सुंदर केसांसाठी आपण अगदी काहीही करायला तयार असतो. पण जे हवं ते मात्र आपण कधीच करायला पाहत नाही. म्हणजे चांगल्या केसांसाठी केसांना तेल लावणे, शॅम्पू करणे जितके आवश्यक असते. तितकेच आताच्या काळात केसांसाठी स्पा करणे आवश्यक असते. एक प्रकारे हेअर स्पा हा तुमच्या केसांसाठी वरदान ठरु शकतो. ज्यावेळी तुम्ही सलोन किंवा पार्लरमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला इतक्या वेगळ्या प्रकारचे स्पा दिसतात की त्यातील नेमका तुमच्या केसांसाठी कोणता हे तुम्हाला कळत नाही. आता तुम्हाला तुमच्या केसांसाठी आवश्यक असलेला स्पा कळत नाही म्हटल्यावर तुम्हाला हे स्पाचे प्रकार का केले जातात ते सुद्धा नक्कीच कळत नसणार. बरोबर ना! आता तुम्हालाही ही गोष्ट कळत नसेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पा आणि त्यांचे फायदे थोडक्यात जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला कोणता स्पा करायचा असा प्रश्न पडणार नाही.
तुमचे केस खूप कोरडे असतील तर तुम्हाला डिप नरिशमेंट हेअर स्पा करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या केसांना आवश्यक असलेला ओलावा तुम्हाला या स्पामुळे मिळतो. या स्पासाठी चांगल्या दर्जाचे हेअरप्रोडक्ट वापरले जातात. तुमच्या कोरड्या केसांना चमक देण्यासाठी हा स्पा उत्तम असतो. आता तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट निवडता त्यावर या स्पाची किंमत अवलंबून असते. साधारण 800 रुपयांपासून तुम्हाला हे स्पा मिळतात. या स्पासाठी तुम्हाला 45 मिनिटांचा कालावधी लागतो. दोन ते तीन महिन्यातून एकदा हा स्पा करायला हरकत नाही. जर तुमचे केस फारच कोरडे असतील तर तुम्ही हा स्पा महिन्यातून एक आवर्जून करा.
नावावरुनच हा स्पा कशासाठी केला जातो हे तुम्हाला कळलं असलेच. ज्यांना कोंड्याचा त्रास आहे किंवा ज्यांची स्काल्प खूपच कोरडी असेल तर त्यांना हा स्पा करण्याचा सल्ला दिला जातो. अँटी ड्रँडफ स्पा करताना तुमच्या स्काल्पवरुन कोंडा काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा स्पा केल्यानंतर तुम्हाला तुमचा कोंडा कमी झालेला जाणवतो. पण हा स्पा करताना तुमच्या स्काल्पमधून हा स्पा व्यवस्थित जाणं गरजेचं असतं नाही तर तुम्हाला कोंडा जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा स्पा कुठूनही करताना स्वच्छता पाळली जात आहे की नाही याकडे लक्ष द्या. हा स्पा साधारण 1000 रुपयांपासून पुढे आहे. दोन महिन्यातून एकदा हा स्पा करायला काहीच हरकत नाही.
हेल्दी आणि हॉट दिसायचंय? त्वचा, केस,आरोग्यासाठी पेपरमिंट ऑईल आहे बहुगुणकारी
केसांवर प्रयोग करायला तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही हेअर कलर, हेअर स्टायलिंग केलं असेल तर अशामुळे तुमचे केस फारच कोरडे किंवा शुष्क होतात. तुमच्या अशा केसांसाठी तुम्हाला प्रोटीन हेअर स्पा करण्याचा सल्ला दिला जातो. हा स्पा करताना प्रोटीनच्या बारीक बारीक ट्युब वापरल्या जातात. ज्याच्यामुळे तुमचे केस मुलायम आणि हायड्रेटेड राहतात. हा स्पा थोडा महागडा असू शकतो. स्पा करण्याची सर्वसाधारण पद्धत तीच असली तरी यासाठी वापरलेले प्रोडक्ट फार खास असतात. तुमच्या केसांच्या लांबीवर त्याचे स्पा अवलंबून असले तरी सर्वसाधारणपणे हा स्पा महागच आहे. 1500 रुपयांपासून हा स्पा असतो.
हल्ली कोणत्याही पार्लर किंवा चांगल्या सलोनमध्ये जा तुम्हाला केरेटीन संदर्भात काहीतरी नक्कीच ऐकू आले असेल. तुमच्या केसांसाठी केरेटीन चांगले असते असे तुम्हाला समजावून सांगितले जाते. आता तुमचे केस अगदी कोणत्याही प्रकारतले असले तरी तुम्ही हा स्पा करु शकता. कोरडे केस, स्टायलिंग केलेले केस या सगळ्या केसांसाठी हा स्पा उत्तम आहे. तुमच्या केसांना सतत फाटे फुटत असतील किंवा तुमच्या केसांचा सतत गुंता होत असेल तर तुम्ही अगदी आवर्जून हे स्पा करायला हवे. केरेटीन स्पासुद्धा थोडा महाग असतो म्हणजे तुम्हाला साधाऱण 1800 रुपयांच्या घरात हा स्पा मिळू शकतो.
प्रवासात केसांची काळजी घेण्यासाठी तयार करा तुमचे हेअर केअर पाऊच
तुम्हाला रिलॅक्सेशनची गरज असेल तर तुमच्यासाठी मोरक्कन ऑईल हेअर स्पा अगदी उत्तम आहे. मोरक्कन ऑईल लावून तुमच्या केसांना छान मसाज केला जातो. साधारण 60 मिनिटं तुमच्या केसांना मसाज केला जातो. तुमच्या केसांच्या नसा मोकळ्या केल्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते असे म्हटले जाते. तुमच्या केसांना चमकदार, मुलायम आणि मजबूत बनवण्याचे काम मोरक्कन ऑईल हेअर स्पा करते. आता मोरक्कन ऑईल हेअर स्पासुद्धा तसा तुलनेनं महाग आहे. साधारण 1500 ते 2000 रुपये इतक्या किमतीचा हा स्पा आहे.
आता जर तुम्ही कधी पार्लर किंवा सलोनमध्ये स्पा करायला जाणार असाल तर स्पा विषयीची अधिक माहिती घ्या आणि मगच स्पा करा म्हणजे तुम्हाला त्या स्पाचे भरपूर फायदे मिळतील.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. इथे क्लिक करा. https://www.popxo.com/shop/zodiac-collection/