14 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता

14 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता

मेष : मौल्यवान वस्तूचे नुकसान होण्याची शक्यता
मौल्यावान वस्तू तुटण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.मोठी सामाजिक जबाबदारी मिळू शकते. मनाविरोधात प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ : जुन्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर
जुन्या मैत्रींचं नवीन प्रेमात बदल होण्याची शक्यता आहे. सामाजिक संपर्क वाढेल. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. वरिष्ठ कार्यशैलीमुळे प्रभावित होतील. प्रियकरासोबत भ्रमंतीचा योग आहे.

मीन : पदोन्नतीची शक्यता
व्यावसायिक प्रकरणात आज नशीब साथ देईल. महत्त्वपूर्ण योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्न्ती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमुळे प्रसिद्धी मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल.

वृषभ : आरोग्यात सुधारणा
आरोग्य सुधारल्यानं दिलासा मिळेल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी यात्रा करण्याचा योग आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : प्रियकरासोबत मतभेद वाढण्याची शक्यता
प्रियकरासोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. व्यावसायिक भागीदारीमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते. सध्या प्रवास करणे टाळा.

कर्क : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता
अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचा योग आहे. नव्या व्यवसायाच्या योजना आखल्या जाऊ शकतात. जोडीदारासोबत परदेशवारी करण्याचा योग आहे. मित्रांच्या मदतीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.

सिंह : तणाव वाढू शकतो
आज काही न कारात्मक विचारांमुळे तणाव वाढू शकतो. रचनात्मक कामांमुळे मन उत्साहित राहील. व्यवसायात नव्या योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : परस्पर नात्यांमध्ये गोडवा येईल
परस्पर नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. मुलाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील. कामाच्या ठिकाणी महिला अधिकाऱ्याचं सहकार्य मिळेल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे.

तूळ : विद्यार्थ्यांना अधिक कष्ट करण्याची गरज
विद्यार्थ्यांना शिक्षण स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक प्रकरणांमध्ये प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. जोडीदाराचं भावनिक सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

वृश्चिक : जंगम व स्थावर मालमत्तेत होईल वाढ
जंगम व स्थावर मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. कुटुंबात मौज-मस्तीचे वातावरण राहील. एखाद्या मोठ्या कामाची योजना आखण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : पदोन्नतीची संधी रोखली जाईल
कामाच्या ठिकाणी भूतकाळातील चूक नुकसानकारक ठरेल. पदोन्नतीची संधी रोखली जाईल. वादापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना शिक्षणसंबंधी समस्यांमुळे तणाव येऊ शकतो. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

मकर : गुडघे किंवा पाय दुखीमुळे त्रस्त
गुडघे किंवा पाय दुखीमुळे तुम्ही हैराण होऊ शकता. मुलाच्या भविष्याची चिंता सतावू शकते. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.