जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा ती ना वय बघते ना रंग-रूप ना धर्म. कारण खरं प्रेम जेव्हा होतं तेव्हा बाकी काहीच दिसत नाही. फक्त एकमेकांच्यातील चांगुलपणा आणि एकमेकांची साथ चांगली वाटते. मग त्यांच्या प्रेमात कितीही अडचणी आल्या तरी संकटांचा सामना करायचीही तयारी असते. ध्येय एकच असतं प्रेमाचा विजय आणि मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी असते नाही का? प्रेमासाठी धर्म बदलावा लागला तरी बेहत्तर. आजच्या लेखात आम्ही अशाच काही सेलिब्रिटी जोड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रेमासाठी धर्म बदलण्याचंही धाडस केलं. म्हणतात ना प्रेमासाठी काय पण.
1. शर्मिला टागोर – प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या माजी कप्तान नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं होतं आणि तुम्हाला माहीत आहे का, धर्म परिवर्तनानंतर त्यांचं नाव बेगम आयेशा सुलताना असं ठेवण्यात आलं होतं.
2. करीना कपूर – सासू शर्मिला टागोर यांच्याप्रमाणेच बॉलीवूडच्या बेबो म्हणजे करीना कपूरनेही सैफसोबत लग्न करताना धर्म परिवर्तन केलं. लग्नानंतर तिचं नाव आहे करीना कपूर खान. करीनाने दाखवून दिलं की, प्रेम खरं असेल तर दोन जीवांच्या मिलनाला कोणीच रोखू शकत नाही.
सोशल मीडियावर चुकूनही पोस्ट करू नका या गोष्टी
3. दीपिका कक्कड – ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकणारी प्रेम आणि सिमरची जोडी म्हणजेच दीपिका आणि शोएबने लग्न केलं. दीपिकाने आपल्या प्रेमासाठी हसत हसत कुटुंबाच्या अनुमतीने धर्म परिवर्तन केलं आणि लग्नानंतर आता तिचं नाव फैजा असं ठेवण्यात आलं आहे.
4. नर्गिस – बॉलीवूडची लेजंडरी अभिनेत्री नर्गिस ही मुस्लिम होती पण सुनील दत्त मात्र हिंदू होते. त्यांच्या लग्नाच्या वेळी नर्गिसने आपला धर्म बदलला आणि लग्नानंतर त्यांचं नाव निर्मला दत्त असं ठेवण्यात आलं. सुनील आणि नर्गिस यांच्या लग्नाने त्यावेळी संपूर्ण आणि इंडस्ट्रीमध्ये आश्चर्याच्या धक्क्याचं वातावरण होतं.
मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट
5. धर्मेंद्र – हे ऐकून तर तुम्ही नक्कीच चकित व्हाल पण हे खरं आहे की, बॉलीवूडच्या हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी ड्रीमगर्ल हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन केलं होतं.
6. हेजल कीच – बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या हेजल कीचने भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगशी लग्न केल्यावर धर्मपरिवर्तन करत शीख धर्म स्वीकारला. त्यांचं लग्नही शीख धर्मानुसार झालं आणि लग्नानंतर हेजलचं नाव ठेवण्यात आलं गुरबसंत कौर.
लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स
या सेलेब्सनी आपला धर्म बदलून हे सिद्ध केलं की, प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करण्याची तयारी असावी लागते. त्यांनी ती तयारी दाखवली आणि प्रेम मिळवलं.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.