दातांचे दुखणे काहीही केल्या टाळता येत नाही. दातदुखीचा त्रास एकदा सुरु झाला की, त्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. तुम्हालाही असा दात दुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. पण जर तुम्हाला डॉक्टरांकडे लगेचच जाणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन तात्पुरती दातदुखी थांबवू शकता. आज आपण दातदुखीवरील घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या शिवाय दात दुखीची कारणे, दात दुखणे उपाय या सगळ्यांची इत्यंभूत माहिती घेणार आहोत. मग करुया सुरुवात
तुम्हाला सतत दातदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला दात दुखीची कारणे देखील माहीत हवी. म्हणून दात दुखींच्या कारणांपासून सुरुवात करुया. म्हणजे तुम्हाला तुमच्या दात दुखीचे कारण कळायला मदत होईल.
तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का
तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण जर दातांमध्ये तसेच राहिले तर ते अन्न तिथेच कुजते.त्यामुळे तुमच्या दातांना कीड लागायला सुरुवात होते. दातांना कीड लागण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तुमच्या दातांना ती आतपर्यंत कोरत जाते. तुमचे दात सुरुवातीला खड्डे पडल्यासारखे वाटू लागतात. पण त्यानंतर त्यावर एक काळा थर साचत राहतो. म्हणूनच लहान मुलांचे दात किडल्यानंतर त्यांना तू चॉकलेट खातोस का? असे मुद्दाम विचारले जाते. मुळात दातांची कीड खोलपर्यंत गेल्यानंतर त्याचा रंग चॉकलेटी आणि मग काळा होऊ लागतो. कीड लागल्यानंतर तुमच्या दिसण्यातच नाही तर तुम्हाला दात दुखीचा त्रास देखील सुरु होतो.
अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे दुखतात. याचे कारण तुमच्या दातांचे नाजूक असणे. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमी असेल तर तुमचे दातांना सतत झिणझिण्या बसत राहतात. म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला त्रास होऊ लागतो. हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात.
दातांना धरुन ठेवणाऱ्या हिरड्या मजबूत राहणे फारच गरजेचे असते. अनेकांना हिरड्यांचा आजार असतो. हिरड्यांच्या आजारामध्ये तुम्हाला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. ज्यावेळी तुम्हाला हिरड्यांचा त्रास होऊ लागतो. त्यावेळी तुमच्या हिरड्या सुजायला लागतात. हिरड्यांना आलेली सूज पुढे जाऊन अनेक त्रासांचे कारण बनते. हिरड्या सैल पडल्यानंतर तुमच्या हिरड्यांमध्ये अन्न साचू लागते. त्यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरुवात होते. हिरड्यांच्या आजारांमध्ये प्रामुख्याने पायोरिया आणि प्लाक साचायला सुरुवात होते. हिरड्या सैल झाल्यानंतर तुमचे दात निखळण्याची देखील शक्यता असते.
हिरड्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रासही होऊ शकतो. तुमच्या हिरड्या स्वच्छ नसतील तर त्यामध्ये साचणारे अन्न कण तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरवात होते. हा पू जर खूप खोलपर्यंत साचला तर तुम्हाला दात दुखू लागतात. अनेकदा हिरड्यांमधून रक्तही येऊ लागते. हिरड्यांमधून रक्त येणे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या दात दुखीचे हे एक कारण असू शकते.
दात दुखी जर जास्त वाढली की ती तुमच्या जबड्यापर्यंत जाऊन पोहोचते. अनेकदा दात दुखीसोबत तुमचा जबडा दुखू लागतो. तुमच्या जबड्याला सूज येऊ लागते. जबड्यां ना सूज येणे दातांच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे जबड्यांच्या दुखण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. याचे विपरित परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.
दात दुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर आता आपण दात दुखणे घरगुती उपाय जाणून घेऊया. हे दात दुखणे उपाय आहेत जे तुम्हाला घरच्या घरी अगदी सहजपणे उपलब्ध होतील. मग जाणून घेऊयात दात दुखीवरील घरगुती उपाय
हल्ली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये टी बॅग मिळतात. जर तुमच्या दात दुखीमुळे तुमच्या जबड्याला सूज आली असेल तर तुम्ही पेपरमिंट टी बॅगचा उपयोग करु शकता. पेपरमिंट टी बॅगमुळे तुमच्या दातांचे दुखणे कमी होते. पेपरमिंटमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे तुमचे दात सुन्न पडतात. तुमच्या दातांचे दुखणे कमी होते. त्यामुळे जर तुमच्याकडे पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅग्स असतील तर त्या तुम्ही दाताखाली ठेवा.
दातदुखीवर रामबाण इलाजामध्ये अगदी हमखास नाव घेतेल जाते ते लवंगाचे. लवंग अनेक बाबतीत गुणकारी असते. पण दातासाठी लवंग अगदी हमखास खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की, लवंगामधील घटक तुमची दात दुखी शमवण्यास मदत करतता. शिवाय तुमच्या दातांना लागलेली कीड आणि जीवाणू नष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला दात दुखी झाली की लगेचच दाताखाली लवंग पकडा. तुम्हाला थोड्यावेळाने का होईना आराम मिळेल.
लसूणमध्ये एलिसीन नावाचे जे घटक असते ते तुमच्या दातांसाठी चांगले असते. तुमचे दात दुखत असतील तर तुम्ही कच्च्य्या लसणीच्या दोन -तीन पाकळ्या छान चावून खा. लसूणामधील रस तुमच्या दातांचे दुखणे थांबवण्यास मदत करतो आणि दातांमधील जंतू कमी करण्यास मदत करते.
गव्हांकुराचे फायदे भरपूर आहेत. उत्तम केसांसाठी आणि त्वचेसाठी गव्हांकुर चांगले आहे. तुमच्या दातांच्या आरोग्यासाठीही गव्हांकुर चांगले असते. गव्हांकुराचे सेवन तुम्ही अगदी कधीही करु शकता. यामुळे तुमचे दात मजबूत राहतात. तुमच्या दातांमधील जंतू आणि किटाणूंना मारण्यास मदत मिळते. दात दुखणे उपाय यांमध्ये हा चांगला उपाय आहे.
थाईम नावाची वनस्पती तुमच्या दातांसाठी फारच चांगली असते. तेल स्वरुपात ती उपलब्ध असते. हल्ली अनेक टुथपेस्टमध्ये थाईम असते. जर तुम्हाला दातदुखी होत असेल आणि तुमच्याकडे थाईमचे तेल असेल अशावेळी पाण्यामध्ये थोडेसे तेल घेऊन तुम्ही त्याच्या गुळण्या तुम्ही करु शकता.गुळण्या केल्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळतो.
केक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये वापरला जाणारे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट सुद्धा तुमच्या दातांसाठी चांगला आहे. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टमध्ये अल्कोहोल असते जे तुमच्या दातांचे दुखणे त्वरीत थांबवते. तुमच्या दातांना सुन्न करते .त्यामुळे तुम्हाला दात दुखी जाणवत नाही. कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही दुखणाऱ्या दातांमध्ये ठेवा तुम्हाला लगेचच आराम मिळेल.
अनेकदा दात दुखल्यानंतप मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितल्या जातात. मिठाच्या पाण्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो. तसेत मिठाच्या पाण्यामुळे तुमच्या दातांमधील जंतूचा नायनाट करण्यास मदत मिळते. (पण मिठाच्या पाण्याचा अति वापरही तुम्ही करणे चांगले नाही.)
दातांच्या दुखण्यावर हिंग हा देखील एक चांगला उपाय आहे. लिंबू पाणी तयार करुन त्यामध्ये थोडासा हिंग घालावा. कापसाने तुमच्या दातावर हिंग असलेला कापूस ठेवून तोंड बंद करुन 5 ते 10 मिनिटं बसावे लहेत आराम मिळतो.
दात दुखीचा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापरही करु शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात तुम्ही दोन मोठे चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन त्यात त्या दुप्पट पाणी घ्या. या पाण्याच्या फक्त गुळण्या तुम्हाला करायच्या आहेत. तुमच्या दातांचे दुखणे कमी होईल ( असे करताना तुम्ही चुकूनही हायड्रोजन पेरॉक्साईड गिळू नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.)
जर तुमच्या जबड्याला सूज आली असेल तर आराम मिळण्यासाठी तुम्ही बर्फाचा उपयोगही करु शकता. एका जाड कपड्यामध्ये बर्फाचे तुकडे घेऊन, त्यात मीठ घाला आणि त्याचा शेक तुमच्या जबड्याला द्या. तुमची दात दुखी थोड्या वेळासाठी का होईना थोडी कमी होईल.
दात दुखीवर अनेक घरगुती उपाय आहेत. तात्पुरत्या स्वरुपात तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही नैसर्गिक पेनकिलर्स घेऊन घरगुती उपाय करु शकता. पण जर तुम्ही पेनकिलरचा विचार करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेनकिलर घेऊ नका. कारण तुमचे वय, लिंग आणि तुमचा आजार यावर आधारीत तुम्हाला पेनकिलरचा डोस दिला जातो. त्यामुळे दात दुखत असल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच तुम्ही पेनकिलर घ्या.
केवळ दातांसाठीच नाही तर टूथपेस्टच्या वापराने होते ‘या’ गोष्टींवरही कमाल
दात दुखीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्याचा त्रास चिरंतर काळासाठी होऊ शकतो. एखाद्यावेळी तुम्हाला तुमची दात दुखी थांबल्यासारखी वाटेल पण लक्षात ठेवा ती क्षणिक असेल. तुम्ही दात दुखी कमी करण्यासाठी कितीही घरगुती उपाय केले तर देखील त्याचा त्रास जाणून घेणे फारच गरजेचे असते. म्हणूनच तुमची दात दुखी किती काळ राहते यापेक्षाही तुम्ही त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
तुम्हाला दातांचे दुखणे अगदी पटकन कमी करायचे असतील तर तुम्ही दाताखाली लवंग ठेवा. लवंगाच्या चावण्यामुळे तुमची दात दुखी कमी होते. फार पूर्वीपासूनच दात दुखीवर लवंग किंवा लवंगाचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला जर पटकन आराम हवा असेल तर तुम्ही दाताखाली लवंग घ्यायाला विसरु नका.
आाता जर तुम्हाला दात दुखी होत असेल तर हे घरगुती उपाय करुन पाहा. पण योग्यवेळी डॉक्टरांकडे जायला विसरु नका.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/