थंडीच्या दिवसात आवर्जून खावेत डिंकाचे पदार्थ

थंडीच्या दिवसात आवर्जून खावेत डिंकाचे पदार्थ

थंडीच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या टाईमटेबलमध्ये बरेच बदल होतात. या दिवसांमध्ये उष्णपदार्थ आवर्जून खावे असा सल्ला आवर्जून दिला जातो. यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच त्यासोबतच अनेक आजारांपासूनही रक्षण होते. याच कारणामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू बनवले जातात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. तसंच डिंक भाजूनही खातात. अशाप्रकारे डिंक खाल्ल्यास हाडंही मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसात दुखत नाहीत. तसंही डिंकाचा उपयोग औषधं, बेकरी आणि ब्युटी प्रोडक्ट्समध्येही वापरला जातो. याशिवाय एनर्जी ड्रींक्स, आईसक्रिममध्येही डिंकाचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया डिंक खाण्याचे फायदे.

कोणता डिंक खावा?

झाडाच्या खोडाला छेद देऊन जो चीक निघतो. त्याला साठवलं जातं आणि तो कडक झाल्यावर त्याचा वापर केला जातो. त्यालाच डिंक म्हणतात. पण लक्षात घ्या की, प्रत्येक झाडातून निघणारा डिंक खाण्यालायक नसतो. बाभळीचा झाडाचा डिंक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. बाजारात तुम्हाला खाण्याचा डिंक अगदी सहज मिळतो. आजकाल तर तुम्हाला ऑनलाईनही ऑर्डर करता येतो.

Instagram

  • सांधेदुखीला ठेवतं लांब 

थंडीच्या दिवसात डिंकाचं सेवन सर्वात फायदेशीर मानलं जातं. कारण यामुळे शरीराला उष्णता मिळते. सकाळच्या वेळी डिंक खाणं चांगलं मानलं जातं. थंडीच्या दिवसात डोक्याला तरतरी यावी आणि सांधेदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी डिंक खाण्याचा फायदा होतो. डिंकामुळे हाडंही मजबूत होतात. डिप्रेशनपासूनही सुटका होते आणि मांसपेशीही मजबूत होतात. 

  • स्टॅमिना आणि प्रतिकार शक्ती वाढते 

डिंक खाल्ल्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून डिंकाचे लाडू केले जातात आणि खाल्ले जातात. 

  • प्रसूतीनंतर आईला चांगलं दूध येण्यासाठी 

प्रसूतीनंतर नवजात शिशूच्या आईला डिंकाचे लाडू दिले जातात. प्रसूतीनंतर चांगलं दूध यावं आणि हाडांना बळकटी मिळवण्यासाठी डिंकाचा उपयोग होतो.  

  • त्वचेसाठीही आहे फायदेशीर 

डिंक हा त्वचेसाठीही चांगला असतो. डिंक स्किन केअर एजंटच्या रूपात कार्य करतो आणि चेहऱ्याला पोषण देतो. 

  • फुफ्फुस्सांची समस्याही होईल दूर 

ज्या लोकांना फुफ्फुस्सासंबंधित त्रास असतो, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्यांनी डिंक अवश्य खावा. 

  • हृदयासाठीही आहे लाभदायक 

रोज भाजलेला डिंक खाल्ल्यास हृदयविकाराचा थोका टाळता येईल. हृदयासंबंधित इतर रोगांवरही डिंक फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी डिंकाचे लाडू किंवा खीर करून त्याचं सेवन करावं.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.