंतर,अल्बर्ट हॉल म्युझिअम, नाहरगड, सिसोदिया राणी बाग,गोविंद देव जी मंदिर, बिर्ला मंदिर, भानगढ, चोखी दानी अशी काही ठिकाणं दिसतील. अंबर फोर्ट, नाहरगड यांसारखे किल्ले फिरताना तुम्हाला गाईडची गरज आहे. कारण ही ठिकाणं तुम्हाला नुसती फिरुन काहीच कळणार नाही. त्यामुळे बार्गेन करुन गाईड मिळवा. तुम्हाला इतिहास कळल्यानंतर त्या किल्ल्यांचे महत्त्व कळेल. त्या काळात प्र्त्येक ऋतुनुसार राणीसाठी खास खोल्या बनवल्या होत्या तेथील यंत्रणा, त्या प्रत्येक खोलीतील नक्षीकाम हे आजही टिकून आहे. त्या नक्षीकामातही दडलेल्या काही गोष्टी तुम्हाला फक्त गाईडच सांगू शकतो.  त्यामुळे घाई न करता तुम्ही अगदी सावकाशपणे गाईड घ्या आणि त्याचे महत्व जाणून घ्या. तुम्ही गाईड घेतल्यानंतर तोच तुम्हाला तुमचे चांगले फोटो कुठे येतील ते सांगू शकतो. त्यामुळे तुमचे फोटोही चांगले येतील.

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

जयपूरमध्ये आनंद घ्या या पदार्थांचा

दालबाटी चुरमा

Instagram

ADVERTISEMENT

आता प्रत्येक शहरातील काही पदार्थ हे खास असतात. राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर तसे समृद्ध आहे. पण आजही येथील धाब्यांमध्ये तुम्हाला तेथील काही खास पदार्थ मिळू शकतात. या खास पदार्थांमध्ये येते ते दाल-बाटी- चुरमा.. कणकेचे भाजलेले गोळे फोडून त्यावर डाळ घालून ते खाता येतात. त्यासोबत गव्हाचा किंवा बेसनाचा गोड चुरमा ( सुका शीरा) दिला जातो. जो तुम्ही चाखायलाच हवा. या शिवाय तुम्हाला अगदी टीपिकल पदार्थ हवा असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी आणि लसूणची चटणी चाखायला हवी. या ठिकाणी तुम्हाला भरभरुन साजूक तूप वाढले जाते. यासोबतच तुम्हाला या ठिकाणी अगदी सगळीकडे मिळेल ते म्हणजे घेवर आणि फिणींया हा गोड पदार्थ तुम्हाला सगळ्या मिष्टान भंडारमध्ये मिळू शकेल. 

चोकी ढाणी: जयपूर शहरापासून थोडेसे दूर हे ठिकाण आहे. जिथे राजस्थानमधील गावाचा देखावा बनवण्यात आला आहे. जिथे तुम्हाला राजस्थामधील घरं, तेथील संस्कृती याचा अनुभव येईल. 750 रुपये एंट्री फी असून संध्याकाळी 5 वाजता ते 12 या वेळेपर्यंत ते सुरु असते. तुम्ही संध्याकाळी लवकर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी बरेच काही करता येईल. 

खरेदी करताना

बापू बाजार, जयपूर

Instagram

ADVERTISEMENT

आता कुठेही गेल्यानंतर अनेकांचा वीक पॉईंट असतो ते म्हणजे शॉपिंग. आता जयपूरमध्ये जोहरी बाजार, बापू बाजार, त्रिपोला बाजार, माणेक चौक, चांदपोल बाझार अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला मोजडी, ब्लॉक प्रिंट केलेले कपडे, कुडते, ओढणी, उंटाच्या चामड्याच्या बॅगा अशा काही गोष्टी अगदी चांगल्या दरात मिळू शकतील.काही गोष्टी तुम्हाला मुंबईत किंवा इतर बाजारांमध्ये पाहिलेल्या देखील वाटतील.त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी काही खास दुकानांमधून खरेदी करा. चोखीदाणी आणि अंबर फोर्टच्या आजुबाजूला काही गावं आहेत जिथे तुम्हाला ट्रेडिशनलपद्धतीने तयार झालेले कपडे अगदी हमखास मिळतील. त्यामुळे तुम्ही कुडते, ओढणी, चादरी, मोजडी,लाखेच्या बांगड्या, कुंदनचे दागिने यांची खरेदी करु शकता.

असं करा प्लॅनिंग?

Facebook

जर तुम्ही सगळं वाचल्यानंतर जयपूरला जाण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला तेथे जाण्यासाठी योग्य कालावधी माहीत हवा. जयपूरला जाण्यासाठी योग्य कालावधी हा नोव्हेंबर ते मार्च आहे. त्यानंतर या ठिकाणी उकाडा जाणवायला लागतो. तसं तर वर्षभर जयपूरमध्ये काहींना काही फेस्टिवल्स असतात. त्यानुसारही तुम्ही याचे प्लॅनिंग करु शकता. 

ADVERTISEMENT
  • जर तुम्ही फ्लाईटने जाण्याचा निर्णय घेत असाल तर तुमचा वेळ वाचू शकते.  मुंबईवरुन जयपूरच्या बऱ्याच फ्लाईट आहे. जर तुम्ही सोमवार ते शुक्रवार असं बुकींग केलं तर तुम्हाला तिकिट साधारण 2500 ते 3हजार रुपयांपर्यंत मिळेल. 
  • तुम्ही स्वत: सगळं प्लॅनिंग करुन जात असाल तर तुमच्यासाठी चांदपोल बझार, एम. जी.रोड, बापू बझार अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला तुमच्या बजेटमधील हॉटेल्स मिळतील. अगदी 1हजार पासून तुम्हाला इथे चांगली उत्तम  सुविधा असलेली हॉटेल्स मिळतील. 
  • आता तुम्ही साईट सीनचा विचार करत असाल तर येथील किल्ले फार मोठे आहेत. त्यामुळे एका दिवशी एक किल्ला आणि पॅलेस असं फिरलात तर तुम्हाला 3 दिवस पुरेशे आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्ही ओला करु शकता. पण किल्ल्यांवर तुम्हाला ओला किंवा उबर मिळेल असे सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या हॉटेलच्या आजुबाजूला असणाऱ्या ऑटो निवडता येतील. साधारण 800 रुपयांमध्ये तुम्हाला दिवसभरात 5 ते 6 ठिकाणं फिरवली जातात. ( येथील रिक्षा ड्रायव्हर तुम्हाला काही हॉटेल किंवा शॉपिंग करण्यासाठी काही दुकांनाना घेऊ जातील. पण तुम्ही नको तिथे पैसा घालवू नका. कारण त्यांच्या मार्केटींगसाठी ही दुकानं असतात. ज्यामुळे तुमचा नाहक वेळ वाया जातो. त्यामुळे तुम्हाला कुठे जायचे ते त्यांना अगदी ठामपणे सांगा.

मग आता जयपूरला जाण्याचा विचार करत असाल तर मग आतापासूनच प्लॅनिंग करा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

26 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT