या ब्युटीजच्या फिटनेसचं रहस्य आहे योगा

या ब्युटीजच्या फिटनेसचं रहस्य आहे योगा

स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोजच्या धावपळीतून वेळ काढून फिटनेससाठी काही ना काही करणं आवश्यक आहे. पण प्रत्येकालाच जिमला जाऊन एक्सरसाईज करायला जमतंच असं नाही. पण तुम्हाला रोज जिमला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी योगा करू शकता. योगामुळे ना फक्त शरीर निरोगी राहते तर मनही शांत राहते. याच कारणामुळे अनेक सेलिब्रिटीज निरोगी राहण्यासाठी योगाचा अवलंब करतात. पाहूया कोण आहेत हे बॉलीवूड सेलेब्स जे आहेत योगाचे फॉलोअर्स -

शिल्पा शेट्टी

Instagram

योगा आणि बॉलीवूड दिवा शिल्पा शेट्टी हे एक घट्ट समीकरण आहे. शिल्पाच्या योग व्हिडिओबाबत सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे तिच्या फिटनेस आणि योगा प्रेमाबाबत सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, तिच्या परफेक्ट बॉडी आणि फिगरचं रहस्यही योगाच आहे. याशिवाय शिल्पाने योग गुरू रामदेव बाबासोबतही योगाचं परफॉर्मन्स दिला होता. शिल्पा रोज योगा करून स्वतःला फिट ठेवते.

करिना कपूर

बॉलीवूडची बेबो करिना कपूरतिच्या प्रेग्नंसीदरम्यान चर्चैचा विषय ठरली होती आणि तिच्या फिटनेसचीही चर्चा होतीच. करिना जिम पर्सन असल्याचंही वारंवार दिसून आलं आहे. एवढंच काय जिमला जाताना ती छोटे नवाब तैमूरलाही घेऊन जाते. पण फिट राहण्यासाठी ती फक्त जिमच नाहीतर योगाचीही मदत घेते. फक्त करिनाच नाहीतर सैफच्या डेली फिटनेसमध्ये योगाचा समावेश आहे.

बिपाशा बासू

Instagram

योगाच्या बाबतीत बॉलीवूडची डस्की ब्युटी बिपाशा बासूही मागे नाही. बिपाशाच्या आयुष्यात योगाचं महत्त्वपूर्ण स्थान असून ती तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे करण सिंग ग्रोव्हरसोबत योगा करते. या कपलच्या फिटनेसचं रहस्यही योगा आहे. सोशल मीडियावर या दोघांचे योगा करतानाचे फोटोजही व्हायरल झाले होते.

रेखा

फोरएव्हर ब्युटी रेखाच्या सौंदर्याने आजही घायाळ व्हायला होतं. रेखाने वयाची 60 पार करूनही ती आजच्या काळातील अभिनेत्रींना टक्कर देईल. या मागील कारण आहे योगा. रेखानेही आपल्या रूटीनमध्ये योगाचा समावेश केला आहे. त्यामुळेच तिचं सौंदर्य आजही कायम आहे.

दीपिका पदुकोण

आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचं मन जिंकणारी बॉलीवूडची पद्मावती म्हणजेच दीपिका पदुकोणही फिटनेसाठी योगा करते. दीपिका सकाळी सहा वाजता उठते आणि दिवसाची सुरूवात सूर्य नमस्काराने करते आणि योगासनही करते.

मलायका अरोरा

Instagram

सुपर मॉडेल आणि व्हीजे मलायका अरोराला पापाराझ्झी नेहमीच जिममधून बाहेर पडताना स्पॉट करतात. तिच्या स्टाईल आणि फिटनेसमुळे ती सतत चर्चेत असते. तिच्याही फिटनेसच्या सिक्रेटमध्ये योगाचा समावेश आहे. कारण मलायका नियमितपणे पावर योगा करते.

आता तुम्हाला कळलं असेलच बॉलीवूड ब्युटीजच्या सौंदर्याचं रहस्य फक्त मेकअप नाही तर योगाही आहे. त्यामुळे फक्त जिम आणि डाएट करून नाहीतर योगालाही आपल्या फिटनेस रूटीनमध्ये सामील करा. पण लक्षात ठेवा की, जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करणार असाल तर योगा इंस्ट्रक्टरच्या देखरेखीखाली योगा करा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.