मासिक पाळी म्हटलं की प्रत्येक महिलेसाठी हा एक नाजूक विषय आहे. काही जणींना या दिवसात होणारा त्रास, तर या चार दिवसात विविध गोष्टींना सामोरं जावं लागतं. कधीकधी काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं नेमकं तेव्हाच अथवा कोणत्याही सणासमारंभाच्या दिवशीच मासिक पाळीचा त्रासही सहन करावा लागतो. अशावेळी मासिक पाळी लवकर यायला हवी असते. मग काही जणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मासिक पाळी लवकर आणण्यासाठी गोळ्या घेतात. पण त्यासाठी तुम्ही घरगुती गोष्टींचा अवलंबदेखील करू शकता. खरं तर मासिक पाळी येण्याची तारीख आणि वार हा परफेक्ट ठरलेला नसतो. साधारण 28 दिवसांनी पाळी येते. पण काही जणींच्या बाबतीत ही तारीख बऱ्याचदा मागेपुढे होत असते. कधीतरी असं होतं की, दिवस उलटून गेले तरीही मासिक पाळी येत नाही. अशावेळी आपली अधिक चिडचिड होत असते. पाळी उशीरा आली किंवा खूप आधी आली तर या दोन्हीही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. पाळी वेळेवर येणं म्हणजे आपण निरोगी असणं. त्यामुळे असं कधी झालं तर तुम्हाला मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय उपाय करता येतील हे आपण पाहूया -
आलं हे मुळातच उष्ण असतं. असं म्हटलं जातं की, पूर्वीच्या काळी मासिक पाळी लवकर येण्यासाठी आल्याचा वापर करण्यात येत असे. तुम्ही आताही आल्याचा चहा पिऊन मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रयत्न करू शकता. पण याचा अतिरेक करू नका. आलं हे आरोग्यासाठी जितकं चांगलं तितका त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणात तुम्ही आल्याचा चहा दिवसभरातून दोन वेळा जरी प्यायलात तरी तुम्हाला मासिक पाळी लवकर आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
हळदीचं नाव वाचल्यानंतर कदाचित तुम्हाल आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. हळददेखील उष्ण आहे. त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा दुधातून हळद घालून घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. शिवाय हळद आणि दूध हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. हळद ही अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि मुळात असं केल्याने मासिक पाळीच्या दिवसात त्रासही होत नाही. पोटात दुखणं कमी होतं.
एकत्र राहणाऱ्या मुलींची मासिक पाळीची तारीख का येते पुढेमागे, जाणून घ्या सत्य
ओवा हा खरं तर पोटातील आजारांवर उत्तम उपाय आहे. त्याशिवाय ओव्यातदेखील उष्णता जास्त आहे. ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येण्याचा त्रास आहे त्यांनी गुळासोबत ओव्याचं सेवन करणं हा उत्तम पर्याय आहे. मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही 1 चमचा ओवा आणि 1 चमचा गूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असं केल्याने तुम्हाला मासिक पाळी लवकर येते. त्याचा तुम्हाला त्रासही होत नाही आणि हे अतिशय नैसर्गिक उपचार आहेत. ज्यामुळे तुमच्या प्रकृतीला कोणतीही बाधा येत नाही.
ऊसामध्येही जास्त उष्णता असते. त्याशिवाय ऊसाच्या रसामध्ये लिंबू आणि आलंदेखील मिक्स करण्यात येतं. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठीही हादेखील एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे. तुम्हाला जर ऊसाचा रस प्यायला आवडत असेल तर मासिक पाळीच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि लवकर मासिक पाळी येण्यासाठी हा पर्याय तुम्ही अवलंबू शकता.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.