16 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीचा नोकरीचा शोध पूर्ण होण्याचा योग | POPxo

16 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीचा नोकरीचा शोध पूर्ण होण्याचा योग

16 जानेवारी 2020चं राशीफळ, वृषभ राशीचा नोकरीचा शोध पूर्ण होण्याचा योग

मेष : प्रेम संबंध सुधारण्याची शक्यता
बिघडलेल्या प्रेम संबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळाल्यानं मनोधैर्य वाढेल. आईवडिलांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यालयीन आयुष्यात गती येण्याची शक्यता आहे.

कुंभ : वरिष्ठांसोबत तणाव वाढण्याची शक्यता
किरकोळ कारणामुळे वरिष्ठांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. जोखीम स्वीकारण्यास तयार राहा. प्रतिस्पर्धी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक स्थिती भक्कम होण्याचा योग आहे.

मीन : आजारामुळे असाल हैराण
ऋतुनुसार होणाऱ्या आजारामुळे तुम्ही त्रस्त असाल. खाणेपिणे आणि नियमित दिनक्रमावर लक्ष द्या. व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण होण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यवहाराच्या कामात सावधगिरी बाळगा.

वृषभ : नोकरीचा शोध पूर्ण होण्याचा योग
इच्छित नोकरी शोधण्यात पूर्ण यश मिळेल. महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाल्यानं आत्मविश्वास वाढेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. सन्मान आणि धनसंपदेत वाढ होण्याची शक्यता आहे. तणाव दूर होईल.

मिथुन : मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. पैशांसंदर्भात अडचणी येऊ शकतात. कर्ज घेणे टाळा. जोडीदाराच्या भावनांची विशेष काळजी घ्या. धार्मिक कार्यात आवड निर्माण होण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कर्क : प्रकृतीत सुधारणा होऊ शकते
दीर्घ आजारानंतर प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. फिटनेसवर लक्ष देणे गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह : मित्रांकडून उपेक्षा होऊ शकते
नातेवाईक आणि मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. तुमची उपेक्षा होऊ शकते. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागतील. कामाच्या ठिकाणी मनमौजी व्यवहारामुळे सहकारी त्रस्त होऊ शकतात. आरोग्याप्रति सतर्क राहा.

कन्या : धन लाभाची शक्यता
अचानक धनलाभाची शक्यता आहे. जंगम-स्थावर संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आत्मविश्वासात वाढ होईल. सामाजिक कार्यात आवड वाढेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

तूळ : अस्वस्थ वाटू शकते
आज तुम्हाला अस्वस्थ आणि थकावा जाणवू शकतो. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. वादग्रस्त प्रकरणं संवादामुळे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य तुमच्यासोबत असेल.

वृश्चिक : प्रियकरासोबत प्रवासाचा योग
खासगी संबंध दृढ होतील. प्रियकरासोबत प्रवास करणं रोमांचक असेल. साहित्य अथवा संगीतात आवड वाढेल. परेदश प्रवास होण्याचा योग आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होऊ शकते.

धनु : नवीन काम सुरू नका
आज नवीन कामे सुरू करणं टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे त्रस्त होऊ शकता. नातेवाईकांच्या सहकार्यामुळे किचकट कामे पूर्ण होतील. विश्वासघात करणाऱ्यांपासून सावध राहा. कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : पगार वाढीची शक्यता
कामाच्या ठिकाणी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत देखील वाढू शकतात. रखडलेल्या योजनांमध्ये गती येण्याची शक्यता आहे. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील. मानसिक शांती मिळेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.