प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. तुमची जशी त्वचा तुम्हाला तुमच्या त्वचेची तशी काळजी घ्यावी लागते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कोणतं प्रोडक्ट वापरता ते तुम्ही पाहायला हवे. तुमच्या त्वचेसाठी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘फेस वॉश’. जर तुम्ही चांगल्या फेसवॉशच्या शोधात असाल तर आज आम्ही तेलकट त्वचेसाठी फेशवॉशची माहिती देणार आहोत याच सोबत आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी तेलकट त्वचेसाठी उपाय देखील सांगणार आहोत मग करुया सुरुवात
तेलकट त्वचा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल. तुमची त्वचा तेलकट आहे की नाही असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तेलकट त्वचेची लक्षणं तुम्हाला माहीत हवी. त्यामुळे सगळ्यात आधी जाणून घेऊया तेलकट त्वचेची लक्षणं
तेलकट त्वचेचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची त्वचा सतत तेलकट दिसत राहणे. प्रत्येकाच्या त्वचेखाली तैलग्रंथी असतात. सगळ्यांच्याच तेलग्रंथी कमी-जास्त प्रमाणात Active असतात. त्यामुळेच ही त्वचा सतत तेलकट दिसत राहते. चेहऱ्याला ग्लो असणं आणि तुमची त्वचा तेलकट असणं यामध्ये फरक आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेवर तेल आलं आहे की नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर टिश्यू पेपर ठेवा. तुम्हाला टिश्यू पेपरवर काही भागावर तेलकट झालेला दिसेल. जर तुम्हाला तसा अंदाज येत नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा पाहा. जर तुमच्या नाकावर तेल साचलं असेल तर तुमची त्वचा तेलकट प्रकारातील आहे.
महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा... तेही घरच्या घरी
तेलकट त्वचेवरील असणाऱ्या तैलीय ग्रंथीतून सतत तेल झिरपत राहते. ही त्वचा कायमच ओली दिसते. चेहऱ्यावरील काही भाग कायमच तेलकट असतात ते म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी.. या सततच्या तेलकटपणामुळे या त्वचेवर पटकन मुरुम येतात. जर तुम्हालाही सतत मुरुम येत असतील तर तुमची त्वचा तेलकट आहे असे समजावे. सर्वसाधारणपणे तेलकट त्वचेचे हे दुसरं लक्षण आहे. त्वचेवर इतरवेळी येणारे मुरुम (पिंपल्स) आणि तेलकट त्वचेवर येणारे मुरुम वेगळे असतात. तेलकट त्वचेवर बरेचदा आलेल्या पिंपल्समध्ये पू साचलेला असतो.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला होणारा आणखी एक त्रास म्हणजे ‘ओपन पोअर्स’ चा. तुमची त्वचा तुम्ही नीट निरखून पाहा. जर तुमच्या त्वचेवर खड्डे असतील तर ते ओपन पोअर्स आहेत. या ओपन पोअर्समध्ये धूळ-माती अडकली की मुरुम येण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोअर्स वाढत असतील तर तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा जास्त मोठी दिसू लागते. तेलकट त्वचेकडे दुर्लक्ष केले तर हा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओपन पोअर्सकडे लक्ष द्यायला हवे.
आता वर सांगितलेल्या लक्षणानुसार तुमच्या त्वचेवर ओपन पोअर्स वाढतात. तुमच्या त्वचेवर ओपन पोअर्स जास्त असतील तर तुमचा चेहरा रुक्ष आणि राठ दिसू लागतो. तुमची त्वचा अधिक राठ वाटू लागते. त्यामुळे जर तुमची त्वचा तुम्हाला अशी वाटत असेल तर तुमचा चेहरा तेलकट प्रकारातील आहे असे समजावे. तेलकट त्वचेसंदर्भातील हे एक महत्वाचे लक्षण आहे. ते तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.
फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम
तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स असतील. तर तुम्हाला मुरुम येऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांसोबतच आणखी एक त्रास डोकावू लागतो तो म्हणजे ब्लॅकहेड्सचा. तुमच्या चेहऱ्यांवरील असलेल्या ओपन पोअर्समध्ये धूळ साचून राहते. ती आधी व्हाईटहेड्सच्या स्वरुपात असते. पण ते जास्त काळ तुमच्या पोअर्समध्ये साचून राहिले तर त्याचे रुपांतर ब्लॅकहेड्स (Black heads) मध्ये होते. हे ब्लॅख हेड्स जर तुमच्या त्वचेमध्ये जास्त काळ राहिले तर ते तुमच्या चेहऱ्यावर बारीक बारीक पण खोल खड्डे करु शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडेही दुर्लक्ष करायला नको.
तेलकट त्वचेची लक्षणं जाणून घेतल्यानंतर तुमची तेलकट त्वचा नियंत्रणात राहण्यासाठी आम्ही तुमच्या तेलकट त्वचेसाठी काही खास फेस वॉश निवडले आहेत. जाणून घ्या तुमच्या तेलकट त्वचेसाठी बेस्ट फेस वॉश
फायदे: बाजारात आलेले हे नवीन प्रोडक्ट सध्या अधिक चालत आहे. याचा फेसवॉशचा बेस फोम असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत करते.
तोटे: याची किंमत थोडी जास्त असल्यामुळे तुम्हाला पटकन या प्रोडक्टवर विश्वास ठेवायचा की नाही या
कसे वापराल: तळहातावर अगदी थोडासा फोम घ्या. चेहरा भिजवून त्यावर फोम लावा. चेहऱ्याला मसाज करा. फेस आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या
फायदे: कोळसा तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेत तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले मॉश्चर देते. ्त्यामुळे तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.
तोटे: या फेसवॉशमध्ये कोळसा असल्यामुळे तुम्हाला याचा सुगंध फार चांगला वाटणार नाही. शिवाय यामध्ये कोळशासोबत कॉफीसुद्धा आहे.
कसे वापराल: जेल फॉर्ममध्ये असणारे हा फेस वॉश तुम्हाला थोडासा घेऊन चेहऱ्यावर लावायचा आहे. चांगला फेस काढून तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.
फायदे: जर तुम्हाला मुरुम असतील तर तुम्ही हा फेस वॉश वापरायला हवे. तुमच्या चेहऱ्यावरील ब्रेक आऊट कमी करण्यास मदत करते. तुमच्या त्वचेवरील रॅशेश कमी करण्यास हा फेसवॉस मदत करतो.
तोटे: जर तुम्ही या फेसवॉसचा अति वापर केला तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
कसे वापराल: हा फेसवॉस लिक्वीड फॉर्ममध्ये असतो म्हणून तुम्ही याचा वापर करताना थोडी काळजी घ्या. तुम्हाला आधी याचा फेस आला नाही असे वाटेल. पण त्याचा फेस येईल. तुमच्या चेहऱ्यावरील ब्रेकआऊटवरही तुम्ही हा फेस वॉश लावू शकता.
फायदे: टी ट्री ऑईल तुमच्या तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. तुमच्या तेलग्रंथी नियंत्रणात ठेवण्यास हा फेस वॉश मदत करतो. तुम्ही हा फेस वॉश आरामात वापरु शकता.
तोटे: या फेसवॉशचे तसे काही तोटे नाही. पण तुम्ही याचा वापर अगदी सहज करु शकता.
कसे वापराल: तुम्हाला हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तो ओल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. फेस काढून तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे.
फायदे: चेहरा तेलकट असेल तर अशावेळी ओपन पोअर्सचा त्रास अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला होतो. अशावेळी हा फेस वॉश तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचे पोअर्स कमी करण्यास हा फेस वॉश मदत करतो.
तोटे: पोअर्स क्लिन केल्यानंतर ते उघडतात अशावेळी तुम्हालाते पोअर्स बंद करणेही गरजेचे असते. त्यामुळे या फेस वॉश नंतर तुम्ही पोअर्स बंद करायला विसरु नका.
कसे वापराल: थोडेसा फेस वॉश घेऊन तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या.
फायदे: बजेट फ्रेंडली असा हा फेस वॉश आहे. यामध्ये लिंबू असल्यामुळे तुमच्या त्वचेवरील तेल नियंत्रणात राहते. लिंबामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक तजेला मिळतो.
तोटे: इतर फेसवॉशच्या तुलनेत तुम्हाला याची किंमत कमी वाटेल त्यामुळे मनात नको त्या शंका येऊ शकतात.
कसे वापराल: अगदी थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही याचा वापर करा. याचा फेस छान येतो. याचा मंद सुगंध इतका छान आहे की, तुम्हाला ते चेहऱ्यावर चोळत राहावेसे वाटेल. पण साधारण एक मिनिटांनी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या
फायदे: अननसामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते. फोम फेस वॉश किंवा क्लीन्सर असल्यामुळे तुमच्या त्वचेला छान तजेला मिळतो. अनेकांनी हा फेस वॉश चांगला असल्याचे म्हटले आहे.
तोटे: याचे फार तोटे नाहीत.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही छान मसाज करा. फेस वॉश छान थंड पाण्याने धुवून घ्या.
फायदे: अननसामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते. फोम फेस वॉश असल्यामुळे तुमच्या त्वचेला छान तजेला मिळतो. अनेकांनी हा फेस वॉश चांगला असल्याचे म्हटले आहे.
तोटे: याचे फार तोटे नाहीत.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही छान मसाज करा. फेस वॉश छान थंड पाण्याने धुवून घ्या.
फायदे: तरुणींना आवडणारा असा हा ब्रँड असून हा फेस वॉश तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करुन पिंपल्सना कमी करते
तोटे: याचे तोटे असे नाही.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा या फेसवॉशमध्ये असलेले कण तुमचा चेहरा स्वच्छ करतात
फायदे: कँलेंडुलाचे घटक असल्यामुळे ते तुमच्या चेहऱ्यावर आलेली मुरुम कमी करण्यासाठी मदत करतात. तुमच्या मुरुमांमुळे झालेल्या जखमा कमी होतात.
तोटे: याच्या अतिरिक्त वापरामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते.
कसे वापराल: दिवसातून फक्त दोनवेळा तुम्ही याचा वापर करा. अगदी कमीत कमी फेस वॉश घेऊन तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करा.
फायदे: टी ट्री ऑईल असलेला हा फेस वॉश चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवून मुरुम कमी करतो. तुमची त्वचा स्वच्छ करण्याचे काम हा फेस वॉश करते.
तोटे: या फेसवॉशचे तसे काही तोटे नाहीत.
कसे वापराल: हातात थोडे फेस वॉश घेऊन तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्यायचा आहे.
फायदे: याचे रिव्ह्यू चांगले असल्यामुळे तुम्ही एकदा तरी हा फेस वॉश नक्की ट्राय करायला हवा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तोटे: याला कोणताही सुगंध नाही. त्यामुळे हा फेस वॉश तुम्हाला कदाचित आवडणार नाही.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुमच्या ओल्या चेहऱ्यावर लावा. छान फेस काढून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फायदे: तुम्ही दररोज वापरु शकता असा हा फोम फेस वॉश आहे. या फेसवॉशमध्ये लिंबाचे घटक असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा होतोच. शिवाय याचे रिव्ह्यूसुद्धा चांगले आहेत.
तोटे: लिंबाचा तुम्हाला त्रास होत असेल तर याचा त्रास होऊ शकतो.
कसे वापराल: हातावर थोडासा फोम घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेस वॉश लावा.
फायदे: हा फेस वॉश क्रिम बेस असून तुम्हाला आवश्यक असलेले मॉश्चरायझ त्वचेला देण्याचे काम हा फेस वॉश करतो.
तोटे: याच्या अतिवापरामुळे त्वचा तेलकट किंवा कोरडी पडू शकते.
कसे वापराल: क्रिम बेस असलेले हे फेस वॉश तुम्ही अगदी थोडेसे हातावर घेऊन तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या.
फायदे: कोरिअन स्किनकेअर हे प्रमाण मानले जाते. त्यात यामध्ये अॅलोवेरा असल्यामुळे हा फोमिंग फेस वॉश तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते.
तोटे: हा फेस वॉश तुम्हाला डॉलरमध्ये उपलब्ध आहे. वेबसाईटवर मिळणे फारच कठीण आहे.
कसे वापराल: हातावर थोडासा फोम घेऊन तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्यायचा आहे.
फायदे: कडुनिंबाचे गुणधर्म असलेला असा हा फेस वॉश असून तुमची त्वचा खोलवर स्वच्छ कऱण्याचे काम हा फेस वॉश करते. त्वचेवरील मुरुमांची जळजळ कमी करते.
तोटे: याचे तोटे असे नाही
कसे वापराल: साधारण हिरव्या रंगाचा हा फेस वॉश असतो. तुम्ही साधारण एक कॉईनआकाराचा फेस वॉश घ्या आणि तुमच्या त्वचेवर त्याचा फेस काढा आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या
फायदे: कॅलेंडुला असलेला हा फोमिंग फेस वॉश फारच प्रसिद्ध आहे. तुमच्या चेहऱ्यारील तेल आणि मुरुम कमी करण्यासाठी हा फेस वॉश चांगला आहे.
तोटे: चेहऱ्यावर होणारे बदल हे फारच हळू असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे तुम्हाला लगेच बदल जाणवणार नाही.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश करुन तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला तुमच्या त्वचा मुलायम वाटेल.
फायदे: जर तुम्ही या आधी wowचे प्रोडक्ट वापरले असेल तर यांचे हे प्रोडक्ट चांगले आहे. तुम्हाला यामुळे तुमचा त्वचा तेलकट वाटणार नाही.
तोटे: तुमची त्वचा कोरडी पडण्याची शक्यता यामध्ये असते.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घ्या आणि तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या
फायदे: बजेटमध्ये बसणारे असे लोटसचे प्रोडक्ट असतात. ज्याचे रिव्ह्यू फारच चांगले आहेत. टी ट्री ऑईल तुमच्या चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करते.
तोटे: याचे तोटे असे नाहीत
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फेस काढून घ्या. आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फायदे: तुमच्या त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी हा फेस वॉश चांगला आहे.
तोटे: याचा जास्त वापर करणे फार चांगले नाही याचा वापर जपून करा.
कसे वापराल: हा फेस वॉश वापरल्यानंतर तुम्ही टोनरचा वापर करायला अजिबात विसरु नका.
फायदे: तुम्हाला आर्युवैदीक प्रोडक्ट आवडत असतील तर तुम्ही याची निवड करु शकता. फॉरेस्ट इंसेशिअल या कंपनीच्या या फेसवॉशचा वापर नाजूक त्वचा असलेली व्यक्तीही करु शकते. या फेसवॉशमध्ये मध, लिंबू आणि गुलाबपाणी असते. जे तुमच्या त्वचेवरील ओलावा टिकवते पण तेलकटपणा कमी करते.
तोटे: अनेकांना आर्युवेदीक प्रोडक्ट आवडतातच असे नाही. शिवाय याची किंमतही तुलनेनं जास्त आहे.
कसे वापराल: हातावर अगदी थोडसं फेस वॉश घेऊन त्याचा फेस काढा चेहऱ्यावर हळुवारपणे चोळत चेहरा स्वच्छ करुन घ्या.
फायदे: अनेक कोरिअन ब्युटी प्रोडक्टमध्ये तांदुळाचा वापर केला जातो. तांदुळामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होऊन तुमचा चेहरा फ्रेश आणि ब्राईट दिसतो.
तोटे: याचा अति वापर चेहरा अधिक कोरडा करतो.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फायदे: अॅलोवेरा असलेला हा फेस वॉश चेहरा हायड्रेट करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही हा फेस वॉश वापरु शकता.
तोटे: याचे तोटे लक्षणीय नाहीत.
कसे वापराल: हातावर थोडासा फेस वॉश घेऊन तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या.
फायदे: कायाचा हा फेस वॉश तेलकट त्वचेसाठी क्लीन्सर,नाजूक त्वचा असणाऱ्यांना अगदी सहज वापरता येईल. तुमच्या चेहऱ्याला योग्य हायड्रेट करण्याचे काम हा फेस वॉश करते.
तोटे: याची किंमत तुलनेनं अधिक आहे.
कसे वापराल: हातावर अगदी थोडेसे फेस वॉश घेऊन तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्याचा छान फेस काढून तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता.
फायदे: तुमची त्वचा डीप क्लीन करण्याचे काम हा फेस वॉश करते. तुमची त्वचा अधिक फ्रेश आणि छान दिसू लागते.
तोटे: या प्रोडक्टचे खास तोटे नाहीत
कसे वापराल: हातावर थोडा फेस वॉश घेऊन तुम्ही याचा वापर करु शकता.
तेलकट त्वचा ओळखायची कशी असा तुम्हाला अजूनही प्रश्न पडत असेल तर त्वचेच्या प्रकाराची काही लक्षणे आहेत. तेलकट त्वचा कायमच चमकदार दिसत राहते. आता तुमची त्वचा तेलकट आहे असे म्हणाताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या काही ठराविक भागी तेल अधिक दिसते. तुमच्या चेहऱ्याचा टी झोन म्हणजे कपाळ - नाक- हनुवटी तेलकट वाटत राहते. याभागावर तुम्हाला पिंपल्स, ब्लॅकहेड्स, ओपन पोअर्स अधिक दिसतात. चेहऱ्यावर असलेल्या नैसर्गिक ग्लो पेक्षा ही चमक वेगळी असते. ज्यामुळे तुमची त्वचा dull दिसत राहते.
चेहऱ्याला साबण लावू नका असा नेहमीच सल्ला दिला जातो. साबण हा तुमच्या शरीराच्या इतर त्वचेसाठी असतो. तुमची चेहऱ्याची त्वचा आणि इतर त्वचा यामध्ये फरक असतो. त्यामुळे साबण तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेची म्हणावी तशी काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला साबण लावू नका. त्याऐवजी तुम्ही चांगला फेसवॉस निवडा.
तुमच्या त्वचेचा पोत कसाही असला तरीसुद्धा सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमचा चेहरा दोन वेळा फेसवॉशचा वापर करुन धुणे अपेक्षित असते. याहून अधिक जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेस वॉश वापरले तर त्याचे चेहऱ्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. तुमची त्वचा यामुळे कोरडी पडू शकते. तुम्हाला तुमचा चेहरा फार तेलकट वाटत असेल तर तुम्ही नुसत्या पाण्याने तुमचा चेहरा कितीही वेळा धुतला तरी चालेल. पण फेसवॉशचा वापर करताना जरा जपून कारण फेस वॉश कितीही चांगले असले तरी त्यामध्ये थोड्याफार प्रमाणास केमिकल्स असतातच.
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्यासाठी या फेसवॉसपैकी एका फेसवॉशची निवड करु शकता.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/