मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार ही बापलेकाची जोडी

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार ही बापलेकाची जोडी

चित्रपटाचा अनुभव हा किती वेगळा असेल ना.. जेव्हा खऱ्या आयुष्यातील बापलेक मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची कमाल दाखवतील. हिंदी चित्रपटात आत्तापर्यंत अनेक बापलेकाच्या जोड्या झळकल्या आहेत. ज्यामध्ये बिग बी अमिताभ - अभिषेक बच्चन, ऋषी - रणबीर कपूर, धर्मेंद्र - सनी देओल यांच्या जोड्या प्रामुख्याने आहेत. त्यानंतर आता बऱ्याच काळाने पुन्हा एकदा बापलेक जॅकी आणि टायगर श्रॉफ चित्रपटात दिसणार आहेत. टायगरच्या आगामी बागी 3' मध्ये ते दिसतील. 

'बागी 3' च्या निमित्ताने आला तो सुवर्णक्षण

अखेर साजिद यांना बागी 3 च्या निमित्ताने ती सुवर्णसंधी मिळाली. कारण या चित्रपटातील दोघांच्याही भूमिका न्याय करणाऱ्या आहेत. चित्रपटात जॅकी असल्याने प्रेक्षकही नक्कीच या चित्रपटाकडे आकर्षित होतील आणि मला विश्वास आहे की त्यांना एकत्र पाहून प्रेक्षकांनाही नक्कीच मजा येईल.

Instagram

अहमद खानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटात जग्गूदादा जॅकी श्रॉफ एक्शन स्टार टायगरच्या ऑनस्क्रीन वडिलांच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे निर्माते या दोघांच्या कास्टिंगमुळे खूपच उत्सुक आहेत. कारण या दोघांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र आणण्याचं श्रेय त्यांच्या चित्रपटाला मिळणार आहे. चित्रपट 'बागी 3' चे निर्माता साजिद नाडियादवाला यांनीही जॅकी आणि टायगरच्या जोडीबाबत प्रतिक्रियाही दिली आहे की, 'या चित्रपटात जॅकी श्रॉफ एका पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत दिसतील. जेव्हा आम्ही टायगरला लाँच केलं होतं. तेव्हापासून या बापलेकाच्या जोडीला आम्हाला एकत्र पडद्यावर पाहायचं होतं. ते एकत्र येण्याबाबत अनेक बातम्याही आल्या पण गेली सहा वर्ष आम्हाला त्यांना एकत्र आणणं शक्य झालं नव्हतं. कारण जॅकी आणि टायगर या दोघांचंही म्हणणं होतं की, एखादा चित्रपट किंवा भूमिका त्यांच्या उपस्थितीला न्याय देणारी असेल तेव्हाचे ते एकत्र येतील.

बागी सीरिजमधला तिसरा चित्रपट

टायगरचा आणि बागी सीरिजमधला हा तिसरा चित्रपट आहे. आत्तापर्यंत टायगर बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहे आणि त्याचा स्वतःचा असा चाहतावर्गही आहे. नुकत्याच हृतिकसोबत टायगरचा आलेला 'वॉर' हा चित्रपटही प्रेक्षकांनी पसंत केला होता. त्यानंतर आता टायगरचा 'बागी 3' येत आहे. टायगरसोबत या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर, रितेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सीरिजच्या आधीच्या दोन चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर एक्शन पाहायला मिळाली होती. या चित्रपटांमध्ये एक्शनचा भरपूर तडका असेलच. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.