तुमच्या कारची निगा राखण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

तुमच्या कारची निगा राखण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

आजकाल कार अथवा फोरव्हिलर विकत घेणं ही फार कठीण गोष्ट नक्कीच नाही. आर्थिक नियोजन करून तुम्ही तुमची ड्रीम कार विकत घेऊ शकता. कष्टाने घेतलेल्या पहिल्या गाडीवर तुमचं विशेष प्रेमही असतं. गाडी सुस्थितीत राहण्यासाठी वेळोवेळी तिची निगा राखण्याची गरज असते. ठराविकवेळी मेंटेनन्स, सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंग केल्यास तुमची गाडी अगदी चांगल्या स्थितीत राहते. जशी आपण स्वतःची काळजी घेतो अगदी तशीच आपण आपल्या गाडीदेखील काळजी घ्यायला हवी. कार नवीन असताना आपण तिची फार काळजी घेतो. जसं की ती खराब होऊ नये यासाठी सावलीत पार्क करतो, गाडीत रबरी मॅट ठेवतो, काही दिवस कारला कव्हरने झाकुन ठेवतो. मात्र जस जशी तुमची कार जुनी होऊ लागते तुम्ही या गोष्टी करण्याचा कंटाळा करू लागता. मात्र जर तुम्हाला तुमची गाडी नेहमीच सुस्थितीत राहावी असं वाटत असेल तर या टिप्स जरूर फॉलो करा. 

गाडीचे इंटेरिअर स्वच्छ ठेवा -

गाडीवर धुळ बसू नये यासाठी आपण गाडी बाहेरून नेहमी स्वच्छ करतो.  प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये आजकाल दररोज अथवा आठवड्यातून एकदा गाडी स्वच्छ करण्याची सेवा देणारे सफाई कामगार असतात. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची गाडी बाहेरून स्वच्छ ठेवू शकता. मात्र गाडीची निगा राखण्यासाठी एवढं करणं पुरेसं नाही. कारण जशी तुम्ही रोज तुमच्या गाडीची बाहेरून स्वच्छता राखता. तशीच ती कमीत कमी आठवड्यातून एकदा आतून स्वच्छ करणं  गरजेचं आहे. बऱ्याचदा गाडीत बसून काहीतरी खाऊ खाल्ला जातो. ज्यामुळे तुमच्या गाडीत खाद्यपदार्थांचे रॅपर, टोल आणि पेट्रोल, डिझेलच्या पावत्या, पायासोबत आलेली धुळ, माती, चिखल यामुळे तुमची गाडी आतून खराब होते. जर तिची वेळच्या वेळी आतून स्वच्छता नाही राखली तर वासामुळे गाडीत मुंग्या अथवा इतर उपद्रवी कीटक येण्याची शक्यता असते. यासाठी तुमच्या गाडीचे इंटेरिअर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. 

Shutterstock

गाडी सहा महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करा -

क्लिनिंग आणि वॉशिंग प्रमाणेच गाडीला वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करण्याची गरज असते. तुमच्या गाडीला कमीत कमी सहा महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करा. ज्यामुळे तुमची गाडी चांगल्या अवस्थेत राहील. 

गाडीचे नुकसान झाल्यास वेळीच ती रिपेअर करा -

नवीन असताना तुमच्या गाडीला साधा ओरखडा जरी उठला तरी तुम्हाला फार वाईट वाटतं. मग तो काढून टाकण्यासाठी तुम्ही पटकन प्रयत्न करता. मात्र नंतर काही दिवसांनी या गोष्टी नेहमीच्याच होतात. आजकाल एवढं ट्राफिक वाढत आहे की गाडी चालवताना कधी कधी डेंट, स्क्रॅच येणं स्वाभाविक आहे. यासाठी वेळच्या वेळी गाडी रिपेअर करण्याची सवय लावा. छोट्या छोट्या रिपेअरसाठी गाडीचा विमा काढणं सोयीचं  ठरेल. ज्यामुळे तुम्हाला रिपेअरचा खर्च जास्त होणार नाही. 

गाडीची सर्व्हिसिंग मानांकित सेंटरमधून करा -

आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नेहमी चांगल्या मानांकित डॉक्टरांकडेच जाता. अगदी त्याचप्रमाणे गाडी सर्व्हिस आणि रिपेअर करण्यासाठी चांगल्या मॅकेनिककडेच जा. अनाधिकृत ठिकाणी गाडी दुरूस्त करणं तुमच्या गाडीच्या आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाही. त्यामुळे थोडे पैसे खर्च झाले तरी चालेल पण चांगल्या सर्व्हिस सेंटरमध्येच गाडी रिपेअर करा. 

shutterstock

गाडीला तिचं खाद्य वेळच्यावेळी द्या -

आपल्याला जसं निरोगी राहण्यासाठी पोषकतत्त्वांची गरज असते अगदी तसंच तुमच्या गाडीला पेट्रोल, डिझेल, कुललेंट,ऑईल, पॉव्हर स्टिअरिंग फ्लुएड या गोष्टींची गरज असते. जर त्या गोष्टी वेळच्या वेळी मिळाल्या नाही तर तुमची गाडी नीट काम करू शकत नाही. त्यामुळे गाडीचा खाऊ गाडीला द्या. 

shutterstock

फोटोसौजन्य - फोटोसौजन्य

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

स्वप्नातलं घर साकारायचंय, ही घ्या मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनर्सची यादी

#HouseInterior : तुमचे घर किती हरित आहे?

तुमची 'ड्रीम कार' खरेदी करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा