सुंदर, मुलायम घनदाट केस सगळ्यांनाच हवे असतात. यासाठी केसाची काळजी प्रत्येकजण अगदी आवर्जुन घेते. म्हणजे केसांना तेल लावण्यापासून ते मसाज करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी छान आवडीच्या आणि सोयीस्कर पडणाऱ्या टिप्स सारख्या तंतोतंत केल्या जातात. पण इतकं सगळं करुनही काहींना हवा तसा केसांचा पोत मिळत नाही. काहींच्या केसांचा सतत गुंता होतो. कितीही केस विंचरले तरी मानेच्या भागाकडील केसांचा गुंता सुटता सुटत नाही. अशावेळी जर तुम्ही कंगवा वापरत असाल तर तुम्हाला हेअर ब्रश वापरण्याचे फायदे माहीत हवेत. म्हणूनच आज आपण हेअरब्रश विषयी माहिती घेणार आहोत. मग करुया सुरुवात
कंगवा आणि हेअर ब्रशमधील फरक तुम्हाला नक्कीच माहीत असेल. कंगवा हा चपटा असतो. त्यावर कोणत्याही प्रकारचे ब्रीसलसारखे दात नसतात. तर ब्रश म्हणजे एका गोलाकार किंवा चपच्या पृष्ठावर प्लास्टिकचे बारीक बारीक दात असतात. आता हा सर्वसाधारण फरक तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल.
खूप जणांना ऑफिसमध्ये किंवा प्रवासात कॅरी करण्यासाठी कंगवा हा बेस्ट वाटतो.हल्ली तर कंगव्याचे इतके प्रकार मिळतात की, केस पटकन विंचरायचे झाले तरीही पाकिटातून कंगवा काढून तो केसांवर फिरवला जातो. पण कंगवा वापरताना तुमचे केस तुटण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही कितीही मऊ कंगवे वापरले तरी तुमचे केस तुटतात. केसांचा गुंता कंगव्याने पटकन निघत नाही. गुंता काढताना स्काल्प दुखावली जाते. शिवाय हा गुंता कोरड्या केसाने काढताना केसांना त्रास होतो. केसांना तेल लावल्याशिवाय केसांचा गुंता सुटत नाही. त्यामुळे केसांचा गुंता काढणे कंगव्यामुळे फारच कठीण असते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.