झटपट वजन कमी करायचं असेल तर रात्री करा ‘हे’ काम

झटपट वजन कमी करायचं असेल तर रात्री करा ‘हे’ काम

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर केवळ डाएट प्लॅन (Diet Plan) आणि जिममध्ये जाऊन घाम गाळण्याने सर्व काही होणार नाही. तसंच जे लोक तुम्हाला रात्रीचं जेवण न जेवण्याचा सल्ला देतात त्यांचंही तुम्ही ऐकू नका. कारण असं केल्याने वजन कमी नाही होत तर दुपटीने वाढतं. तुम्ही रात्री जेवला नाहीतर तर रात्री भूक लागल्यानंतर हाय कॅलरी फूड खाल्लं जातं त्यामुळे वजन वाढतं. तसंच काही जण रात्रीचं कमी जेवतात. पण असं काहीच करू नका. जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर रात्री तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काही गोष्टींचा समावेश करून घ्या. तसंच झोपायच्या आधी काही तास तुम्ही व्यवस्थित जेवलात तर तुमचं जेवण पचायला नक्कीच मदत होते.  आपण काय खात आहोत आणि कधी खात आहोत हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी आपल्या रात्रीच्या जेवणात आम्ही लेखात दिलेल्या गोष्टींचा नक्की समावेश करून घ्या आणि मग बघा तुमचं वजन कमी होतं की नाही.

1. ग्रीन टी चा करा समावेश

Shutterstock

वजन कमी करायचा असेल तर तुम्ही ग्रीन टी पिणं सुरू करा. वजन कमी करण्याचं तुमचं टारगेट पूर्ण करण्यासाठी ग्रीन टी अत्यंत फायदेशीर ठरतो. ग्रीन टी ने मेटाबॉलिजम जलद होण्यासाठी मदत मिळतं. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ग्रीन टी प्या आणि त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचं आपलं टारगेट लवकर पूर्ण करू शकता. 

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

2. वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर खा चेरी

Shutterstock

हे वाचून तुम्हाला थोडंसं विचित्र वाटू शकतं. पण हे खरं आहे. तुम्ही तुमचं जेवण झाल्यानंतर चेरी खाल्ली तर तुम्हाला चांगली झोप लागते आणि त्यामुळे वजन कमी होण्यसाठीही मदत मिळते. चेरीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे तुमच्या पोटातील सूज कमी होते आणि अन्न पचायलाही मदत  मिळते. तसंच रात्रीच्या जेवणाची वेळ आणि झोपेची वेळ यामध्ये किमान दोन तासांचं अंतर तुम्ही ठेवा. 

3. जेवणात समावेश करून घ्या बदामाचा

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये बदामाचा समावेश करून घ्या. बदामामध्ये अनेक पोषक तत्व असतात तसंच यामध्ये आढळणारे प्रोटीन हे तुमच्या मसल्सना रिपेअर करतात. याशिवाय हे शरीरातील चरबी कमी करण्यासाठीही मदत करतात. बदामाशिवाय तुम्ही कच्च्या नट्सचाही वापर करून घेऊ शकता. मात्र आपल्या जेवणात याचा समावेश नक्की करून घ्या. 

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

4. ब्रोकोलीदेखील करते मदत

Shutterstock

तसं बघायला गेलं तर ब्रोकोली एक भाजी आहे पण यामध्ये अनेक गुण आहेत. आपल्या जेवणात ब्रोकोलीचा समावेश जर तुम्ही करून घेतलात तर तुम्ही तुमच्या वजनावर नक्कीच नियंत्रण आणू शकता. वाढत्या वजनापासून ज्यांना त्रास आहे त्यांनी नक्कीच याचा फायदा करून घ्यावा. तुम्ही जर ब्रोकोली कच्ची खाऊ शकत असाल तर हे उत्तमच आहे. ब्रोकोली तुम्ही सलाड स्वरूपात रात्रीच्या जेवणामध्ये खाल्ली तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं. 

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

5. वजन कमी करण्यासाठी अंड्याचा करू शकता वापर

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी अंडीदेखील उपयोगी ठरतात. अंडी उकडून खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळतं तसंच तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठीदेखील मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी अंडी तुम्ही रात्रीच्या जेवणात समाविष्ट करून घ्या. फक्त याचंं प्रमाण ठरवून घ्या. अतिरिक्त खाणंही ठरू शकतं त्रासदायक. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.