13 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीला भाग्योदयाच्या संधी मिळतील

13 जानेवारी 2020चं राशीफळ, कुंभ राशीला भाग्योदयाच्या संधी मिळतील

मेष : उत्साही वाटेल
आज तुम्हाला फिट आणि उत्साही वाटेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. जोडीदारासोबतचा प्रवास रोमांचक असेल. करियरच्या बाबतीत तरुण एखाद्या नव्या क्षेत्रात प्रयत्न करू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

कुंभ : भाग्योदयाच्या नव्या संधी मिळतील
विद्यार्थ्यांना भाग्योदयाच्या नवीन संधी मिळतील. राजकारणात मोठी यश मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीच्या संधी मिळतील. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. प्रॉपर्टीचे करार करताना घाई करू नका

मीन : आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता
आज निष्कळ खर्च होऊ शकतात. नवे काम सुरू करण्याची योजना सध्या रद्द करा.
आर्थिक स्थितीत बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आनंदाची बातमी मिळू शकते.

वृषभ : वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता
मुलांच्या संगतीसंदर्भात तुम्ही चिंतीत राहाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधीच्या अडचणी दूर होतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता. कायदेशीर प्रकरणांमध्ये धावपळ होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळण्याची शक्यता
नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्नाचे अन्य स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीचं काम करू शकता. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आपला मुद्दा ठामपणे मांडा.

कर्क : वृद्धांचे आरोग्य बिघडू शकते
वृद्धांचं आरोग्य अचानक बिघडू शकते. आर्थिक स्थिती भक्कम राहील. करिअरसंदर्भात तरुण वर्ग योजना आखू शकतात. राजकारणात जबाबदारी वाढू शकते. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.

सिंह : वाद मिटण्याची शक्यता
जोडीदार तुमच्यासाठी काही खास योजना आखू शकतो. मालमत्तेसंबंधी वाद मिटण्याची शक्यता आहे. कार्यशैलीमुळे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल. नवे मित्र होऊ शकतात.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पैशांसंदर्भातील समस्या दूर होण्याची शक्यता आहे. प्रियकरासोबत लाँग ड्राईव्हवर जाऊ शकता. आत्मविश्वासात वाढ होईल.

तूळ : घर/जमीन खरेदीची योजना
नवे घर किंवा जमीन खरेदीची योजना आखली जाऊ शकते. जोडीदारासोबत खरेदीमध्ये व्यस्त राहाल. व्यवसायात राजकीय सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांमध्ये व्यस्त राहू शकता.

वृश्चिक : चांगल्या संधी गमावण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावू शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. धार्मिक कामांमध्ये आवड निर्माण होऊ शकते. प्रेमामध्ये त्रिकोणाची स्थिती निर्माण होऊ शकते.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : आरोग्य खराब होऊ शकते
जंक फूड खाणे टाळा. आरोग्य खराब होऊ शकते. भावनांवर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांकडून मदत घेण्यात यश मिळेल. व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त राहाल. दुरावलेल्या मित्रांची अचानक भेट होण्याची शक्यता आहे.

मकर : कौटुंबिक सहकार्य मिळेल
संकटांच्या वेळी कुटुंबाचं सहकार्य मिळेल. प्रॉपर्टी संबंधित एखादं प्रकरण सहज मिटण्याची शक्यता आहे. सामाजिक उत्सवात जोडीदारासोबत सहभाग व्हाल. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढण्याची शक्यता आहे.