ADVERTISEMENT
home / Fitness
वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय

वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय

कित्येक जण वजन घटवण्यासाठी जीममध्ये तास-न्-तास घाम गाळत असतात तर काही जणांना आपलं बारीक शरीर अजिबात पसंत नसतं. शरीरानं अगदीच बारीक असणारी मंडळी वजन वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे उपाय करून पाहतात. पण वजन जैसे थेच राहतं. सर्व उपाय करून थकल्यानंतर ही मंडळ घरगुती उपचार पद्धतींकडे वळतात. शरीराचं वजन वाढत नसल्यानं काही जण एवढे हैराण होतात की, अखेर आयुर्वेदिक औषधांचा आधार घेतात. तर काही जण वजन वाढीस उपयुक्त अशा व्यायामासंदर्भात माहिती शोधतात. तुम्ही देखील वजन कमी असल्यानं त्रस्त असाल तर चिंता करू नका. वजन वाढीसाठी कोणते  उपाय आहेत? वजन वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे? याची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. तुमच्या खिशाला परवडतील, महत्त्वाचे म्हणजे शरीरास पोषक घटक घरातच सापडतील याची काळजी आम्ही घेतली आहे.  

वजन वाढवण्यासाठी खालील नमूद करण्यात आलेल्या गोष्टींचं करा सेवन

1. जीरे  

ADVERTISEMENT

जीरे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहज सापडणारे साहित्य आहे. जीरे हे गरम मसाल्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. डाळ, भाजी इत्यादी अन्नपदार्थ शिजवताना फोडणीसाठी वापर केला जातो. स्वादाव्यतिरिक्त जिऱ्याचा वैद्यकीय दृष्टीनंही वापर केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी जीरे फायदेशीर आहे. जिऱ्याच्या सेवनामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि भूक देखील वाढते.

वाचा : सावधान ! ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

2. शतावरी  

कित्येक स्त्रीरोगविषयक आजारांमधून सुटका मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून शतावरी कल्पचा वापर केला जातो. शतावरीमुळे वजन वाढवण्यास मदत होते. ही औषधी वनस्पती भूक वाढवते. सोबत याच्या सेवनामुळे थकवा आणि तणाव देखील दूर होतो. 

ADVERTISEMENT

3. बडीशेप 

बडीशेपमध्ये भूक वाढवण्यास उपयुक्त अशा गुणधर्माचा समावेश आहे. बडीशेपमुळे अ‍ॅनोरेक्सिया (Anorexia) म्हणजे भूक न लागण्याची समस्या देखील दूर होते. महत्त्वाचे बडीशेपमुळे भूक देखील वाढण्यास मदत होते. तुम्ही बडीशेपचा जेवणातही वापर करू शकता किंवा केवळ चावून देखील खाऊ शकता.  

4. पांढरी मुसळी  

पांढरी मुसळी शारीरिक शक्ती वाढवण्याचं कार्य करते. पांढऱ्या मुसळीच्या सेवनामुळे  शारीरिक थकवा कमी होण्यास मदत होते. स्नायू देखील बळकट होतात. तणाव आणि उदासीनता कमी करण्यासाठी पांढरी मुसळी रामबाण उपाय आहे. तणाव कमी झाल्यानं भूक वाढते. 

ADVERTISEMENT

या घरगुती उपचारांमुळे तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल. पण वजन वाढीचे उपाय करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT

You Might Like This:

जाणून घ्या झटपट वजन वाढवण्यासाठी काय खावे

वजन वाढत नसेल तर घ्या व्यायामाचा आधार, वापरा ट्रिक्स

सुके जर्दाळू वजन वाढवण्यासाठी फळं

ADVERTISEMENT
06 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT