केळं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हे एक असं फळ आहे जे चविष्ट तर आहेच. पण सोबतच वजन वाढण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन्हीप्रकारे मदत करतं. जितकं फायदेशीर पिकलेलं केळं आहे तितकंच गुणकारी कच्चं केळंही आहे. चला जाणून घेऊया कच्चं केळं खाण्याचे फायदे.
एक्सपर्ट्सनुसार, कच्चं केळं व्हिटॅमीन-सी, मॅग्नेशियम, कॉपर, व्हिटॅमीन बी- 6 युक्त असतं. हे शरीरातील उर्जेच्या पातळीला चालना देतं.
बद्धकोष्ठाची समस्या ही खूपच कॉमन आहे. तसंही आपल्या लाईफस्टाईलमध्ये आता अनेक बदल झाले आहेत. ज्यामुळे प्रत्येक दिवशी काही ना काही पोटाशी निगडीत समस्या आपल्या जाणवतात. फायबरयुक्त असल्यामुळे कच्च्या केळ्याची भाजी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
कच्च्या केळ्यात ट्रिप्टोफॉन आढळतं. जे शरीरात जाऊन प्रक्रिया झाल्यावर सेरोटॉनिनमध्ये बदलतं. सेरोटॉनिन मेंदूसाठी हॅपी हार्मोन्सप्रमाणे काम करतं. हे डिप्रेशन आणि भीतीसारख्या आजारांना दूर ठेवतं.
कच्च्या केळ्याची भाजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाल्ल्यास तुम्हाला पोटासंबंधी असलेल्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. कारण तुमची पचन शक्ती यामुळे वाढेल.
कच्च्या केळ्याच्या सेवनाने डायरियासारख्या आजारातही लगेच आराम मिळतो. यामुळे पचन सहज होतं, कारण यात फायबर्स आणि पाण्याची मात्राही असते. जे शरीरातील सर्व पोषक तत्त्वं मजबूत बनवतात.
मग तुम्हीही पिकलेली केळी खाण्यासोबतच आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा तरी कच्च्या केळ्याची भाजी किंवा त्यापासून बनवलेल्या इतर पदार्थांच्या आहारात नक्की समावेश करा. तुमच्या पोटासंबंधीच्या समस्या नक्कीच दूर होतील.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तसंच अजून कोणत्या विषयावरील लेख तुम्हाला वाचायला आवडतील तेही आम्हाला नक्की सांगा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.