गर्भावस्थेत टाळा जास्त कॉफी पिणं

गर्भावस्थेत टाळा जास्त कॉफी पिणं

आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळ ही चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. कॅफीनयुक्त या पेयांनी सकाळची सुरूवात अगदी एनर्जेटीक तर होतेच. त्यासोबतच अँटीऑक्सीडंट आणि पौष्टिक तत्वंयुक्तही पेयं असतात. अनेक जणांना तर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय प्रेशरही येत नाही. पण जर तुम्ही गर्भवती असाल तर मात्र तुम्हाला या सवयीत बदल करावा लागेल.

Canava

हो, विदेशातील एका रिसर्चनुसार गर्भावस्थेदरम्यान कॅफीनचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या बाळाच्या यकृताच्या विकासावर दुष्परिणाम होऊ शकतो. एवढंच नाहीतर भविष्यात त्याला यकृतासंबंधीचा आजार होण्याची शक्यताही वाढते. तसंच या रिसर्चमध्ये हेही आढळलं आहे की, दिवसभरात 2-3 कप कॉफीचं सेवन केल्याने तणाव आणि वाढीच्या हार्मोन्सच्या स्तरात बदल होतो. ज्याचा परिणाम होणाऱ्या बाळाच्या यकृताच्या विकासावर होऊ शकतो.

Canava

गर्भवती असताना कॅफीनचं सेवन केल्यास गर्भवती मातांमध्ये तणावाचे हार्मोन्स वाढतात. जे यकृताच्या विकासासंबंधित आईजीएफ-1 या घटकाला रोखतात. हा इंशुलिनसारखा एक हार्मोन असतो. जे बाळाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. वैज्ञानिकांनुसार गर्भावस्थेदरम्यान कॅफीनचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास फॅटी लिव्हर हा आजार होण्याचा धोका वाढतो. वरील निष्कर्षानुसार गर्भावस्थेदरम्यान महिलांनी जास्त कॅफीन सेवन करणं टाळावं.

कॉफीच्या जास्त सेवनाने होणारे दुष्परिणाम

Canava

  • गर्भवती महिलांमध्ये कॉफीचं सेवन जास्त केल्याने डोकेदुखी, चिडचिडेपणा, बेचैनी आणि मळमळ यासारखी लक्षणं दिसू शकतात.
  • कॉफी जास्त प्यायल्याने गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो. कॅफीन प्लेसेंटा आणि भ्रूणाच्या विकासात बाधा आणतात.
  • गर्भावस्थेदरम्यान कॉफी प्यायल्याने पचनासंबंधीच्या समस्याही होऊ शकतात. यामुळे गर्भावस्थेदरम्यान कमी कॉफी प्यावी.

पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं की, गर्भावस्थेदरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या इच्छा आणि मूड स्विंग्ज्स असतात. अशा परिस्थितीत अनेक महिलांना कॉफी घेतल्याने आराम मिळतो. अजूनही भारतात कॅफीनबाबत केलेल्या संशोधनामध्ये गर्भवती महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळामध्ये यकृतावर कॅफीनमुळे होणारे काही हानीकारक परिणाम दिसण्यात आले नाहीत. पण हे खरं आहे की, कॅफीनचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास गर्भवती मातेच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे गर्भावस्थेदरम्यान पूर्ण आराम मिळत नाही. ज्यामुळे माता आणि बाळ दोघांना नुकसान होऊ शकतं.

कॉफीसाठी काही पर्याय

Canava

  • जर तुम्ही गर्भावस्थेदरम्यान कॉफीचं सेवन करणार असाल तर त्यासोबत पाणी पिण्याचं प्रमाणही वाढवा. ज्यामुळे तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.
  • तसंच कॉफी पिताना काळी कॉफी न पिता दूध घातलेली कॉफी प्या. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियमसोबतच प्रोटीनही मिळेल. जे गर्भावस्थेत आवश्यक असतं.
  • गर्भावस्थेत कॉफी पिण्याऐवजी ताज्या फळांचा रस प्या. ज्यामुळे शरीराची व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट्सची कमतरता पूर्ण होईल.
  • नाश्त्याच्या वेळी कॉफीऐवजी हर्बल टी प्या. यामुळे तुमचं कॉफीची सवयही कमी होईल.
  • जर तुम्हाला गर्भावस्थेत मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर पुदीना आणि आल्याचा चहा घ्या.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.