हिवाळ्यात तिळाचं तेल खाण्याचे फायदे आपण नेहमीच ऐकले आहेत. अगदी मकर संक्रांतही जानेवारी महिन्यात भर थंडीत येते आणि यावेळी आपण सगळेच तिळगूळ आणि गुळाच्या पोळीचा आस्वाद घेत असतो. कारण थंडीच्या दिवसात याचं सेवन करणं जास्त चांगलं असतं. त्याचा शरीराला फायदा होतो. पण आपल्या त्वचेसाठीही तिळाच्या तेलाचा फायदा होत असतो याची तुम्हाला कल्पना आहे का? खरं तर त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक तेल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण या सगळ्यात सीसेम ऑईल अर्थात तिळाचं तेल हे त्वचेसाठी सर्वात जास्त थंडीमध्ये परिणामकारक आहे. आपल्या शरीराप्रमाणेच त्वचेलाही तिळाच्या तेलाचा थंडीमध्ये फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडते. या त्रासापासून तिळाचं तेल सुटका मिळवून देण्यास फायदेशीर ठरतं. आपली त्वचा अधिक मऊ आणि चमकदार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. या लेखातून आम्ही थंडीत तिळाचं तेल वापरून त्वचा अधिक चमकदार आणि मऊ कशी होते ते सांगणार आहोत. तुम्ही इतरही तेल वापरत असलात तरीही तिळाच्या तेलाचा वापर करून पाहा आणि तुमच्या त्वचेमध्ये नक्की काय फरक येतो तेदेखील पाहा. जाणून घेऊया नक्की काय फायदा होतो.
तिळाच्या तेलामध्ये असे गुणधर्म आहेत जे तुमच्या चेहऱ्यावर जादुई परिणाम दाखवतात. यामध्ये त्वचेसंबंधी प्रत्येक त्रासासाठी उपाय लपलेला आहे. चेहऱ्यावरील डाग अथवा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर करण्यासाठी आणि चेहरा अधिक चमकदार बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्हीदेखील तिळाच्या तेलाचा वापर तुमच्या चेहऱ्यासाठी रोज करू शकता.
इतकंच नाही तर तिळाचं तेल हे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. यामध्ये असणारे अँटिएजिंग गुणधर्म हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चेहरा अधिक चमकदार बनवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही वाढत्या वयातही अधिक सुंदर दिसता. बाजारातील महाग उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नियमित तिळाच्या तेलाचा वापर केल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळेल.
तिळाच्या तेलामध्ये विटामिन बी, डी आणि ई या तिन्हीचं प्रमाण अधिक असतं. जे आपल्या त्वचेसाठी उत्कृष्ट ठरतं. त्वचेतील कोरडेपणा काढून टाकून त्वचेवरील निस्तेजपणा काढून टाकण्यासाठी या तिनही विटामिन्सचा उपयोग होतो. त्यामुळे तिळाचं तेल वापरताना नेहमी लक्षात ठेवा की, याचा आपल्या चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी अधिक फायदा होतो.
DIY: हिवाळ्यात केसगळतीची असेल समस्या तर घरीच बनवा मेथी दाण्याचं तेल
तिळाचं तेल हे नैसर्गिक मॉईस्चराईजरचं काम करतं. त्वचेतील कोरडेपणा दूर करून त्वचेमध्ये अधिक मऊ आणि मुलायमपणा आणण्याचं काम तिळाचं तेल करतं. विशेषतः थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी होत असते. त्यावेळी तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही नैसर्गिक मॉईस्चराईजर म्हणूनही करू शकता. दिवसभर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि मुलायम ठेवायची असेल तर नक्कीच तुम्ही याचा वापर करा. तिळाच्या तेलामध्ये असणारे फॅटी अॅसिड्स हे चेहऱ्यावर प्रभावी मॉईस्चराईज म्हणून काम करतात.
तिळाच्या तेलामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबायल घटक असतात जे आपल्या चेहऱ्यावरील जमलेली धूळ, घाण काढून टाकण्यास मदत करतात. त्याशिवाय चेहऱ्यावर सूज आली असेल अथवा चेहऱ्यावर खाज येत असेल तर हा त्रास दूर करण्याचं कामही तिळाचं तेल करतं.
रोज रात्री झोपण्यापूर्वी पहिले तिळाचं तेल चेहऱ्याला लावा आणि मालिश करा आणि मग झोपा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. रोज असं केल्यास, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक दिसून येईील. पण यासाठी तुम्हाला हेदेखील जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमची त्वचा तेलकट आहे की, कोरडी आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, पहिले तुम्ही क्लिंन्झरने त्वचा स्वच्छ करून घ्या आणि मगच तिळाचं तेल लावा. तसंच तेलकट त्वचा असेल तर तुम्ही रोज तिळाचं तेल वापरू नका. आठवड्यातून केवळ 3-4 वेळाच तिळाचं तेल लावून मालिश करा. तुमची त्वचा उत्तम राहील.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.