पावलांना येणारा घामाचा वास घालवण्यासाठी करा या सोप्या टिप्स

पावलांना येणारा घामाचा वास घालवण्यासाठी करा या सोप्या टिप्स

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला कव्हर करता. स्वेटर, हुडी, मफ्लर, हातमोजे आणि पायमोजे या दिवसात आवर्जून घातले जातात. सतत पायात मोजे घातल्यामुळे पायांना घाम येतो. ज्यामुळे मोजे काढल्यावर पावलांना दुर्गंध येतो. चारचौघात हा घाणेरडा वास आल्यास तुम्हाला संकोच वाटू लागतो. जर तुम्हाला ही समस्या सहन करावी लागत असेल तर पायाचा दुर्गंध कमी करण्यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही पायाचा घाणेरडा वास कमी करू शकता.

Shutterstock

पायाला घाणेरडा वास येण्यामागचं नेमकं कारण -

घरातील वातावरण स्वच्छ आणि निर्जंतूक असतं. मात्र घराबाहेरचं वातावरण या उलट म्हणजे प्रदूषित असतं. वातावरणातील जीवजंतू तुम्ही चालताना तुमच्या फूटवेअर आणि पायावर बसत असतात. पाय सतत फूटवेअर आणि सॉक्समध्ये असल्यामुळे ते बॅक्टेरिआ तुमच्या पावलांवर लागतात. घराबाहेर असल्यामुळे तुम्ही पाय धुतही नाही. सतत एकाच प्रकारचे फूटवेअर आणि न धुतलेले मोजे घातल्यामुळे ते सातत्याने तुमच्या पायावरच राहतात. यामुळे तुम्हाला त्वचेच्या आरोग्य समस्या अथवा फंगल इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. सतत पायाचा संपर्क जीवजंतूसोबत आल्यामुळे आणि फूटवेअर, सॉक्स यातून निर्माण होणाऱ्या घामातून तुमच्या पायांना दुर्गंध येऊ लागतो. 

Shutterstock

पायाला येणारा घाणेरडा वास कमी करण्यासाठी सोप्या टिप्स -

  • बेकिंग सोडा पाण्यात टाका आणि त्यात पाय बुडवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या पायांना येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होईल.
  • ब्लॅक टीमुळे तुमच्या पायांना येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होऊ शकतो. यासाठी दोन ब्लॅक टी बॅग एका कपमध्ये उकळून घ्या हे पाणी टबमध्ये टाका त्यात कोमट पाणी मिसळा आणि दहा ते पंधरा मिनीटे पाय बुडवून ठेवा.
  • खडे अथवा जाडे मीठ पाण्यात मिसळा आणि त्यात रात्री झोपण्यापूर्वी काही मिनीटे पाय बुडवून ठेवा. ज्यामुळे पायावरचे जीवजंतू कमी होतीलच शिवाय तुमच्या पायांना आरामही मिळेल. 
  • तुमच्या आहारात विशेष बदल करा. तुमच्या आहारातून सल्फरयुक्त पदार्थ कमी करा. या पदार्थांमुळे तुमच्या घामाला घाणेरडा वास येण्याची शक्यता असते.
  • झिंकयुक्त आणि आयुर्वेदिक घटक असलेल्या पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे आहारात याचा समावेश करा. 
  • दररोज पाय अॅक्टिबॅक्टेरिअल शॅंपूने पाय स्वच्छ करा. मात्र पाय धुतल्यावर ते स्वच्छ टॉवेलने पुसण्यास विसरू नका.
  • प्रत्येक दिवसासाठी नवे सॉक्स वापरा. चोविस तासांपेक्षा जास्त वेळ मोजे पायावर घालून ठेवू नका. जर कधी तशी वेळ आलीच तर  चोविस तासानंतर नवे सॉक्स वापरा.
  • शक्य असल्यास पायांमध्ये कॉटनचे सॉक्स वापरा. पॉलिस्टर अथवा इतर प्रकारच्या कापडातील सॉक्समुळे तुमच्या तळव्यातून येणारा घाम पुन्हा त्वचेत मुरतो. शिवाय तुमचे सॉक्स नियमित धुवा आणि निर्जंतूक करा.
  • तुमचे फूटवेअर अथवा शूज वरवचेवर बदला. जर तुम्ही आठवडाभर तुमचे शूज वापरले असतील तर ते विकऐंडला ते धुवा आणि निर्जंतूक करा.
  • झोपण्यापूर्वी पायांवर अॅंटिबायोटिक मलम लावा. हे मलम तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार विकत घ्या. 

 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज

थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल

पायावर पडल्या असतील भेगा तर होतील 4 दिवसात गायब, करा हे उपाय