ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
चांगल्या नेलपेंटची निवड नखांसाठी असते आवश्यक नाहीतर होऊ शकतात हे त्रास

चांगल्या नेलपेंटची निवड नखांसाठी असते आवश्यक नाहीतर होऊ शकतात हे त्रास

नखांचे सौंदर्य वाढवणारे नेलपेंट्स लावायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. खूप जणांना वेगवेगळ्या नेलपेंट्सचे कलेक्शन करण्याची आवड असते. कुठेही नेलपेंट दिसली की ती नेलपेंट ते खरेदी करतात. त्यात जर त्याची किंमत कमी असेल तर मग ते अगदी हमखास खरेदी करतात. पण स्वस्तात मिळणाऱ्या नेलपेंट्समध्ये काय असते हे तुम्हाला माहीत आहे का? स्वस्तात मस्त सतत वापरल्यामुळे तुमच्या नखांना काय नुकसान पोहचू शकते हे जाणून घ्या आणि मगच याचा वापर करायचा की नाही ते तुम्ही ठरवा.

तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे

नेलपॉलिशमध्ये नेमकं काय असतं?

shutterstock

ADVERTISEMENT

आता नेलपॉलिश कशी तयार होते हे तुम्हाला माहीत आहे का?  नेलपेंट किंवा नेलपॉलिशची बॉटल कोणी लांबून जरी उघडली तरी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. कोणीतरी नेलपेंट लावत आहे हे आपल्याला एकदम पटकन कळतं. नेलपेंटमध्ये 5 महत्वाचे घटक असतात. त्याचे फायदे आणि तोटे आहेत. पहिला घटक यामध्ये असतो तो म्हणजे DBP (DIBUTYL PHTHALATE)  हा सगळ्याच नेलपेंटमध्ये असतो.नेलपेंटचा रंग टिकवण्याचे काम हे घटक करतो. पण याचे तुमच्या शरीरवर घातक परिणाम होतात. तुमच्या नखांना अधिक काळ टिकवण्याचे काम FORMALDEHYDE करत असते. तुमची नेलपेंट अगदी व्यसस्थित वाळून त्यांना घट्ट ठेवण्याचे काम ती करते. हे केमिकल तुमच्या नखांवर फार काळ असणे चांगले नाही. कारण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.  तुम्हाला काही अॅलर्जीचा त्रास असेल तर नेलपेंटमधील FORMALDEHYDE RESIN तुमच्यासाठी चांगला नाही. नेलपेंटमध्ये असलेला CAMPHOR हा एकमेव घटक चांगला आहे. त्याचे काहीच नुकसान नाही उलट ते तुमच्या नखांना चमकदार ठेवण्याचे काम करते. आता चांगल्या नेलपेंटमध्ये याचे प्रमाण शास्त्रशुद्धपद्धतीने वापरलेले असते. त्याचे प्रमाण तुमच्या स्वस्त नेलपेंटमध्ये असेलच असे सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या.

 

चुकूनही करू नका ‘फिश पेडिक्युअर’ होऊ शकतो इनफेक्शनचा धोका

स्वस्तातल्या नेलपेंट्सचा असा होऊ शकतो त्रास

ADVERTISEMENT

shutterstock

  • स्वस्तात मिळणाऱ्या नेलपेंटमध्ये   केमिकल्स जास्त असतात. हे केमिकल्स तुमच्या नखांवरील इनॅमल कमी करतात. तुमच्या नखांच्या चमकदारपणामागे  नखांवरील इनॅमल असते. जर तुमच्या नखांवर इनॅमल नसेल तर तुमची नखं कोरडी आणि नाजूक पडतात. 
  • केमिकलयुक्त अशा नेलपेंटच्या वापरामुळे तुमची नखं तुटण्याची शक्यता जास्त असते. नखांना भेगा पडणे. नखांची वाढ खुंटणे अशा गोष्टी यामुळे होऊ शकतात. 
  • नखांसाठी कोणतीही नेलपेंट वापरण्याची चुकी तुम्ही करत असाल तर तुमच्या नखांना सुरकुत्या पडण्याची शक्यता सुद्धा यामध्ये सगळ्यात जास्त असते. तुम्ही जर याचा सतत वापर करत असाल तर तुमच्या त्वचेप्रमाणे तुमच्या नखांनाही सुरकुत्या पडतात. 
  • केमिकल युक्त नेलपेंट्सचे घटक तुमच्या पोटात गेले तर तुम्हाला अन्य विकार होण्याची शक्यताही जास्त असते. यामुळे कॅन्सरसारखा आजारही बळावतो.
  • चांगल्या प्रतीच्या नेलपेंटमध्ये असलेले काही घटकही नखांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. तुम्ही जर कोणतीही नेलपेंट लावत असाल तर ती काही काळासाठीच वापरा शक्य असेल तर तुम्ही त्याचा नेलपेंट काढून टाकल्यानंतर आठवडाभर तरी नेलपेंट लावू नका. तुमच्या नखांना श्वास घेऊ द्या.

आता जर तुम्ही जर अशा नेलपेंटची खरेदी करत असाल तर तरी करु नका. कारण त्यामुळे तुमच्या नखांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

10 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT