हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

पूर्वीपासून हळदीच्या दुधाचे फायदे सांगण्यात येत आहेत. पण त्याचा फारसा उपयोग कोणी करत नव्हतं. पण आता मोठमोठ्या कॅफे हाऊसमध्येही हळदीचं दूध विकण्यात येतं तेव्हा नक्कीच यामध्ये काहीतरी महत्त्वाचं असणार याची कल्पना अगदी तरूण पिढीलाही यायला लागली आहे. यामध्ये अगदी आलं, मध, दालचिनी आणि इतर मसाल्यांचा वापर करूनही हळदीचं दूध लोकं प्यायला लागले आहेत. पण सर्वात जास्त भारतीय लोकं हे केवळ हळदीचं दूध पिण्याला प्राधान्य देतात आणि त्याचे फायदेही अनेक आहेत. अगदी खोकला सर्दी झाली असल्यापासून ते शरीरातील अँटिबायोटिक्स असणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढा देण्यासही हळदीचं दूध उपयोगी ठरतं. गळ्यात होणारी खवखव, हंगामानुसार येणारा ताप हे सर्व बरं करण्यासाठीही हळदीच्या दुधाचा वापर करता येतो. हळदीमध्ये अनेक औषधीय गुण उपस्थित आहेत. या औषधीय गुणांमुळेच अनेक गोष्टींवर हे उपायकारक आहे. हळदीच्या दुधाचे नक्की काय आश्चर्यकारक फायदे आहेत ते जाणून घेऊया - 

हळदीच्या दुधाचे फायदे

Shutterstock

हळदीचं दूध नियमित प्यायल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. त्याचीच इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. जाणून घेऊया काय आहेत फायदे - 

1. शरीराला आतून जखम झाल्यास

Shutterstock

शरीराला बाहेरून जखम झाल्यावर त्यावर हळद हे उत्तम औषध आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे शरीराच्या आतही त्याचा खोलपर्यंत त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी अँटिसेप्टिक असं हळदीचं दूध पिणं योग्य आहे. इतकंच नाही हळदीच्या दुधाचं नियमित सेवन केल्याने तुम्हाला जर टाईप - 2 चा मधुमेह असेल तर तोदेखील बरा होण्यासाठी याचा उपयोग होतो. 

2. स्मरणशक्ती चांगली ठेवते

एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी विसरण्याचा आजार असेल तर अशा व्यक्तींना हळदीचं दूध पिणं योग्य आहे. हळदीचं दूध हे तुमची स्मरणशक्ती चांगली ठेवते आणि विस्मरणात जाणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी  याचा उपयोग होतो. 

नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर

3. हाडांची मजबूती ठेवण्यास मदत

Shutterstock

हळदीमध्ये आढळणाऱ्या अँटिबायोटिक्स आणि दुधात असणाऱ्या कॅल्शियम या दोन्हीमुळे हाडांची मजबूती अधिक चांगली करण्यासाठी हळदीच्या दुधाचा फायदा तुम्हाला मिळतो. कोणत्याही प्रकाराचं हाडांचं फ्रॅक्चर अथवा डॅमेज असेल तर ते बरं होण्यासाठी अगदी डॉक्टरांकडूनही हळदीच्या दुधाचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे हळदीच्या दुधात नक्की किती ताकद असेल याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. 

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय

4. मधुमेह कमी करून वजन आणतं नियंत्रणात

हळदीच्या दुधाचं मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने नियमित आणि प्रमाणात रोज सेवन केलं तर मधुमेह बरा होण्यात अर्थात नियंत्रणात राहण्यास मदत होते.  त्याचप्रमाणे तुम्हाला वजन वाढण्याचा आजार असेल तर हळदीच्या दुधाने वजन कमी करण्यासही फायदा मिळतो. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीला नियंत्रणात आणण्यासाठी याचा हमखास उपयोग होतो. 

5. मासिक पाळीमध्ये उपयुक्त

हळदीचं दूध हे मासिक पाळीच्या दुखण्यावर रामबाण इलाज आहे. त्याशिवाय बाळाच्या डिलिव्हरीनंतर लवकरात लवकर रिकव्हरी व्हावी यासाठीही महिलांना हळदीचं दूध देण्यात येतं. याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे डिलिव्हरीनंतर हळदीचं दूध पित राहिल्यास, बाळासाठी ब्रेस्ट मिल्क अधिक चांगल्या प्रमाणात मिळतं. त्याचप्रमाणे यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे याचा औषध म्हणूनही वापर करता येतो. 

कच्च्या हळदीचा चहा पिऊन वाढवा प्रतिकारशक्ती

6. झोप चांगली लागण्यास फायदेशीर

Shutterstock

हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. हळदीमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिडमुळे हळदीचं दूध प्यायल्यास, झोप चांगली लागण्यास मदत मिळते. आजकालच्या व्यस्त आयुष्यात झोपेसाठी फारच कमी मिळतो. जरी मिळाला तरी चिंतांमुळे झोप लागत नाही. अशावेळी चांगल्या झोपेसाठी तुम्ही हळदीचं दूध नक्की प्या. त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.