अनावश्यक केस काढण्यासाठीच नाही तर या कारणांसाठीही रिका वॅक्स आहे बेस्ट

अनावश्यक केस काढण्यासाठीच नाही तर या कारणांसाठीही रिका वॅक्स आहे बेस्ट

महिन्यातून एकदा तरी वॅक्स करण्यासाठी आपण पार्लर किंवा सलोनमध्ये जातो. तुमच्या त्वचेसाठी चांगले वॅक्स कोणते हे ज्यावेळी तुम्ही विचारता त्यावेळी तुम्हाला भलीमोठी यादीच सांगितली जाते. वॅक्सचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्ही या पैकी तुम्हाला हवे असलेले कोणतेही वॅक्स निवडू शकता. पण सध्या सगळ्यात बेस्ट वॅक्स म्हणून ओळखले जाते ते रिका वॅक्स (Rica Wax) तुम्ही कधीही हे वॅक्स वापरुन केस काढले नसतील तर या रिका वॅक्सचे फायदे जाणून घ्या. कारण अनावश्यक केस काढण्यासाठी नाही तर इतरही कारणांसाठी रिका वॅक्स बेस्ट आहे. जाणून घेऊया रिका वॅक्सचे फायदे

*बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

रिका वॅक्स (Rica Wax) म्हणजे काय?

Instagram

तुमच्या नियमित मध आणि लिंबाच्या वॅक्सपेक्षा रिका वॅक्स दिसायला फारच वेगळे असते. रिका वॅक्स हे मनुक्यांचा अर्क आणि व्हेजिटेबल ऑईलचा उपयोग करुन बनवले जाते. यामध्येही वेगवेगळे फ्लेवर असतात. हे वॅक्स थोडेसे मेणासारखे दिसते. ते वितळवण्यासाठी एक वेगळी मशीनसुद्धा असते. याचा मेल्टींग पॉईंट थोडा जास्त असतो. हे वॅक्स काढताना साध्या वॅक्सप्रमाणे जळजळ होत नाही. उलट नाजूक त्वचेसाठी रिका वॅक्स चांगले असे म्हटले जाते. पण नाजूक त्वचा असणाऱ्यांनी त्याचा वापर करताना एक्सपर्टचा सल्ला घेणे नेहमीच चांगले राहील.)

कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स वापरुन झटपट आणि सुरक्षित पद्धतीने काढा अनावश्यक केस

रिका वॅक्सचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

shutterstock

टॅन काढून टाकते :हल्ली सगळ्यांनाच त्रास असतो तो म्हणजे टॅनचा. त्वचेवरील वरच्या थरावर ऊनाचा थेट परीणाम झाल्यामुळे त्वचा काळवंडलेली दिसू लागणे यालाच आपण त्वचा टॅन झाली असे म्हणतो. रिका वॅक्समुळे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे टॅन काढण्यासाठी रिका वॅक्स एकदम बेस्ट आहे. हळुवारपणे केस काढताना तुमच्या त्वचेच्या वरच्या थरावरील टॅनही काढण्यास रिका वॅक्स मदत करते.


त्वचेचा मुलायमपणा ठेवते टिकून :  शरीरावरील अनावश्यक केस निघाल्यानंतर तुमची त्वचा आपसुकच मुलायम वाटू लागते. पण रिका वॅक्सनंतर तुमची त्वचा अधिक मुलायम वाटते. रिका वॅक्स केल्यानंतर तुम्हाला पोस्ट केअरसाठी सुगंधी तेल लावले जाते. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली वाटते. 


त्वचेची जळजळ होत नाही: सर्वसाधारणपणे वॅक्स केल्यानंतर त्वचेची जळजळ, त्वचा लाल पडणे असे त्रास होतात. पण रिकाच्या बाबतीत असे होत नाही. तुम्हाला हे वॅक्स सतत एकाच जागी लावावे लागत नाही. तुमचे अर्धवट वाढलेले केससुद्धा हे वॅक्स अगदी सफाईदारपणे काढू शकते. 


जास्त काळ टिकते: महिन्यातून एकदाही वॅक्सला जाण्याचा अनेकांना कंटाळा असतो. तुम्हालाही असा कंटाळा असेल तर तुमच्यासाठी रिका वॅक्स सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण हे वॅक्स केल्यानंतर महिनाभर तुम्हाला वाट पाहावी लागत नाही. 


कोणत्याही त्वचेसाठी चांगले: तुमची त्वचा कोणतीही असली तरी तुमच्या कोणत्याही त्वचेसाठी हे वॅक्स चांगले आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करु शकता. पण हे वॅक्स करताना तुम्हाला एक्सपर्टची गरज असते. 


आता तुम्ही वॅक्स करायला जाणारा असाल तर रिका वॅक्स नक्की करा आणि या वॅक्सचे फायदे मिळवा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/