चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Pigmentation In Marathi)

चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचा चेहरा डागविरहीत आणि सुंदर असावा असं वाटतं. पण असं होत नाही. आजकाल बरेचदा अनेकजणांना चेहऱ्यावरील वांग (Pigmentation) च्या समस्येला सामोरं जावं लागतं. चेहऱ्यावरील वांग म्हणजेच पिगमेंटेशन ही एक अशी समस्या आहे, जी महिलांना वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात जाणवतेच. पिगमेंटेशनमुळे त्वचा असमान आणि वाईट दिसते. तसं तर आजकाल महिला स्कीन टोन समान दिसण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कलर करेक्टर, कंसीलर, फाउंडेशन आणि बीबी क्रीमचा वापर करतात. पण ज्या महिला या सौंदर्य प्रसांधनांचा वापर करत नाहीत आणि वांगच्या समस्येवर घरगुती उपाय जाणू इच्छित असतील. त्यांच्यासाठी या लेखात आम्ही वांग (पिगमेंटेशन) ची सर्व माहिती देत आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही वांग त्वचा रोग समस्येपासून सुटका मिळवू शकता.

Table of Contents

  वांग म्हणजे काय ? (What Is Pigmentation)

  वांग असलेला चेहरा दर्शविणारी महिला

  स्कीन एक्सपर्टनुसार पिगमेंटेशन महिलांमध्ये दिसून येणारी एक साधारण त्वचा समस्या आहे. ज्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. पण तरीही पिगमेंटेशन हे महिलांच्या सेल्फ कॉन्फिडंस आणि सेल्फ एस्टीमसाठी मात्र हानीकारक आहे. ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात. पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणे आणमि अनेकदा यामागील कारण एखादी अलर्जीही असू शकते. रंगद्रव्य टाळण्यासाठी त्वचेची काळजी घ्या. जर तुम्ही वांग वर उपाय शोधात असाल तर तुम्हाला पुढील माहिती असणं आवश्यक आहे.

  वांग किंवा पिगमेंटेशनची मुख्य कारणे (Causes Of Pigmentation In Marathi)

  चेहऱ्यावरील वांग

  वांग या त्वचेच्या समस्येची अनेक कारणं असू शकतात. जाणून घेऊया यातील काही प्रमुख कारणं. जी आहेत पुढीलप्रमाणे.

  1. सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे (Harmful Rays Of Sun)

  आपलं शरीर सूर्याच्या हानीकारक किरणांपासून सुरक्षा करण्यासाठी जास्त प्रमाणात मेलनिन या घटकाची निर्मिती करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर डार्क स्पॉट्स किंवा सन स्पॉट्स येऊ शकतात.

  2. त्वचेची जळजळ (Inflammation Of Skin)

  त्वचेला जळजळ झाल्यास त्यामुळेही काही भाग काळवंडू शकतो. यामध्ये एक्ने, एक्झेमा, लपस किंवा जखमेचाही सामावेश असू शकतो. जास्तकरून ज्यांची त्वचा जास्त गडद असते त्यांना पोस्ट इंफ्लमेट्री हायपरपिगमेंटेशनची समस्या जाणवते.

  3. जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणं (Working On Computer)

  खूप कमी जणांना माहीत असेल की, जास्त वेळ कॉम्प्युटर समोर बसल्यामुळे किंवा टीव्हीसमोर बसल्यानेही पिगमेंटेशनची समस्या जाणवू शकते. कॉप्युटर स्क्रीन, टीव्ही स्क्रीन, फ्लोरोसंट प्रकाशातून उत्सर्जित प्रकाश किरणांमुळेही चेहऱ्यावर डार्क स्पॉटचं कारण बनू शकतं. टीव्ही किंवा कॉप्युटरसमोर जास्त वेळ बसल्यामुळे हे होतं. जर तुमच्या जॉबमध्ये दिवसभर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसावं लागत असेल तर थोड्या थोड्या वेळाने आवर्जून ब्रेक घ्या. 

  4. बर्थ कंट्रोल पिल्स (Birth Control Pills)

  हार्मोनमध्ये बदल झाल्यामुळे हायपरपिगमेंटेशन होऊ शकतं. याच कारणामुळे गर्भवती महिलांच्या चेहऱ्यावर काळे डाग येतात. पण हे डाग प्रसूतीनंतर कमीसुद्धा होतात. त्यामुळे महिलांनी अशा उत्पादनांपासून दूर राहावं ज्यामध्ये हार्माेनची मात्रा जास्त असते. ज्याला मायोरल असे म्हणतात. जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेणार असाल तर डॉक्टरांकडून एस्ट्रोजनचं कमीत कमी प्रमाण असलेल्या बर्थ कंट्रोल पिल्स लिहून घ्याव्यात.

  5. फेशियल हेअर रिमूव्हल (Facial Hair Removal)

  चेहऱ्यावरील केसांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण बरेचदा क्रीम्सचा वापर करतो. त्यामुळेही पिगमेंटेशनची समस्या जाणवते. अशा उत्पादनातील केमिकल्समुळे स्किन डिस्कलरेशन निर्माण होऊ शकतं. जर तुम्हाला केस हटवण्यासाठी वॅक्स करत असाल तर सॉफ्टऐवजी हार्ड वॅक्सचा वापर करा.

  6. औषधांचा दुष्परिणा (Medicine Side Effects)

  काही औषधांमध्ये अँटीमलेरियर ड्रग्ज्स आणि ट्रायसायकलिक अँटीडिप्रेसट्ंस घटक असतात. जे हायपरपिगमेंटेशनची समस्या निर्माण करून त्वचेवर डाग निर्माण करतात. काही उपचारातील केमिकल्समुळेही कधी कधी हायपरपिगमेंटेशन होऊ शकतं.

  वांग त्वचेच्या समस्येची लक्षणे (Symptoms Of Pigmentation In Marathi)

  पाठी वरील वांग

  वांग किंवा पिगमेंटेशन या त्वचेच्या समस्येमुळे बरेचदा महिलांचा आत्मविश्वासात कमी होतो. कारण या त्वचा समस्येमुळे जाणवणारी लक्षणंही तशीच आहेत. 

  • या समस्येमुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन असमान आणि खराब दिसू लागतो. ही समस्या बरेचदा वयाच्या चाळीशीतही अनेक महिलांना झाल्याचं दिसून येतं. 
  • काळे डाग आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूणा दिसू लागतात. 
  • यामुळे साहजिकच तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसू लागतो. 
  • वांगमुळे तुमचा चेहरा वय वाढण्याआधीच जास्त वयस्क वाटू लागतो.

  चेहऱ्यावरील वांगमध्ये आढळणारे प्रकार (Types Of Pigmentation In Marathi)

  चेहऱ्यावरील वांग किंवा पिगमेंटेशन हे एकाच प्रकारचं नाही. यातही काही प्रकार आढळून येतात. जाणून घेऊया पिगमेंटेशनच्या या प्रकारांबाबत थोडक्यात.

  1. फ्रेकल्स (Freckles)

  वांग म्हणजेच पिगमेंटेशनचा सर्वात कॉमन प्रकार म्हणजे ephelides किंवा freckles. हे सूर्यप्रकाशाच्या जास्तीतजास्त संपर्कात आल्यामुळे विकसित होतात. विशेषतः जर तुमचा रंग उजळ असेल तर हे जास्त प्रमाणात दिसून येतं. आनुवंशिकतेमुळेही freckling चा प्रभाव दिसतो.

  2. सोलर लेंटीजाईन्स (Solar Lentigines)

  हे पिगमेंटेशन लिव्हर स्पॉट किंवा सन स्पॉटच्या रूपातही ओळखलं जातं. तसंच याला पिगमेंटेड स्पॉट असंही म्हणतात. हे शरीरावर कुठेही होऊ शकतात आणि हलक्या काळ्या रंगात असतात. हे डाग यूव्ही सूर्य किरणांमुळे होतात. हे झाल्यास लक्ष देणं गरजेचं आहे कारण यामुळे त्वचेचा कॅन्सर आणि मेलेनोमासुद्धा होऊ शकतं.

  3. मेलास्मा (Melasma)

  मेलास्मा किंवा क्लोस्मा पिगमेंटेशन हे त्वचेच्या डर्मिसमध्ये जास्त गडद असतं. हे चेहऱ्यावर मोठ्या चॉकलेटी रंगाच्या पॅचमध्ये दिसून येतात. अशा प्रकारची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. हे साधारणतः हार्मोनल बदलांमुळे जास्त होताना दिसते.

  4. पोस्ट इंफ्लमेट्री हायपरपिगमेंटेशन (Post-Inflammatory Hyperpigmentation)

  ही स्थिती त्वचेवर सूजेमुळे झालेल्या जखमेनंतर निर्माण होते. नंतर याची खूण होते, जी लाल, जांभळ्या, काळ्या आणि चॉकलेटी रंगात दिसते.

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Pigmentation In Marathi)

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय करताना खालील सोपे उपाय तुम्ही करून पाहू शकता. हे उपाय अगदी घरगुती आणि सोपे आहेत.

  1. कच्चा बटाटा (Raw Potatoes)

  साहित्य -1 कच्चा बटाटा, पाण्याचे काही थेंब 

  कसा कराल वापर - एक कच्चा बटाटा घ्या आणि तो अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा. आता ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही महिन्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करू शकता. 

  असा होतो उपयोग - कच्चा बटाटा पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आश्चर्यकारक उपाय आहे. असं म्हणतात की, पिगमेंटेड एरिया आणि काळ्या डागांवर कच्चा बटाटा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करतो. यामधील कॅटेकोलेज नावाच्या एंजाइम मेलानोसाइट्सला रोखण्यात मदत करतं आणि जास्त मेलनिनच्या निर्मितीत बाधा निर्माण करतं.

  2. लिंबू (Lemon)

  वांगसाठी लिंबू चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

  साहित्य - 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे मध 

  कसा कराल वापर - पिगमेंटेशनच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. जोपर्यंत तुम्हाला परिणाम दिसत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. 

  असा होतो उपयोग - लिंबाचा रस हा नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असून मध हे उत्तम मॉईश्चराईजरच्या रूपात काम करतं. पिगमेंटेशन दूर करण्यात लिंबातील व्हिटॅमीन सी हा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामध्ये प्रभावकारी अँटीऑक्सीडंट असतात. जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून युव्ही किरणांमुळे होणार नुकसानही टाळतात.

  3. एपल साईडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

  चेहऱ्यावर वांग काढण्याचे उपाय एपल साईडर व्हिनेगर

  साहित्य - एपल साईडर व्हिनेगर एक चमचा, 2 मोठे चमचे पाणी 

  कसा कराल वापर - एपल साईडर व्हिनेगर हे पिगमेंटेशनसाठी खूप चांगला घरगुती उपायांपैकी एक आहे. यामध्ये पाण्याचे काही थेंब टाकून ते पातळ करून घ्या. नंतर ते चेहऱ्यावरील प्रभावित ठिकाणी लावा. 5 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. 

  असा होतो उपयोग - जर तुम्हाला वांग किंवा पिगमेंटेशनचा त्रास असेल तर यामुळे प्रभावित भागावर तुम्ही एपल साईडर व्हिनेगर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या रंग प्राप्त होण्यास मदत होईल. या व्हिनेगरमध्ये बीटा-कॅरटीन असतं. जे फ्री रॅडिकल्सने सूर्यप्रकाशामुळे झालेल्या त्वचेच्या नुकसानावर इलाज करतं. एपल साईडर व्हिनेगर स्वाभाविकपणे त्वचेला कोमल बनवण्यासाठीही वापरलं जातं. 

  4. कोरफड (Aloe Vera)

  साहित्य - 2 मोठे चमचे कोरफड जेल, अर्धा मोठा चमचा मध 

  कसा कराल वापर - पिगमेंटेशनसाठी चेहऱ्यावर एलोव्हेरा लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता. तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक नक्कीच जाणवेल. त्वचा डागविरहीत आणि चमकदार दिसेल.

  असा होतो उपयोग - कोरफड म्हणजेच एलोव्हेरा हे नैसर्गिक पीएच आणि तेल संतुलनला धक्का न लावता त्वचा साफ करण्यासाठी ओळखलं जातं. हे डार्कस्पॉट कमी करण्यासही मदत करतं आणि एवढचं नाहीतर यूव्ही किरणांमुळे होणारं नुकसानापासूनही संरक्षण करतं. पिगमेंटेशनच्या समस्येपासून मुक्तीसाठी तुम्ही एलोव्हेराचा वापर नक्की करून पाहा.  5. दही (Dahi)

  दही वांग वर उपाय

  साहित्य - मोठा चमचा दही          

  कसा कराल वापर - दही पिगमेंटेशनला दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. एका बाऊलमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि सुक्या टॉवेलने पुसा. दह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास किमान दोन आठवडे लागू शकतात

  असा होतो उपयोग - दह्यामध्ये लॅक्टिक एसिड असतं जे त्वचा एक्सफॉलिएट करण्यात मदत करतं. जे हळूहळू मेलानोसाइट्सचा प्रभाव कमी करतं. हे हायपरपिगमेंटेशन कमी करून तुमच्या त्वचेचा रंग उजळवण्यात मदत करतं. पिगमेंटेशन दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. 

  6. पपई (Papaya)

  साहित्य – 2 मोठे चमचे पपईचा गर, 1 मोठा चमचा मध, 1 मोठा चमचा दूध.

  कसा कराल वापर - पपई पिगमेंटेशनवरील अजून एक घरगुती उपाय आहे. या घरगुती उपायासाठी एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करून चांगलं फेटून घ्या. आता हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि 30 मिनिटं तसंच राहू द्या. आता चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता. 

  असा होतो उपयोग - पपईमध्ये पपॅन नावाचा घटक असतो जो आश्चर्यकारकरित्या तुमच्या चेहऱ्याला एक्सफॉलिएट करतो. हे नव्या पेशींच्या वाढीला प्रोत्साहन देत मृत पेशींना तोडून नाश करतं. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.

  7. केळ (Banana)

  केळ वांग घालवण्याचे घरगुती उपाय

  साहित्य - अर्ध केळं, ¼ चमचा मध, 1 चमचा दूध     

  कसा कराल वापर - सर्वात आधी केळ कुस्करून घ्या. केळं पूर्णतः कुस्करल्यावर त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

  असा होतो उपयोग - पिगमेंटेशनला दूर करण्यासाठी केळं हा खूप सोपा उपाय आहे. केळं हे एक नैसर्गिक एक्सफॉलिएटरच्या रूपात काम करून त्वचा स्वच्छ करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांग कमी होतात. केळं हे व्हिटॅमीन पोटॅशिअमयुक्त असतं. जे तुमच्या त्वचेला पोषण देत आणि निरोगी ठेवतं. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता.

  8. चंदन पावडर (Sandalwood Powder)

  साहित्य – 2 मोठे चमचे चमचे चंदन पावडर. 2 मोठा चमचा गुलाबपाणी

  कसा कराल वापर - पिगमेंटेशनवर चंदन हा प्रभावी घरगुती उपाय आहे. हा उपाय करण्याकरिता वरील घटक मिक्स करून घ्या. सरसरीत पेस्ट करून प्रभावित जागी लावा. 30 मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता. 

  असा होतो उपयोग - चंदन हा एक उत्कृष्ट रक्तशुद्ध करणारा घटक आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांग कमी होण्यास मदत होते. हा घटक सनस्क्रीनमध्ये वापरला जातो. यामुळे त्वचेचं हानीकारक यूव्ही किरणांपासून संरक्षण होतं.

  9. बदाम (Badam)

  बदाम चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय

  साहित्य - 5-6 बदाम, 1 चमचा मध, लिंबाच्या रसाचे काही थेंब, ½ चमचा दूध (आवडीनुसार)

  कसा कराल वापर - बदामाच्या मदतीने पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या बदामाची पेस्ट बनवा. या मिश्रणात तुम्ही दूधही घालू शकता. नंतर यात इतर साहित्यही मिक्स करा आणि वांग डाग असलेल्या भागावर लावा. हा उपाय रात्री झोपण्याआधी करावा रात्रभर चेहऱ्यावर हे मिश्रण तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. दोन आठवडे नियमितपण रात्री झोपण्याआधी हा उपाय करून पाहा. तुम्हाला डागांपासून सुटका मिळेल

  असा होतो उपयोग - बदाम हा व्हिटॅमीन ई चा उत्तम स्त्रोत आहे. ज्याला स्कीन व्हिटॅमीन असंही म्हटलं जातं. हे व्हिटॅमीन एक प्रभावी अँटीऑक्सीडंट आहे ज्यामुळे त्वचेच्या उपचारात मदत होते आणि त्वचा निरोगी राहते. 

  10. संत्री (Orange)

  साहित्य - एक संत्र्याचं साल, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा दूध, एक चमचा मध. 

  कसा कराल वापर - जर तुम्हाला पिगमेंटेशनपासून जलद सुटका हवी असेल तर संत्र्याचा घरगुती उपाय नक्की करून पाहा. यासाठी सर्वात आधी एका संत्र्याचं साल उन्हात पूर्ण सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर या सालाची बारीक पावडर करा आणि या पावडरमध्ये वरील साहित्य घाला. चांगल मिश्रण करा आणि चेहऱ्यावरील प्रभावित जागी लावा. जवळपास 20 मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच राहू द्या. मग कोमट पाण्याने धुवून टाका. पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आणि जलद परिणामासाठी हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता. 

  असा होतो उपयोग - संत्र्याच्या सालामध्ये सायट्रीक एसिड असतं जे मेलनिनचा परिणाम कमी करण्यात मदत करतं. ज्यामुळे त्वचेवर याचा चांगला परिणाम होतो. 

  पिगमेंटेशनसाठी खास फेसपॅक (Face Packs For Pigmentation In Marathi)

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी फेसपॅक लावणारी महिला

  चेहऱ्यावर वांग काढण्याचे उपाय करताना तुम्ही खालील फेसपॅकचाही उपयोग करू शकता.

  1. मध आणि लिंबाचा फेसपॅक (Honey & Lemon Face Pack)

  पिगमेंटेशन दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि लिंबाचा फेसपॅक खूपच प्रभावी ठरतो. यासाठी तुम्ही एक चमचा मधात दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करून तो चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक 20 मिनिटं तसाच राहू द्या आणि मग धुवून टाका.

  2. बदाम आणि दही (Almond & Curd Face Pack)

  पिगमेंटेशनवरील सोप्या उपायांमध्ये दही आणि बदामापासून बनवलेला फेसपॅक आहे. तीन ते चार बदाम वाटून घ्या आणि ते दह्यात मिक्स करा. ही पेस्ट बनवून झाल्यावर ती चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक 10 मिनिटं चेहऱ्यावर तसाच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

  3. लिंबू आणि गुलाबपाणी (Lemon & Rose Water Face Pack)

  पिगमेंटेशनच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि गुलाबपाण्याचाही वापर करू शकता. हा फेसपॅक शरीराचा जो भाग काळवंडला आहे त्यावर लावा. आता दहा मिनिटं हा फेसपॅक तसाच राहू द्या आणि धुवून टाका. हा उपाय तुम्ही रोज केल्यास तुम्हाला लवकरच त्वचेत फरक जाणवेल.

  4. तांदूळाचं पीठ आणि दही (Rice Flour & Yogurt)

  पिगमेंटेशनवरील उपायांमध्ये तांदूळाचं पीठ आणि एक चमचा दही मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. हे एखाद्या स्क्रबप्रमाणे त्वचेवर परिणाम करेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका. यासोबतच चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम वापरूनही तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करू शकता. 

  पिगमेंटेशन आणि प्रेग्नन्सी (Pigmentation In Pregnancy)

  पिगमेंटेशनची समस्याही प्रेग्नन्सीमध्ये सर्वात जास्त उद्भवते. शरीराचे काही भाग प्रेग्नन्सीदरम्यान काळवंडतो. खासकरून चेहऱ्याचा आणि मानेच्या काही भागावर याचा परिणाम जास्त दिसून येतो. गर्भावस्थेत चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यामुळे आणि शरीरातील हार्मोनल बदलामुळे या समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात स्पेशलिस्ट सल्ला देतात की, प्रेग्नंट महिलांनी उन्हात बाहेर जाणं टाळावं. जर तुम्ही उन्हात जाणार तर चांगलं सनस्क्रीन नक्की लावा. भारतीय हवामान आणि सूर्य किरणांच्या प्रखरतेनुसार 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेलं सनस्क्रीन वापरा. तसंच उन्हात जाताना छत्री आणि स्कार्फचाही वापर करा.

  चेहऱ्यावर वांग काढण्याचे उपाय (Tips To Reduce Pigmentation In Marathi)

  चेहऱ्यावरील वांग वर चिंता असलेल्या स्त्रिया

  तुम्ही पिगमेंटेशन टाळण्यासाठी पुढील उपायही करू शकता. वाचा या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात फॉलो करू शकता. 

  • पिगमेंटेशनपासून बचावासाठी तुम्ही मुख्यतः सूर्यप्रकाशात जाताना किंबहुना घराबाहेर पडताना चेहरा आणि शरीराचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार आहे. त्याला न विसरता सनस्क्रिन लावा. 
  • पिगमेंटेशनपासून सुरक्षेसाठी शारिरीक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. कधीही तुमचे हातपाय धुताना चेहऱ्याला हात लावणं टाळा. 
  • जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा. याऐवजी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केल्यास कधीही उत्तम ठरेल. 
   रोजच्या रूटीनसोबत प्रॉपर स्किन केअर रूटीनही फॉलो करा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा त्वचा एक्सफॉलिएट करायला विसरू नका. 
  • जर तुम्ही जास्त प्रमाणात ब्लीचिंग करत असाल तर ते टाळा. कारण ब्लीचिंगमुळे जास्त प्रमाणात पिगमेेंटेशनची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला ब्लीच करायचंच असेल तर त्यासाठी टोमॅटो किंवा लिंबू यासारख्या नैसर्गिक ब्लीचचा वापर करणं कधीही चांगलं असतं.
  • पिगमेंटेशनपासून बचावासाठी चेहऱ्याला तीन चार दिवसात एकदा स्क्रब करा. यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर आवर्जून करावा. मुलतानी माती त्वचेतून जास्त प्रमाणात उत्सर्जित होणाऱ्या तेलाला कंट्रोल करते. त्यामुळे याचा उपयोग फेसपॅक म्हणूनही करू शकता.
  • घरातून बाहेर पडताना न विसरता सनस्क्रीन लावा.
  • जेवढं शक्य असेल तेवढं पाणी प्या. कारण डिहायड्रेशनमुळेही तुमचा चेहरा थकलेला आणि कोमजलेला दिसतो. त्यामुळे दिवसभरात किमात 9-10 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे तुमची त्वचा तजेलदार आणि डागविरहीत राहील. 

  वांग किंवा पिंगमेंटेशनबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQ's)

  1. यकृतामुळे त्वचा काळवंडण्याची समस्या निर्माण होऊ शकते का?

  त्वचा काळवंडण्याबाबतची समस्या ही अंतर्गत आजाराच्याा समस्येमुळे उद्भवू शकते. त्वचा पिवळसर दिसणं हे यकृताच्या आजारामुळे होऊ शकतं. तसंच त्वचा काळवंडणे ही समस्याही तुमच्या यकृताशी निगडीत असू शकते.

  2. त्वचा काळवंडण्याची इतर कारणं कोणती?

  हायपर पिंगमेंटेशन हे मुख्यतः शरीरात मेलनिनच्या अतिरिक्त निर्मितीमुळे होते. तसंच सूर्यप्रकाशात जास्त गेल्यामुळेही शरीरात जास्त प्रमाणात मेलनिनची निर्मिती होऊ शकते.

  3. बटाट्याचा वापर पिगमेंटेशनसाठी चांगला आहे का?

  कच्चा बटाट्यातील एन्झाईम ज्याला कॅटेकोलाज असं म्हणतात. हे तुमच्या शरीरातील मेलनिनची निर्मिती कमी करते. त्यामुळे कच्चा बटाट्याचा वापर हा त्वचा उजळण्यासाठी करणं अगदी उत्तम आहे. चेहर्यावरील वांग उपाय करताना घरगुती उपायांमध्ये कच्च्या बटाट्याचा वापर तुम्हाला कसा करता येईल हे सांगण्यात आलं आहे.

  4. तणावामुळे पिगमेंटेशनची समस्या होऊ शकते का?

  शरीरात अतिरिक्त प्रमाणात निर्माण होणाऱ्या कॉर्टिसॉलमुळे जास्त प्रमाणात मेलनिनची समस्या होऊ शकते. ज्यामुळे हायपर पिगमेंटेशनची समस्या जाणवते. जर तुम्हाला तणावामुळे रात्री झोप लागत नसेल तर यामुळे मेलटॉनिन नावाच्या हार्मोनवरही परिणाम होतो.