जाणून घ्या कोणत्या बॉलीवूड कलाकारांशी जुळते तुमची रास

जाणून घ्या कोणत्या बॉलीवूड कलाकारांशी जुळते तुमची रास


बॉलीवूड सेलिब्रेटीप्रमाणे दिसण्याचं वागण्याचं क्रेझ प्रत्येकालाच असतं. एखादा सेलिब्रेटीने तुमच्या मनात खास घर केलेलं असतं.  मग तुम्हाला आयुष्यही अगदी त्याच्याप्रमाणेच असावं असं वाटू लागतं. तुम्ही त्यांच्या आवडत्या रंगापासून त्यांच्या फेव्हरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशनपर्यंत सर्व गोष्टी फॉलो करता. तुमच्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर फॉलो करण्याची तुम्हाला मौज वाटते. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बातमीवर तुमचं बारिक लक्ष असतं. बऱ्याचहा तुम्ही त्यांचं राशीभविष्य आणि त्यानुसार असलेला स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सेलिब्रेटीजचे  राशीभविष्य शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडींविषयी माहिती मिळू शकते.  

बॉलीवूड सेलिब्रेटी आणि त्यांच्या राशी -

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारीख, जन्मवेळेनुसाार त्याची राशी ठरत असते. जन्माची तारीख आणि वेळ यानुसार त्यांचे व्यक्तिमत्व निर्माण होते. काही विशिष्ठ राशींचा स्वभाव, आवडीनिवडी असतात. म्हणूनच जाणून घ्या तुमची रास आणि या बॉलीवूड कलाकारांची रास यात आहे का साधर्म्य 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना त्यांचे कौतुक ऐकणे फार आवडते. जेव्हा लोक या राशीच्या लोकांसाठी वेळ काढतात तेव्हा त्यांना फार बरं वाटतं. मात्र या राशीचे लोक फारच संवेदनशीर असतात. ज्यामुळे ते इतरांच्या भावना चांगल्या पद्धतीने समजू शकतात. असं असलं तरी स्वतःच्या मनातील भावना मोकळेपणे व्यक्त त्यांना मुळीच जमत नाही. मेष राशीच्या लोकांना इतरांची समजूत काढणं चांगलं जमतं मात्र ते स्वतःची समजूत काढू शकत नाहीत. 

मेष राशीचे बॉलीवूड कलाकार -

राणी मुखर्जी, अजय देवगण, कंगना रणौत, इमरान हाश्मी, लारा दत्ता, जयाप्रदा, मंदिरा बेदी, अक्षय खन्ना, जितेंद्र 

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांची कल्पना शक्ती प्रंजड प्रभावी असते. मात्र असं असूनही ते स्वतःच्या चांगल्या वाईटाचा विचार करत नाहीत. नेहमी इतरांच्या नजरेत स्वतःला आदर्श दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात. या राशीचे लोक नैसर्गिक आणि सुंदर वस्तूंकडे पटकन आकर्षित होतात. आरामदायक जीवन आणि इमानदार व्यक्तिमत्व हे यांच्याकडे बघून समजते. 

वृषभ राशीचे बॉलीवूड कलाकार -

माधुरी दीक्षित, मनोज वाजपेयी, अनुष्का शर्मा, वरूण धवन, सनी लियोनी, पूजा बेदी, मौसमी चटर्जी, जरीन खान 

मिथुन - (Gemini)

या राशीच्या लोकांमध्ये अप्रतिम उत्साह आणि आणि समजंसपणा असतो. त्यामुळे या राशीचे लोक त्यांच्या विचारांना नेहमी चालना देतात. मनातील नवनवीन प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. प्रेमाच्या बाबतीत ते नेहमीच गंभीर आणि रोमॅंटिकही असतात.  या राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्याच प्रकारची कमतरता नसते. नाव, प्रसिद्धी, पैसा सर्वकाही त्यांना अगदी सहज मिळू शकतं. 

मिथुन राशीचे बॉलीवूड कलाकार -

सोनम कपूर, करण जौहर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, आर, माधवन, महेश भट्ट, शिल्पा शेट्टी, डिंपल कपाडिया, अमीषा पटेल, परेश रावल, मिथुन चक्रवती 

कर्क (Cancer)

या राशीचे लोक त्यांच्या सुंदर आणि रुबाबदार व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. आकर्षित व्यक्तिमत्व असल्यामुळे एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या सहज प्रेमात पडतात.  खरंतर या राशीचे लोक त्यांच्या समजूतदार स्वभाव आणि सतत हसमुख चेहऱ्यासाठी ओळखले जातात. मात्र कधी कधी यांचा मूड राखणं खूपच कठीण असू शकतं.

कर्क राशीचे बॉलीवूड कलाकार -

प्रियंका चोप्रा, सोनू निगम, रणवीर सिंह, कतरिना कैफ, करिष्मा कपूर, अर्जून कपूर, सूरज पांचोली, राज बब्बर 

सिंह (Leo)

सिंह राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. ते नेहमी प्रामाणिक वागतात आणि इतरांकडूनही तशीच अपेक्षा करतात. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं त्यांना चांगलं जमतं. म्हणूनच मनाने विचार करण्यापेक्षा ते नेहमी मेंदूने विचार करतात. जीवन खडतर असलं तरी त्यावर मात करून यश मिळवणं त्यांना जमतं. या राशीचे लोक कधीच हार मानत नाहीत. स्वतःच्या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेवर त्यांना नेहमीच गर्व असतो.

सिंह राशीचे बॉलूीवूड कलाकार -

काजोल, हुमा कुरेशी, सैफ अली खान, मनीषा कोईराला, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडीस, सुनील शेट्टी, अरबाझ खान, कृती सेनन 

कन्या - (Virgo)

या राशीचे लोक स्वभावाने दयाळू असतात. छोट्या छोट्या गोष्टींबाबत सतत सावध असतात. फिटनेसच्या बाबतीत ते नेहमी जागरूक असतात. हे लोक सर्वांचं सल्ला ऐकतात मात्र निर्णय स्वतःच घेतात. या राशीचे लोक काही लोकांसाठी आदर्श समजतात. साधेपणामुळे ते इतरांना नेहमी आदर्श करतात. 

कन्या राशीचे बॉलीवूड कलाकार -

करिना कपूर, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, नेहा धूपिया, विवेक ओबेरॉय, शबाना आझमी

तूळ (Libra)

या राशीचे लोक त्यांच्या ग्रेस आणि स्टाईलमुळे ओळखले जातात. सतत द्विधा मनस्थितीत राहील्यामुळे त्यांना चतूर समजलं जातं. या लोकांना डॉमिनेट करणं मुळीच पसंत नाही. त्याचप्रमाणे  ते इतरांकडून स्वतःला डॉमिनेट करून घेत नाहीत. या लोकांचे सामाजिक जीवना फारच चांगले असते. या राशीचे लोक सतत भरपूर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, सहकारी यांच्या गराड्यात राहतात. 

तुळ राशीचे बॉलीवूड कलाकार -

रेखा, अमिताभ बच्चन, रवीना टंडन, हेमामालिनी, परिणिती चोप्रा, सनी देओल, नरगिस फाखरी, मल्लिका शेरावत 

वृश्चिक (Scorpio)

राशी चक्रातील ही एक महत्त्वाची राशी आहे. कारण ही रास फारच रहस्यमय आहे. या राशीत जन्माला आलेले लोक प्रभावशाली असतात. ज्यामुळे ते इतरांना स्वतःकडे  आकर्षित करतात. असं असलं तरी यश त्यांना सहज मिळत नाही. मात्र जेव्हा यश मिळतं तेव्हा ते भरपूर मिळतं. आयुष्यात कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासत नाही. प्रतिभा, पैसा आणि भाग्य त्यांच्यासोबत असतं.

वृश्चिक राशीचे बॉलीवूड कलाकार -

शाहरूख खान, ऐश्वर्या राय, यामी गौतमी, जुही चावला, तब्बू, सुश्मिता सेन, तुषार कपूर, आदित्य राय कपूर, कमल हसन, आथिया शेट्टी

धनु (Sagittarius)

या राशीचे लोक भाग्यवान असतातच शिवाय बुद्धीमानही असतात. टॅलेंट यांच्यात अगदी कणाकणांत भरलेले असतं. म्हणूनच ते त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरने इतरांची मने सतत जिंकून घेतात. 

धनु राशीचे बॉलीवूड कलाकार -

ट्विकंल खन्ना, दिलीप कुमार, रजनीकांत, अर्जून रामपाल, जॉन अब्राहम, कोंकणा सेन शर्मा, दीया मिर्झा, तमन्ना भाटिया, गोविंदा, बोमन ईमानी, शर्मिला टागौर 

मकर (Capricorn)

या राशीचे लोक नेहमी तरूण दिसतात. चिरतरूण दिसणं हे या राशीचं खास वैशिष्ठ्यं आहे. ज्यामुळे या राशीचे लोक प्रभावशाली दिसतात. शिवाय हे लोक मेहनती असतात मात्र भाग्याची  साथ त्यांना नेहमीच कमी पडते. म्हणूनच या राशीच्या लोकांची कामे जरा उशीराच पूर्ण होतात. अती महत्वकांक्षी असल्यामुळे या राशीचे नेहमी प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करतात. दिखावा करणं या लोकांना मुळीच आवडत नाही.

मकर राशीचे बॉलीवूड कलाकार -

दीपिका पदूकोण, ऋतिक रोशन, बिपाशा बासू, फराह खान, विद्या बालन, फरहान अख्तर, इमरान खान, जॉनी लिव्हर, नाना पाटेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, सलमान खान

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीचे लोक एक आकर्षक व्यक्तिमत्व असतात. मुळातच शांत स्वभावाच्या या लोकांना निसर्गाकडून अप्रतिम बुद्धीचं वरदानही लाभलेलं  असतं. यांच्या प्रमाणे सेल्फ कंट्रोल इतरांकडे असणं नक्कीच कठीण आहे. कोणत्याही परिस्थितीत ते स्वतःला सांभाळू शकतात. वॅलेंटाईन्स डेला जन्माला आल्यामुळे ते खूप रोमॅंटिक असतात.

कुंभ राशीचे बॉलीवूड कलाकार -

शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, मधुबाला, पूजा भट्ट, उर्मिला मातोंडकर, प्रिती झिंटा, सुशांत सिंह राजपूत, श्रूती हसन, जॅकी श्रॉफ

 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोक फारच सोशल असतात. स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. हसऱ्या व्यक्तिमत्वामुळे इतरांना स्वतःकडे  आकर्षित करतात. प्रवास करणं त्यांना फार आवडतं. डेली रूटीनमधून कितीही थकवा आला तरी ते फिरायला तयार असतात. यांच्या भटक्या स्वभावामुळे त्यांना निसर्ग फार आवडतो.

मीन राशीचे बॉलीवूड कलाकार -

टायगर श्रॉफ, आमिर खान, आलिया भट, श्रद्धा कपूर, अनुपम खेर, उर्वशी रौतेला, भाग्यश्री, अभय देओल