17 जानेवारी 2020चं राशीफळ, मिथुन राशीचा व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता

17 जानेवारी 2020चं राशीफळ, मिथुन राशीचा व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता

मेष : चिडचिड आणि त्रास होऊ शकतो
स्वभाव चिडचिडा होऊ शकतो आणि यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात.

कुंभ : धन प्राप्तीसाठी नवे स्रोत मिळण्याची शक्यता
धन प्राप्तीसाठी नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहील. आजारामुळे अस्वस्थ असाल. खातापिताना सावधगिरी बाळगा.

मीन : विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटेल
विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून मन भरकटण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराचं सहकार्य आणि सहवास लाभेल. अचानक धन लाभ होण्याचा योग आहे.

वृषभ : जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर होतील
जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर होतील. अपत्य प्राप्तीची योजना आखली जाऊ शकते. प्रॉपर्टी संबंधी प्रकरण मार्गी लागतील. व्यावसायिक भागीदारीमुळे फायदा होऊ शकतो. परदेश यात्रेसाठी निमंत्रण मिळू शकते.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : व्यावसायिक विस्ताराची शक्यता
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमच्या योजनांनुसार कार्य संपन्न होऊ शकतात. नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कर्क : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
महत्त्वपूर्ण कामे आळसामुळे टाळू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकते. कौटुंबिक अडचणी दूर होतील. घरात एखादे मंगल कार्य संपन्न होऊ शकते.

सिंह :जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल
जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रमात बदल आणा. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. आर्थिक प्रगतीचे योग आहेत. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदीत असेल. जुन्या मित्रांची भेट होईल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो
जोडीदारासोबत तणााव वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होऊ शकतो. आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा दाखवू नका.

तूळ : संपत्ती खरेदीची योजना
जंगम किंवा स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. व्यावसायिक परदेशी यात्रेचा योग आहे. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक : प्रकृती बिघडण्याची शक्यता
कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. औषध आणि आरोग्यावर अधिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती समाधानकारक असेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.

धनु : नवे प्रेमसंबंध होतील निर्माण
नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात. विरोधकांना आपलं म्हणणं पटवून देण्यास यश मिळेल. व्यवसायात रखडलेल्या योजना सुरू होऊ शकतात. नोकरीत सहकर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : चांगल्या संधी हातातून निसण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्ताराची योजना अचानक रोखली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून ताणतणाव मिळण्याची शक्यता. एखाद्या ठिकाणाहून आनंदाची बातमी मिळण्याचा योग आहे.