15 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीचा नोकरीचा शोध पूर्ण होईल

15 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीचा नोकरीचा शोध पूर्ण होईल

मेष : नोकरीचा शोध पूर्ण होईल
ध्येय गाठण्यात विद्यार्थी यशस्वी होतील. इच्छित नोकरीचा शोध आज पूर्ण होईल. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. जिद्दीनं घेतलेले निर्णय बदलावे लागतील.

कुंभ : धावपळीनं त्रस्त व्हाल
निरर्थक धावपळीमुळे तुम्ही त्रस्त असाल. मानसिक गुंतागुंत झाल्यामुळे तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. रखडलेली कामे पूर्ण केली जातील. सामाजिक आदर आणि संपत्ती वाढेल.

मीन : प्रेम भावनेची जाणीव होईल
एखाद्याप्रति प्रेमभावना जागृत होईल. कुटुंबातील छोट्या-छोट्या गोष्टींचे वाईट मानू नका. राजकारणातील सक्रियता वाढेल. प्रवासाचा योग आहे.

वृषभ : व्यवसायात करार रद्द होण्याची शक्यता
व्यवसायात करार रद्द होण्याची शक्यता आहे. अधिक खर्च होईल. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल. आरोग्य ठीक राहील.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : नवी ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल
आज आरोग्य ठीक राहील. नवी ऊर्जा आणि उत्साह अनुभवण्याची शक्यता. अचानक आनंदाची बातमी मिळाल्यानं मन प्रसन्न होईल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे.

कर्क : भावाकडून भावनिक त्रास होण्याची भीती
भावाकडून भावनिक त्रास होण्याची भीती आहे. गुंतागुंतीच्या गोष्टींमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदाराकडून विश्वासघात होण्याची शक्यता. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

सिंह : मोठे व्यावसायिक करार मिळण्याची शक्यता
व्यवसायात मोठे करार मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अन्य साधन मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-सोयींच्या साधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक वातावरण मौजमजेचे राहील. मित्रांसोबत पिकनिकचे आयोजन केले जाऊ शकते.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : आजार वाढू शकतो
आरोग्यासाठी वाईट सवयींचा त्याग करा. आजार वाढू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. व्यवसायात अधिक लाभ होण्याचा योग आहे. धार्मिक कार्यांमध्ये मन लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

तूळ : नव्या संबंधांप्रति तीव्र ओढ जाणवेल
नव्या संबंधांप्रति तीव्र ओढ जाणवू शकते. जुनी कौटुंबिक समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. सामाजिक समारंभात सक्रियता वाढू शकते. वेतनवृद्धीची शक्यता आहे. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : राजकारणात अडचणी येतील
करियरमध्ये चढउतार आल्यानं तणाव वाढू शकतो. कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगा. व्यावसायिक यात्रेची शक्यता आहे. राजकारणात अडचणी येण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : महागडी भेटवस्तू किंवा धनलाभाची शक्यता
सासरहून महागडी भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती शक्यता आहे. अडकलेले महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याप्रति सतर्क राहा.

मकर : पूर्ण लाभ मिळणं कठीण
व्यवसायात कष्ट केल्यानंतरही पूर्ण लाभ मिळणं कठीण आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण स्पर्धापरीक्षेत निष्काळजीपणा करू नये. आईवडिलांचं भावनिक सहकार्य मिळेल. कायदेशीर प्रकरणांतून दिलासा मिळू शकतो.