सावधान ! तुमच्यात आढळली आहेत का ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं

सावधान ! तुमच्यात आढळली आहेत का ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं

ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) हा सर्वात गंभीर आजारांपैकी एक आजार आहे. हा आजार जास्त प्रमाणात महिलांमध्ये आढळून येतो. ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) होण्यामागील कारणे आणि लक्षणे योग्य वेळी ओळखणं गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागील प्रमुख कारण वाहतुकीदरम्यान होणारे वायु प्रदूषण असू शकतं. ब्रेस्ट कॅन्सरची कारणं तसंच लक्षणं जाणून घेणे, हे त्यावर औषधोपचार करण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. ब्रेस्ट कॅन्सरवरील नवीन औषधोपचार पद्धती किंवा लक्षणं कशा पद्धतीनं ओळखाव्यात? असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांच्या डोक्यात येतात. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण आढळून आल्यानंतर तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अनियंत्रित वाढ होण्यामागील मुख्य कारण कॅन्सर असू शकतं. शरीरात कॅन्सरच्या पेशी मोठ्या प्रमाणात वाढत राहिल्यास, त्यांचा तुटलेला काही भाग रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या अन्य अवयवात पोहोचतात आणि पसरतात. या प्रक्रियेस मेटास्टेसिस (Metastasis) असं म्हटलं जातं. मेटास्टेसिस देखील कॅन्सरचा एक टप्पा आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर योग्य ते औषधोपचार करणं शक्य आहे. 

(वाचा : पोट आणि मांडीवरील चरबी कमी घटवण्यासाठी करा 'ही' योगासने)

ब्रेस्ट कॅन्सर होण्यमागील कारणे 

1. जागतिक आरोग्य संघटनेनुसार गर्भधारणा रोखणे  

2. योग्य वेळेत बाळाला जन्म न देणे 

3. स्‍तनपान करू न देणे 

4. वय वाढणं आणि बहुतांश वेळा मद्यसेवन करणं 

5. अनुवांशि‍क स्वरूपातही ब्रेस्ट कॅन्सरची आजार होऊ शकतो 

6. स्तनावर गाठ असणं 

7. वेळेपूर्वीच येणाऱ्या मासिक पाळीमुळेही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो 

(वाचा : प्रेग्नेंसीदरम्यान ‘या’ मेकअप प्रॉडक्टचा चुकूनही करू नका वापर)

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

1. स्तनाच्या आकारात बदल झाल्याची जाणीव होणे 

2. स्तन किंवा बाहुंच्या खाली गाठ येणे 

3. स्तन दाबल्यास वेदना होणे 

4. स्तनावर सूज येणे 

(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)

स्तन कॅन्सरचा त्रास रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

1. नियमित व्यायाम आणि योगासनांचा अभ्यास करावा. 

2. सूर्याच्या प्रखर किरणांपासून स्वतःचं संरक्षण करावे. 

3. धूम्रपान आणि अमली पदार्थांचे सेवन करू नये 

4. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करू नये 

5. लाल मांस अधिक प्रमाणात खाणे टाळावे 

6. गर्भनिरोधक गोळ्यांचं वारंवार सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.