बॉलीवूडस्टारची एकमेकांशी अशी गुंतली आहेत नाती

बॉलीवूडस्टारची एकमेकांशी अशी  गुंतली आहेत नाती

बॉलीवूडमध्ये नेपोटीझिम हा शब्द आता काही नवीन राहिला नाही. चित्रपटात त्यांनाच काम मिळते ज्यांचे कोणीतरी या क्षेत्रात असते. पण हल्ली असे नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात की, ज्यांचे या क्षेत्राशी कोणीच निगडीत नाही असे आपल्याला वाटते. पण बॉलीवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण त्यांचे या इंडस्ट्रीशी आधीपासूनच लागेबंधे आहेत जाणून घेऊया अशाच काही बॉलीवूडमधील स्टारशी गुंतलेली नाती.

तुला पाहते रे फेम 'इशा'चा डान्स जलवा

रणवीर सिंह आणि सोनम कपूर

Instagram

बॉलीवूडचा टॉपचा स्टार अशी ओळख असलेला रणवीर सिंह.  सध्या नंबर वनवर आहे. रणवीर सिंह त्याच्या टॅलेंटवर नक्कीच या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यास यशस्वी झाला आहे. पण सोनम कपूर त्याची चुलत बहीण आहे  आणि अनिल कपूर त्याचा काका आहे. सोनमच्या आईशी त्याचे नाते आहे. त्याच्या आजोबाची बायको आणि त्याची आजी या बहिणी आहेत. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी नाते आहे. 

किआरा अडवाणी आणि सईद जाफ्री

Instagram

‘कबीर सिंह’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली किआरा अडवाणी सध्या अनेकांना आवडते. किआरा अडवाणी याचे बॉलिवूड कनेक्शन काय? असे तुम्हाला वाटत असेल तर 90च्या दशकात हिंदी चित्रपटात काम करणारे सईद जाफ्री हे किआरा अडवाणीचे आजोबा आहेत. इंडियन-ब्रिटीश अभिनेता अशी सईद जाफ्राी यांची ओळख आहे. हिंदी- इंग्रजी अशा अनेक चित्रपटांमधून सईद जाफ्री यांनी काम केले आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये त्यांचा दबदबा होता. किआराच्या आईचे सईद जाफ्री हे वडील. त्यामुळे किआराच्या रक्तातच अभिनय आहे. नुकतीच ती गुड न्यूज या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर यांच्यासोबत दिसले होते.

रिंकू राजगुरूने केलं 20 किलो वजन कमी, केला डाएट प्लॅन शेअर

फरहान-झोया आणि फराह- साजिद

Instagram

बहीण भावांची ही जोडी तर तुम्हाला माहीत असेलच. फरहान- झोया आणि फराह- साजिद एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते एकमेकांचे चुलत भाऊ आहे. या दोन बहीण भावांची आई मेनका आणि डेझी हे एकमेकांच्या बहिणी आहेत. त्यामुळेच हे दोघे एकमेकांचे नातेवाईक लागतात. या दोन्ही बहीण भावांनी त्यांचे फोटो फार शेअर केले नसले तरी त्यांचे एकमेकांशी नाते आहे. पण फराह आणि साजिद यांनी या पदापर्यंत पोहचण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. 

अजय देवगण आणि मोहनीश बेहल

Instagram

मोहनीश बेहल आणि अजय देवगण यांचे एकमेकांशी काय नाते आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मोहनीश बेहल अजय देवगणचा मेहुणा आहे. तनुजा आणि नुतन या बहिणी आहेत. तनुजाची मुलं म्हणजे काजोल आणि तनिषा तर नुतनचा मुलगा म्हणजे  मोहनीश त्यामुळेच या दोघांचे नाते आहे. शिवाय काजोल आणि राणी मुखर्जी यांचेही एकमेकांशी नाते आहे. पण ते काजोलच्या वडिलांच्या बाजूने. त्यामुळे आता तुम्हाला हे नाते लक्षात आलेच असेल.

श्रद्धा कपूर आणि मंगेशकर घराणे

Instagram

श्रद्धा कपूर आणि मंगेशकर कुटुंब यांचे नाते काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला सांगायला आवडेल की, श्रद्धा कपूर ही त्यांची नात आहे.श्रद्धा कपूरचे आजोबा ह लता आणि आशा भोसले यांचे भाऊ लागतात. या नात्यानेच श्रद्धा  कपूरचे त्यांच्याशी नाते आहे. 


अशा काही आणखी जोड्या आहेत ज्यांचे एकमेकांशी फारच वेगळ्या पद्धतीचे नाते आहे. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/