लग्नाच्या मेन्यूमध्ये कधीच नसावेत हे खाद्यपदार्थ

लग्नाच्या मेन्यूमध्ये कधीच नसावेत हे खाद्यपदार्थ

लग्नकार्य म्हटलं की शाही थाट आलाच. लग्नात सजावट, कॅटरिंग अशा गोष्टींसाठी नेहमीच जास्त खर्च केला जातो. कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. शिवाय येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो. जेवण ही प्रत्येकासाठी नेहमीच खास गोष्ट असते. म्हणूनच लग्नातील जेवण प्रत्येकाच्या लक्षात राहतं. यासाठीच लग्नातील मेन्यू ठरवताना विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुमच्या घरात लग्नकार्य ठरलं असेल तर मेन्यू ठरवताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या. 

लग्नाच्या मेन्यूमध्ये कधीच या पदार्थांचा समावेश करू नका -

लग्नातील जेवण ठरवताना या गोष्टी मेन्यूमध्ये मुळीच ठेवू नका. कारण त्यामुळे तुमची फजिती होण्याची शक्यता आहे. 

मासे -

तुम्ही कितीही मासे खाणारे असाल तरी लग्नात माशांचे जेवण कधीच ठेवू नका. कारण माशांना विशिष्ठ प्रकारचा वास येतो. स्वयंपाक करत असतान जर हा वास आला तर तुमच्या लग्नाचा वेन्यू माशांच्या  वासाने दरवळेल. त्याचप्रमाणे मासे अतिशय महाग असतात. लग्नात येणारे पाहुणे शेकडो असतात. त्यामुळे हा मेन्यू फारच महागात पडू शकतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळणं आणि ते टिकवून ठेवणं नक्कीच सोपं नाही. 

पास्ता -

जर तुमच्या लग्नात लाईव्ह काउंटर असतील तरच पास्ता सर्व्ह करणं सोयीचं आहे. कारण पास्ता गरमागरम खाण्यातच मजा असते. थंड झाल्यावर तुम्ही पास्ता खाऊ शकत नाही. चुकून चिवट पास्ता सर्व्ह केला गेला तर तुमच्या पाहुण्यांसमोर तुमची फजिती होऊ शकते. 

Shutterstock

रुमाली रोटी -

रुमाली रोटीसाठीदेखील लाईव्ह काउंटर असणं मस्ट आहे.  शिवाय रुमाली रोटी करताना पाहणं हे कितीही मनोरंजक असलं तरी त्यासाठी वाट पाहणं नक्कीच त्रासदायक असू शकतं. जरी तुमच्या कॅटररने रोटी आधीच करून ठेवण्याचं आश्वासन दिलं तर ती चिवट होणार हे नक्कीच.

Shutterstock

पिझ्झा -

पिझ्झा तुमच्या कितीही आवडीचा असला तरी लग्नात पिझ्झा मुळीच ठेवू नका. कारण लग्नातील एवढ्या पाहुण्यांसाठी पटापट पिझ्झा तयार करणं नक्कीच सोपं नाही नाही.

Shutterstock

विविध प्रकारचे सॅलेड -

लग्नातील जेवण हे जितकं स्वादिष्ट, चमचमीत असेल तितकं ते लोकांना आवडतं. त्यामुळे विविध प्रकारचे सॅलेड लग्नात खाल्ले जातीलच असं  नाही. त्यामुळे चार ते पाच सॅलेडचे प्रकार ठेवणंच योग्य आहे.

नारळाची ग्रेव्ही आणि सोलकढी -

सोलकढी हा प्रकार कितीही लोकप्रिय असला तरी तो बराच काळ टिकू शकत नाही. त्यामुळे लग्नात नारळाच्या ग्रेव्ही आणि सोलकढी हे प्रकार मुळीच नसावेत.

पुरी -

लग्नातील जेवणात बऱ्याचदा पुरी असतेच. मात्र जेव्हा तुम्ही  गरमागरम पुरी वाढता तेव्हा ती तेलकट असते आणि थंड झाल्यावर त्याच पुरीला तेलाचा वास येतो शिवाय त्या चिवटही लागतात. म्हणूनच लग्नाच्या जेवणार पुरी नसलेलीच बरी.

Shutterstock

मशरूमच्या डिश -

मशरूम प्रत्येकाला आवडताच असं नाही. काही लोकांना मशरूमची अॅलर्जी असते. म्हणूनच लग्नातील जेवणात मशरूम मुळीच नको.

भेंडी -

भरलेली भेंडी लवकर नरम पडते ज्यामुळे लग्नाच्या मेन्यूत भेंडी नसावी. त्यामुळे तुम्हाला अथवा लोकांना भेंडी आवडत असेल तरी लग्नात हा मेन्यू ठेवू नका. 

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

लग्नात परफेक्ट लुक हवा मग, तुमच्यासाठी बेस्ट आहेत हे स्टायलिश ब्रायडल फुटवेअर

घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे

नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम