नोकरी बदलण्याचा विचारात असाल तर जाणून घ्या कोणते महिने आहेत बेस्ट | POPxo

नोकरी बदलण्यासाठी ‘हे’ महिने आहेत बेस्ट

नोकरी बदलण्यासाठी ‘हे’ महिने आहेत बेस्ट

तुम्ही कॉलेज पास आऊट असो किंवा आधीपासून नोकरी करणारी व्यक्ती असो. प्रत्येकजण करियरमधील प्रगतीसाठी नव्या नोकरीच्या शोधात असतात. मग यामागील कारण भलेही वेगवेगळी असू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, नोकरी शोधण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कोणते महिने बेस्ट आहे ते. जर नाही तर जाणून घ्या.

Canava
Canava

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च

वर्षाच्या सुरूवातीचे पहिले तीन महिने खरंतर नोकरी शोधण्याच्या दृष्टीने चांगले आहेत. कारण वर्ष संपता संपताच अनेक कंपन्याच्या नव्या वर्षाच्या बजेटशी निगडीत गोष्टी ठरू लागतात. अशावेळी पगार आणि हायरिंगबाबतचे निर्णयही कंपनीकडून आधीच घेतले जातात. त्यानुसार या तीन महिन्यांमध्ये बऱ्याच कंपन्यामध्ये जॉब ओपनिंग असतात. याच काळात मार्केटमध्ये प्रोफाईलनुसार जास्त चांगली नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता असते.

एप्रिल, मे आणि जून

जर तुम्ही पहिल्याच नोकरीच्या शोधात असाल किंवा चांगल्या प्रोफाईल आणि पगाराच्या शोधात असाल तर एप्रिल, मे आणि जून हे महिने बेस्ट आहेत. कारण याच महिन्यांदरम्यान अनेक लोक आपला जॉब बदलतात. ज्यामुळे साहजिकच बऱ्याच कंपन्यांमध्ये वेकन्सीज निघतात. एवढंच नाहीतर वेकन्सीसाठी अप्लाय केल्यावर तुम्हाला चांगला पगारही ऑफर करण्यात येऊ शकतो.

 

Canava
Canava

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर

हे तीन महिने मात्र नवीन नोकरी शोधण्यासाठी कठीण असतात. जर या महिन्यांमध्ये कुठे वेकेन्सी निघालीच तर ती तुम्हाला फायदेशीर असेलच असं नाही. कारण या महिन्यांमध्ये साधारण अनेक कंपन्यांचं हायरिंग प्रोसेस पूर्ण झालेलं असतं. तसंच या महिन्यांमध्ये खूप कमी लोक नोकऱ्या सोडतात किंवा बदलतात. कारण या महिन्यांमध्ये अप्रेजल सायकल असते. ज्याचा भाग प्रत्येक नोकरदाराला व्हायचं असतं.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर

हे तीन महिने असतात सणांचे. त्यामुळे या महिन्यांमध्ये लोकांना आपलं उत्पन्न स्टेबल असावं असं वाटतं. त्यामुळे कोणी नोकरी सोडण्याचा विचार करत नाही. पण या महिन्यांमध्ये तुम्हाला एखाद्या कंटेंट जनरेट करणाऱ्या कंपनीमध्ये नक्कीच नोकरी मिळू शकते, खासकरून एड मेकिंग आणि रिटर्न मॅटर आऊटसोर्स करणाऱ्या कंपन्यांमध्ये. कारण जास्त मॅटर जनरेट करण्याची या महिन्यांमध्ये गरज अ्सते. त्यामुळे साहजिकच जास्त लोकांची गरज असते.

नोकरी बदलण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी

Canava
Canava

  • जॉब बदलताना सर्व पर्याय नीट सर्च करा. कधीही अप्लाय करण्याआधी विचार करा की, तुम्ही हे करू इच्छित आहात की नाही, मगच पुढे जा.
  • कधीही स्वतःच ध्येय स्पष्ट ठेवा. तुम्हाला माहीती हवं की, तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचं आहे. त्यानुसारच पुढचं पाऊल उचला.
  • जेव्हा नव्या नोकरीची गरज भासू लागेल तेव्हा तुमच्या नेटवर्कमधील लोकांशी याबाबत बोलणं सुरू करा. कदाचित त्यांच्याशी बोलून तुम्हाला एखादी चांगली संधी मिळेल.
  • नोकरी सोडण्याआधी किंवा नवीन नोकरीसाठी अप्लाय करण्याआधी आपल्या वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या. त्यांना तुमच्याकडील पर्यायांबाबत सांगा आणि त्यांचा सल्ला नीट ऐकून मगच निर्णय घ्या.
  • करियरमध्ये ग्रोथ हवी असल्यास कधीही एकाच जॉबवर अवलंबून राहू नका. तुमचा आवाका वाढवा.
  • स्वतःचं सामर्थ्य ओळखा. कोणतं काम तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता ते ओळखा आणि पुढे जा.
  • कधीही जुनी नोकरी चांगल्या नोटवर सोडा. तिथले रिलेशन्स चांगले ठेवा. कारण कधी तुम्हाला परत त्या कंपनीत यावं लागेल, सांगता येत नाही.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.