कांद्याची पात आपण नेहमीच खातो. विशेषतः चायनीज खाण्यामध्ये याचा जास्त उपयोग करण्यात आलेला आपल्याला दिसतो. पण कांद्याच्या पातीची तुम्ही भाजीही नेहमी करून खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित करण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करून घेता येऊ शकतो. भूक वाढण्यासाठीही कांद्याच्या पातीचा उपयोग करता येतो. कारण कांद्याची पात खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरल्यासारखं राहातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कांद्याची पात कच्ची अथवा शिजवून दोन्ही प्रकारात खाता येते. हिवाळ्यात कांद्याची पात खाण्याचे अनेक फायदे आहेत. सल्फरचा उत्कृष्ट स्रोत कांद्याची पात आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी याचा फायदा होतो. यामध्ये एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईडसारख्या गोष्टी कॅन्सररोधक असतात. अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी कांद्याच्या पातीचा उपयोग करून घेता येतो. थंडीमध्ये कांद्याची पात खाण्याचे फायदे पाहूया -
हिवाळ्यात ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांच्यासाठी हिरव्या पातीचा कांदा उपयोगी ठरतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी कांद्याची पात तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करून घ्या. हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात आणि या कारणामुळेच पचनशक्ती वाढण्यास मदत मिळते. हिरव्या पातीच्या कांद्यात क्रोमियम असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
हिरव्या कांद्याची पात ही प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी वाढण्यास मदत करते. हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळेच प्रत्येकाला सर्दी खोकला आणि अलर्जीसारखे आजारा बळवतात. पण तुम्ही जर कांद्याची पात तुमच्या रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट करून घेतलीत तर त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि आजार तुमच्यापासून दूर राहातात.
कांद्याच्या पातीमध्ये सल्फरचा चांगला स्रोत असतो. यामध्ये एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईडचे गुण असतात जे कॅन्सर रोखण्यास मदत करतात. कॅन्सर हा सध्या बऱ्याच जणांमध्ये आजार फोफावत जाताना दिसून येत आहे. पण यापासून दूर राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या जेवणामध्ये काद्याच्या पातीचा समावेश करून घ्यायला हवा.
हिस्टिरिया आजाराने तुम्ही त्रस्त असाल तर या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी केवळ हिरव्या कांद्याची पात खाल्लीच पाहिजे असं नाही तर त्यांनी त्या पातीचा वासही घेणं गरजेचं आहे. कोणत्याही माणसाला चक्कर आली तर त्या व्यक्तीला शुद्धीत आणण्यासाठी याचा उपयोग करता येतो. अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीहिस्टामाईन गुणांनी भरपूर असलेला हा पातीचा कांदा अस्थमाच्या रूग्णांसाठीही लाभदायक ठरतो.
कांद्याच्या पातीमधील सल्फर इथे मुख्य भूमिका निभावते. सल्फर अधिक प्रमाणात असल्यामुळे इन्शुलिनचं प्रमाण रक्तामध्ये वाढतं. त्यामुळे ज्यांना रक्तामध्ये साखर आहे अशा व्यक्तींनी आपल्या डाएटमध्ये कांद्याच्या पातीचा समावेश करून घ्यायला हवा. नियमित कांद्याची पात खाल्ल्याने साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळतं. याची आमटी अथवा सलाड खाल्ल्याने पोट साफ होतं आणि आतड्याही निरोगी राहतात. रात्री अथवा दुपारी तुम्ही तुमच्या जेवणात याचा समावेश केल्यास, पोट तर भरल्यासारखं राहतंच, शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक कॅलरी मिळते. त्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. जास्त भूक लागत नाही.
हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये कॅरोटीनॉईड असतं जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली करण्यासाठी उपयुक्त ठरतं. कांद्याच्या पातीमध्ये विटामिन ए चं प्रमाण असतं. हे गाजर अथवा काकडीसह खाल्ल्यास याचा अधिक फायदा तुमच्या डोळ्यांना आणि शरीराला मिळतो.
जिवाणूविरोधी आणि अँटीव्हायरल गुणांनी उपयुक्त असलेल्या हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये ताप आणि सर्दीशी लढण्याची जास्त ताकद असते. तसंच शरीरामध्ये व्हायरस निर्माण होण्यापासून रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे सर्दी खोकला असल्यास, त्वरीत कांद्याच्या पातीचे सूप करून प्यावे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.