10 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला शेअर मार्केटमुळे होऊ शकतो फायदा

10 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला शेअर मार्केटमुळे होऊ शकतो फायदा

मेष : वृद्धांचं आरोग्य अचानक बिघडू शकते
एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडू शकते. जोखीम असलेल्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. व्यावसायिक भागीदारी लाभदायक ठरू शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

कुंभ : जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता
जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांना दिलेलं वचन पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. वाहन चालवनाता सावधगिरी बाळगा. धार्मिक कामांमध्ये श्रद्धा वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढेल.

मीन : शेअर मार्केटमुळे फायदा होऊ शकतो
शेअर मार्केटसंबंधित लोकांचा फायदा होऊ शकतो. कुटुंबासाठी महागड्या वस्तूची खरेदी करू शकता. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल. प्रियकरासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ : प्रेम यशस्वी होण्याची शक्यता
प्रेम प्रकरणात सफलता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. पैशांचं बचत करण्याची योजना यशस्वी होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यामुळे व्यवसायात यश मिळेल.

मिथुन : अभ्यासावरून मन भरकटू शकते
विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. मानसिक तणावापासून दूर राहा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कर्क : मालमत्ता खरेदी करण्याची योजना
घर किंवा जमीन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची योजना आखली जाऊ शकते. रखडलेल्या कार्यांना गती मिळेल. जोडीदारासोबत परदेश यात्रेचा योग आहे. आरोग्य ठीक राहील.

सिंह : कार्यशैलीमुळे वरिष्ठ नाराज होऊ शकतात
कार्यशैलीमुळे वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. वादांपासून दूर राहा. सामाजिक कामांमध्ये सक्रियता वाढू शकते. प्रियकरासोबत फिरण्यात दिवस खर्च होऊ शकतो.

कन्या : गुडघे दुखीमुळे त्रस्त होऊ शकता
गुडघे किंवा पायांच्या दुखण्यामुळे त्रस्त होऊ शकता. सहकर्मचारी तुमच्या निर्णयाविरोधात आव्हान उभे करू शकतात. मित्रांसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल. रखडलेली महत्त्वपूर्ण कामे सहजरित्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : रोमान्ससाठी चांगला दिवस
रोमान्ससाठी आजचा दिवस चांगला राहील. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन संपर्क निर्माण होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता
मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. हट्टातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. आईवडिलांचं सहकार्य मिळेल.

धनु : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
निश्चित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. आत्मविश्वास कमी होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : आजारात लवकर सुधारणा होईल
जुन्या आजारातून प्रकृती लवकर बरी होण्याची शक्यता आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील. व्यावसायिक यात्रेची शक्यता आहे. मित्रांसोबत झालेल्या भेटीगाठींमुळे आनंद मिळेल.