ADVERTISEMENT
home / Fitness
पोटाचा घेर कमी करायचा आहे का, मग नियमित  खा ‘हे’ पदार्थ

पोटाचा घेर कमी करायचा आहे का, मग नियमित खा ‘हे’ पदार्थ

गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाचा विक पॉईंट असतो. मात्र एखादं चॉकलेट अथवा मिठाई तुमच्या डाएट आणि फिटनेसमध्ये अचानक अडथळा आणते. म्हणूनच वजन आणि पोट वाढू नये यासाठी अनेकजणी डार्क चॉकलेट खाणं पसंत करतात. ज्यामुळे चॉकलेट खाण्याचा आनंदही मिळतो आणि वजनही वाढत नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करून तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. या उपायांनी तुमचं बेली फॅटही वाढत नाही. 

Shutterstock

बेली फॅट नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हे पदार्थ असायलाच हवेत –

तुम्हाला वजन कमी करायचं आहे का, मग हे पदार्थ जरूर खा. 

ADVERTISEMENT

फायबरयुक्त पदार्थ खा –

दररोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खाणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. काकडी, गाजर यासारखे विविध प्रकारचे सलाड, निरनिराळ्या फायबरयुक्त भाज्यांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहते आणि पोटावरची  चरबी वाढत जाते. 

रोज एक बनाना केळं खा –

असं म्हणतात की केळी खाण्यामुळे वजन वाढतं.मात्र केळ्यामुळे वजन भरपूर वाढतं हा एक समज आहे. जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढते. खरंतर दररोज एक केळं खाणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. कारण केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं.जर तुम्ही कृष प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल.

Shutterstock

ADVERTISEMENT

अंडं खाणं प्रोटिन्स मिळवण्याचा उत्तम मार्ग –

अंड्यामध्ये भरपूर प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस  असे शरीराला आवश्यक घटक असतात. पोट कमी करण्यासाठी जर तुम्ही नियमित वर्कआऊट आणि डाएट करत असाल. तर तुमच्या शरीराच्या योग्य पोषणासाठी तुम्हाला नियमित अंडं खाण्याची नक्कीच गरज आहे. 

भरपूर पाणी प्या –

माणसाच्या शरीरातील सर्व शारिरिक क्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. पाण्याची पातळी कमी झाली की शरीर डिहायड्रेट होऊ लागते. ज्यामुळे निरनिराळ्या आरोग्य समस्या होण्याची शक्यता वाढते. शिवाय पाण्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. पाण्यामुळे तुमच्या शरीर स्वच्छ  आणि आरोगी राहते. अपचनाच्या समस्या कमी होतात. म्हणूनच पोट कमी करण्यासाठी नियमित मुलबल पाणी प्या. 

Shutterstock

ADVERTISEMENT

मुठभर सुकामेवा खाण्याची स्वतःला सवय लावा –

काही संशोधनानूसार बदाम, मनुका, अंजीरर सारख्या अनेक सुकामेव्या मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया सुधारते. म्हणूनच दररोज मुठभर तरी सुकामेवा  खाण्याची सवय लावा.

घराबाहेर जाताना एक सफरचंद नेहमी जवळ ठेवा –

बऱ्याचदा घराबाहेर गेल्यावर खाण्यापिण्याच्या वेळा न पाळता आल्यामुळे तुम्ही अयोग्य पदार्थ खाता. मात्र जर  घराबाहेर जाताना तुम्ही जर तुमच्या बॅगेत एक सफरचंद ठेवलं तर तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहील. कारण सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर आणि पोषक घटक असतात. म्हणूनच ते खाण्याने तुमचं पोट नेहमी भरल्यासारखं राहील आणि चुकीचे पदार्थ कमी खाण्यामुळे वजन वाढणार नाही.  

हिरव्या पालेभाज्या –

हिरव्या भाज्या आहारात असणं नेहमीच उत्तम असतं. कारण पालक, ब्रोकोली सारख्या भाज्यांमुळे तुम्हाला पुरेसे फायबर्स मिळतात ज्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही. यासाठी बेली फॅट कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या  जरूर खा.

ADVERTISEMENT

Shutterstock

ग्रीन टी –

ग्रीन-टीमुळे चयापचयाचे कार्य सुधारते आणि फॅट्स बर्न होतात. ज्यामुळे सहाजिकच वजन आपोआप कमी होते. अनेक संशोधनानूसार व्यायामासोबत ग्रीन-टी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सामान्यपणे पोट कमी करण्यासाठी ग्रीन-टी फारच फायदेशीर आहे. यासाठी स्लीम दिसण्यासाठी ग्रीन टी जरूर प्या.

Shutterstock

ADVERTISEMENT

मासे –

असं म्हणतात नॉनव्हेजमध्ये मासे शरीरासाठी उत्तम असतं. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी असतं. ज्यामुळे तुमच्या शरीराचे चांगले पोषण होते. म्हणून जर तुम्हाला पोट कमी असावं असं वाटत असेल मासे जरूर खा.

 

ऑलिव्ह ऑईलचा स्वयंपाकात वापर करा –

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तळलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. ऑलिव्ह ऑईलमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. 

 

ADVERTISEMENT
03 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT