11 जानेवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीनं नव्या कामास सुरुवात करू नये

11 जानेवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीनं नव्या कामास सुरुवात करू नये

मेष : कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. पैशांसंबंधी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल लक्ष द्या.

कुंभ : आरोग्य ठीक राहील
शारीरिक आरोग्य ठीक राहील. काही नवीन करण्यासाठी उत्साहित असाल. परदेशातून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. नवीन साथीदारासोबत भेटीची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे.

मीन : प्रेम संबंधांमध्ये तणाव
प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रेची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदारी वाढू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. भौतिक साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभाचा योग आहे.

वृषभ : वृद्धांची प्रकृती खराब होऊ शकते
वयोवृद्धांचं आरोग्य अचानक खराब होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. नवीन मित्र भेटण्याचा योग आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : कौटुंबिक गैरसमज दूर होतील
कौटुंबिक गैरसमज दूर होतील. मित्रमैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्तींसोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळेल. एखाद्या मालमत्तेद्वारे धन लाभ होईल. राजकारणात लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : नवीन काम सुरू करू नका
आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणं टाळा. मार्केटिंगसंबंधित लोकांना अधिक मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. आनंदाची बातमी मिळण्याचा योग आहे.

सिंह : अचानक धनलाभाचा योग
निश्चित करण्यात आलेल्या बजेटमध्ये घराचा शोध पूर्ण होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता. राजकारणात आवड वाढू शकते. प्रियकरासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात
विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होण्याची शक्यता आहे. परस्पर संवादातील कमतरतेमुळे व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. निरर्थक खर्चावर नियंत्रण आणा. कायदेशीर प्रकरणे मार्गी लागतील. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर असतील.

तूळ : मुलाची प्रकृती खराब होऊ शकते
मुलाची प्रकृती अचानक खराब होऊ शकते. व्यावसायिक भागीदारीत सावधगिरी बाळगा. सहकर्मचाऱ्यासोबत वाद करणं टाळा. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळू शकतील. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते.

वृश्चिक : कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होईल
कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते. व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचं सहकार्य मिळेल. नवीन कार्याची सुरुवात होण्याची शक्यता. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. यात्रेचा योग आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहील.

धनु : विद्यार्थ्यांना कष्टाचं फळ मिळेल
मनासारखे काम करताना यश मिळेल. विद्यार्थ्यांना कष्टाचं चांगलं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर : महागड्या वस्तूचं नुकसान होण्याची शक्यता
आज एखाद्या महागड्या वस्तूचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. व्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सतर्क राहा. अपत्याचं सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये आवड निर्माण होईल.