12 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला प्रॉपर्टीचा हक्क मिळण्याची शक्यता

12 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीला प्रॉपर्टीचा हक्क मिळण्याची शक्यता

मेष : कुटुंबात असंतोषाची परिस्थिती
कामाच्या ठिकाण वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात असंतोषाची परिस्थिती असेल. मित्रांचं सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य ठीक राहील.

कुंभ : आर्थिक स्थिती बिघडू शकते
अति खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. कर्ज घेणे टाळा. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळेल. व्यवहाराच्या प्रकरणात सतर्कता बाळगा. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन : प्रकृती सुधारण्याची शक्यता
दिनक्रमात बदल केल्यास बिघडलेल्या प्रकृतीत सुधारणा होईल. जवळच्या व्यक्तीसोबत भ्रमंतीचा योग आहे. घरगुती कार्यांमध्ये व्यस्तता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

वृषभ : प्रॉपर्टीचा हक्क मिळण्याची शक्यता
एखाद्या प्रॉपर्टीचे मालकी हक्क मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रा फायदेशीर ठरेल. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. परदेश यात्रेचा योग आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर राहतील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : जोडीदाराची प्रकृती खराब होईल
जोडीदाराची प्रकृती अचानक खराब होऊ शकते. दिनक्रमाची काळजी घ्या. व्यावसायिक योजना यशस्वी होण्याचा योग आहे. कायदेशीर प्रकरणात तुमचा पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवास करणं टाळा.

कर्क : मैत्रीचं प्रेमसंबंधात रुपांतर होईल
जुन्या मैत्रीचं प्रेम संबंधात बदल होण्याची शक्यता आहे. भावाच्या सहकार्यामुळे व्यावसायिक विस्तार होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचा योग आहे. सामाजिक कामांमध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे.

सिंह : अभ्यासात अडचण येण्याची शक्यता
लवकर काम आटोपण्याच्या नादात चूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. जुन्या मित्रांसोबत झालेली भेट सुखदायक असेल. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : व्यावसायिक नफ्यामुळे उत्साहित असाल
व्यावसायिक नफा वाढल्यानं तुम्ही उत्साहित असाल. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक यात्रा होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरपासून दूर जावं लागू शकतं. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे.

तूळ : विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटेल
विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर राहा. नव्या घराचा शोध पूर्ण होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढू शकते.

वृश्चिक : तणाव वाढण्याची शक्यता
मुलाच्या करिअरच्या चिंतेमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न-खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक यात्रा फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : खास व्यक्तीसोबत कॉफी डेट
आज खास व्यक्तीसोबत तुम्ही कॉफी पिण्याची मजा घ्याल. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल.

मकर : मनासारखे काम मिळण्याचा योग
मनासारखे काम मिळण्याचा योग आहे. वरिष्ठ तुमच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊ शकतात. सकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये सहकार्य करतील. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. नियमित व्यायामामुळे आरोग्य ठीक राहील.