तुम्हाला मेकअप आला नाही तरी चालेल पण तुम्हाला आयलायनर लावता यायलाच हवे. कारण डोळ्यांचा मेकअप तुम्हाला उत्कृष्ट करता आला तर तुमच्या इतर मेकअपकडे पाहण्याची कधीही इच्छा होत नाही. मेकअप किटमधील आयलायनर हा असा प्रकार आहे जो लावायला कठीण वाटला पण जर तो तुम्ही योग्य पद्धतीने लावला तर तुमचे डोळे उठून दिसतात. आयलायनर लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या शिवाय आयलायनरचेही वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही डोळ्यांसाठी योग्य आयलायनर कोणते याच्या शोधात असाल तर आज आपण beginners पासून ते Pro पर्यंत तुमच्यासाठी योग्य आयलायनर कोणते ते पाहुया. मग करुया सुरुवात
आयलायनर लावण्याचा तुम्ही विचार केला असेल तर तुम्हाला आयलायनरचे वेगवेगळे प्रकार माहीत हवेत. सगळ्यात आधी जाणून घेऊया आयलायनरचे वेगवेगळे प्रकार
लिक्वीड आयलायनर हा प्रकार सगळ्यांनाच सर्वश्रुत असेल. हे लिक्वीड आयलायनर लावण्यासाठी त्यामध्ये एक ब्रश असतो. तुम्हाला अत्यंत सफाईदारपणे तुम्हाला हे लायनर लावायचे असते. हे लायनर सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंगाचे पर्याय मिळतात. पण तुम्ही अगदी नव्याने हे लायनर लावायला सुरुवात करणार असाल तर या आयलायनरची निवड मुळीच करु नका. किंवा तुमच्या सहनशक्ती कमी असेल तर हे आयलायनर तुमच्यासाठी मुळीच नाही.
असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)
क्रिम किंवा जेल बेसमध्ये असलेले हे जेल आयलायनर सध्या अनेकांच्या पसंतीला उतरते. कारण हे लावण्यासाठी फारच सोपे असते. शिवाय जेल स्वरुपात असल्यामुळे हे आयलायनर स्मज होत नाही. तुम्हाला लावायला देखील हे आयलायनर सोपे पडते. काजळाच्या डबीप्रमाणे हे आयलायनर मिळते आणि त्यासोबत तुम्हाला एक ब्रश मिळतो. या ब्रशमुळे आयलायनरचा स्ट्रोक छान लागतो. हे आयलायनर जास्त काळ टिकतो
आता सगळ्यात सोपा आणि काहीही त्रास न देणारा प्रकार म्हणजे रेग्युलर पेन्सिल आयलायनर. पेन्सिल टीपमध्ये असलेले हे आयलायनर लावायला सोपे असते. हे पटकन सुकते. शिवाय याच्या टीपमुळे तुम्हाला विंग्ज किंवा साधे लायनर लावायला मदत मिळते. नव्याने आयलायनर लावणाऱ्यांसाठीही हा प्रकार एकदम योग्य आहे. हल्ली या प्रकारामध्येही तुम्हाला शेड्स मिळतात.
कोहल आयलनरविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला तुमच्या डोळ्यांसाठी गडद काळ्या रंगाचे आयलायनर हवे असेल तर तुमच्यासाठी कोहल आयलायनर हे बेस्ट आहेत. कोहल आयलायनरमध्ये कार्बन आर्यन ऑक्साईड असते. ज्यामुळे त्याचा रंग गडद काळा दिसतो. कोहल आयलायनर पेन्सिल स्वरुपात मिळते. त्याचा जास्तीत जास्त उपयोग तुम्ही स्मोकी आईज करण्यासाठी अगदी हमखास करु शकता.
आयलायनर हे डोळ्यांच्या वर लावले जाते. तर काजळ हे डोळ्यांमध्ये घातले जाते. आता जर तुम्ही डोळ्यांच्यावर आणि डोळ्यांंमध्ये लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे काजळ चालू शकते. पेन्सिल आयलायनर स्वरुपातील काजळ आयलायनर लावायला सोपे असते. शिवाय हे जास्त काळ टिकते सुद्धा. त्यामुळे तुम्ही या आयलायनरता अगदी हमखास वापर करु शकता.
आता सगळ्यांनाच आयलायनर किंवा काजळ डोळ्यांच्या बाहेर आलेले आवडत नाही. त्यांना आयलायनर अगदी पातळ आवडते. मेकॅनिकल ट्विस्ट अप आयलायनर अगदी तसेच आहे. या आयलायरचे टीप शार्प नसतात. त्यामुळे हे आयलायनर लावायला तसे सोपे असते. तुम्हाला रोजच्या वापरासाठी हे आयलायनर वापरता येऊ शकते.
आयलायनर लावल्यानंतर ते काढणंही कठीण असतं तुम्हाला असं लायनर हवं आहे जे लावायलाही सोपे आणि काढायलाही तर ते आहे फेल्ट टिप आयलायनर हे थोडे ग्लॉसी असते. त्यामुळे ते लावल्यानंतर उठून दिसते. शिवाय ते थोडं प्लास्टिक कोटींग सारखं असल्यामुळे लवकर निघते. त्यामुळे तुम्हाला फारवेळ टिकणार आणि डोळे काळे करणारे आयलायनर नसतील तर तुम्ही फेल्ट टिप आयलायनर वापरु शकता.
आता तुम्ही आयलायनर घेण्याचा विचार नक्की केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही उत्तम लायनरची निवड केली आहे.
फायदे : बजेटमध्ये बसणाऱ्या प्रकारातील हे लायनर लागते आणि टिकतेही फार वेळ
तोटे : हे आयलायनर सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला थोडं सबुरीने घ्यावं लागत.
कसे लावाल : लायनरसोबत देण्यात आलेला ब्रश वापरण्यास फारच सोपा आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण एकदा सवय झाल्यानंतप तुम्हाला अगदी सहज हे लायनर लावता येईल.
फायदे : जर तुम्हाला पटकन लायनर लावायचे असेल तर हे लायनर चांगले आहे. या लायनरचा रंग गडद असल्यामुळे चांगला दिसतो.
तोटे : हे लायनर काढताना खूप त्रास होतो.
कसे लावाल : पेन्सिल लायनरचा हा प्रकार असल्यामुळे डोळ्यावर तुम्ही याची रेघ ओढू शकता
फायदे : जेल लायनर लावायला सोपे असते. यामध्ये गडबड होण्याची शक्यता कमी असते. तुम्ही अगदी आरामात हे लावू शकता.
तोटे : हे लावताना तुम्हाला तुमच्या डोळ्यांची त्वचा पकडून ठेवावी लागते.
कसे लावावे : हे लावण्यासाठी याच्यासोबत एक ब्रश दिला जातो. या ब्रशच्या टिपवर लायनर घेऊन तुम्ही तुमच्या डोळ्यांना हे लावा. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारही करता येतील.
फायदे : जेल आयलायनरमधील हा प्रकार क्रेऑनमध्ये मिळतो. खडूसारखा असल्यामुळे लावायला ते फारच सोपे पडते.
तोटे : जर तुम्हाला जाड लायनर नको असेल तर तुमच्यासाठी हे लायनर परफेक्ट नाही.
कसे लावाल : या आयलायनरची टिप थोडी मोठी असते त्यामुळे तुम्ही हे वापरताना थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. तुम्ही या पासून स्मोकी लुक देऊ शकता.
फायदे : लायनरचा हा प्रकार पटकन सुकतो. शिवाय हा थोडा ग्लॉसी असल्यामुळे चांगला दिसतो.
तोटे : तुम्ही जर लाँग लास्टींग टिकणारे लायनर पाहात असाल तर हे ते लायनर नाही.
कसे लावाल : हे आयलायनर लिक्वीड फॉर्ममध्ये असते. तुम्ही यामधील ब्रशने एका स्ट्रोकमध्ये हे लायनर लावू शकता. पार्टीसाठी हे लायनर चांगले आहे.
फायदे : लावायला सोपे आणि यामध्ये मिळणाऱ्या शेड्स तुमच्या लुकला उठाव आणू शकतात. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी ते लावू शकता.
तोटे : याची किंमत इतर ब्रँडच्या तुलनेत जरा जास्त आहे
कसे लावाल : इतर जेल आयलायनरप्रमाणेच तुम्ही हे जेल आयलायनर लावू शकता. यासोबत मिळणारा ब्रश तुम्हाला हवा असलेला लुक देऊ शकतो. डोळ्यांच्या कडांपासून लायनर लावायला सुरुवात करा.त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने ते लागेल.
फायदे : कलरबारचे प्रोडक्ट उत्तम असतात. तुम्हाला मॅट लुक देणारे हे लायनर आहे. हे लायनर तुमच्या स्किनटोनसोबत छान सेट होते. त्यामुळे ते पटकन वेगळे दिसत नाही
तोटे : जर तुम्हाला मॅट आवडत नसेल तर हे आयलायनर तुमच्यासाठी नाही
कसे लावाल : लिक्वीड लायनर असल्यामुळे तुम्हाला ब्रशचा उपयोग करुन हे आयलायनर वापरायचे आहे.
फायदे : कतरिना कैफच्या ब्युटी रेंजमधील हे प्रोडक्ट आहे.याचे रिव्ह्यू चांगले आहेत. हे लायनर लावायला सोपे आहे. शिवाय याचा काळा रंग तुमच्या डोळ्यांवर उठून दिसतो.
तोटे : सध्या तरी या प्रोडक्टचे तोटे निदर्शनास आले नाहीत
कसे लावाल : तुम्हाला आयलायनर कोणत्या पद्धतीने लावायचे आहे हे ठरवून तुम्ही याचा वापर करा. तुम्हाला पेन्सिलप्रमाणे हे आयलायनर अगदी आरामात लावता येते.
फायदे : सुपर मॅट आणि स्मज फ्री आयलायनरचा शोध घेत असाल तर तुम्हाला हे लायनर नक्कीच आवडेल. हे लायनर जास्त काळ टिकते
तोटे : हे नुसत्या पाण्याने जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेकअप क्लिनझर वापरणे गरजेचे आहे
कसे लावाल : लिक्वीड लायनरप्रमाणे तुम्ही हे लायनर लावू शकता हे लायनर लावणे फारच सोपे आहे.
फायदे : याचे स्मुथ टेक्श्चर असल्यामुळे डोळ्यावर लायनर छान लागते. शिवाय तुम्हाला यामध्ये चांगल्या शे्डस मिळू शकतात. क्रेऑन असूनही याला सतत टोक काढावे लागत नाही.
तोटे : किंमत जास्त असून याचा मेन्टनंसही कठीण आहे. ही स्टीक तुटण्याची शक्यता अधिक असते.
कसे लावाल : इतर कोणत्याही पेन्सिलप्रमाणे तुम्हाला हे आयलायनर लावता येईल. बारीक टिप लावण्यासाठी थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक
फायदे : लावायला फारच सोपे. याची टीप बारीक असल्यामुळे तुम्हाला हवे तसे आयलायनर लावता येते.
तोटे : याची किंमत इतर पेन्सिलच्या तुलनेत अधिक आहे.
कसे लावाल : तुम्हाला स्केचपेनप्रमाणे डोळ्यांवर हे आयलायनर ओढायचे आहे
फायदे : जेल लायनर लावणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुमच्यासाठी ही जेल लायनर पेन्सिल उत्तम आहे
तोटे : याचे तोटे नाहीत असे म्हटल्यास ठिक. पण किंमत कदाचित जास्त वाटू शकते.
कसे लावाल : तुम्हाला पेन्सिलप्रमाणेच हे जेल लायनर लावायचे आहे
फायदे : ही पेन्सिल लावायला सोपी आहे. शिवाय याचा उपयोग तुम्ही स्मोकी आईजसाठी करु शकता
तोटे : तुम्हाला याची पॅकींग फार फॅन्सी वाटणार नाही.
कसे लावाल : इतर कोणत्याही पेन्सिल प्रमाणे तुम्हाला ही पेन्सिल लावायची आहे.
फायदे : या सोबत तीन टीप मिळतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट देता येतात.
तोटे : याचा योग्य वापर करणं तुम्हाला जमायला हवं
कसे लावावे : तुम्हाला मिळणाऱ्या वेगवेगळ्या टीपचा उपयोग करुन तुम्ही वेगवेगळे इफेक्ट द्या.
फायदे : ज्यांना ग्लॉसी आयलायनर आवडत असेल तर हे तुमच्यासाठी आहे. हे जास्त काळ टिकतेसुद्धा
तोटे : याचे तोटे असे नाही
कसे लावाल : जेल आयलायनर प्रमाणेच तुम्हाला हे लावायचे असते. पण याचा ब्रश लावायला फारच सोपा असतो.
फायदे : शुगरचे हे आयलायनर स्मज प्रुफ आहे. त्यामुळे तुम्ही सतत ट्रव्हल करणारे असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल.
तोटे : साधारण 9 तासानंतर या आयलायनरच्या खपल्या पडू लागतात.
कसे लावाल : लिक्वीड लायनरप्रमाणेच तुम्हाला हे आयलायनर लावायचे आहेत.
फायदे : तुमच्या पार्टी लुकसाठी हे आयलायनर परफेक्ट आहे.
तोटे : तुम्हाला रोज हे आयलायनर वापरता येणार नाही
कसे लावाल : ग्लिटर आयलायनर थोडं जाडसर असतं त्यामुळे तुम्हाला ते सफाईदारपणे लावायचे असेल. तर तुम्हाला ते व्यवस्थित शेक करुन लावायला हवे.
फायदे : मेकअप प्रोडक्टमध्ये रेवलॉनचे नाव आहे. यांचे हे प्रोडक्ट चांगले आहे.
तोटे : काही जणांचे या प्रोडक्टचे रिव्ह्यू वाईट आहे.
कसे लावाल : तुम्हाला लिक्वीड लायनरप्रमाणे हे प्रोडक्ट लावायचे आहे.
फायदे : जर तुम्हाला केक आयलायनर आवडत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. हे लायनर छान टिकते
तोटे : हे लायनर लावण्यासाठी तुम्हाला थोडे पाणी लागते आणि थोडे कसब
कसे लावाल : तुम्हाला या केक लायनरमध्ये थोडे पाणी घाला. त्यात अगदी थोडेसे पाणी घालून तुम्ही ते डोळ्यांवर लावा.
फायदे : जेल लायनरमधील हा प्रकार लावायला स्मुथ आहे.त्यामुळे हे लायनर चांगले दिसते.
तोटे : तुम्हाला यासोबत ब्रश वापरणे गरजेचे आहे.
कसे लावाल : ब्रशच्या मदतीने तुम्ही हे आयलायनर लावू शकता. तुम्हाला या आयलायनरचा वापर करुन विंग्जपण तयार करता येईल.
तुम्ही लायनर लावण्याचा विचार करत असाल तर प्रोफेशनल पद्धतीने लायनर लावण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा
जर तुम्ही पहिल्यांदाच लायनर लावणार असाल तर तुम्ही पेन्सिल लायनर वापरायला घ्या. पेन्सिल लायनर लावायला सोपे असते. हे पटकन सुकत असल्यामुळे ते तुमच्या डोळ्यांच्या वरच्या भागाला लागत नाही. त्यामुळे तुम्ही पटकन सुकणारे आणि झटपट लावता येईल असे पेन्सिल लायनर घ्या. जेल लायनर हा प्रकारही तसा तुमच्यासाठी उत्तम आहे. जेल लायनरमध्ये तुम्हाला ब्रशचा उपयोग करायचा असतो. जर तुमच्या हाताला वळण असेल तर तुम्ही हा प्रकारही वापरु शकता.
हल्ली इतक्या प्रकारच्या आयपेन्सिल मिळतात की, त्यांचा उपयोग तुम्हाला आयलायनर म्हणूनही करता येतो. तुम्ही कोणत्या प्रकारची पेन्सिल घेतली आहे त्यावर त्याचा उपयोग अवलंबून आहे. जर तुम्ही काजळ पेन्सिलचा उपयोग आयलायनर म्हणून करणार असाल तर ते करणं तुम्हाला जमणार नाही.कारण काजळ पेन्सिल या भुवयांसाठी बनलेल्या असतात. त्यामुळे काही आय पेन्सिल या आयलायनर नाहीत. ज्यांचा बेस क्रिम असतो अशा पेन्सिल तुम्ही आयलायनर म्हणून वापरु शकता
स्मज न होणारं कोणतंही लायनर हे तुमच्यासाठी चांगल आहे. कारण ते जास्त काळ टिकतं. तुम्हाला lakme, Maybeline आणि Nykaa मध्ये असे आयलायनर मिळू शकतील. हे आयलायनर तुमच्या बजेटमध्येही आहेत.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/