18 जानेवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

18 जानेवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

मेष : व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती
आज तुमच्या अधिक उतावळेपणामुळे कामाच्या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उताराची स्थिती येईल. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये आवड वाढू शकते.

कुंभ : व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी नवीन तंत्र आत्मसात केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर असतील. आरोग्याच्या कारणामुळे अस्वस्थ होऊ शकता. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा.

मीन : कौटुंबिक संपत्ती मिळू शकते
कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नवीन करारामुळे व्यवसायात लाभ होऊ शकतो. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर असतील. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे.

वृषभ : वृद्धाची प्रकृती बिघडू शकते
घरातील एखाद्या वयोवृद्धाची प्रकृती अचानक बिघडू शकते. सध्या लांबचा प्रवास करणे टाळा. सामाजिक कामांमध्ये आपली आवड निर्माण होईल. कोणत्याही प्रकारच्या वादांपासून दूर राहा. व्यवसायात नवीन संबंध विचारपूर्वक स्थापित करा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : नवे प्रेम संबंध निर्माण होतील
नवे प्रेम संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांचं प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल. कौटुंबिक संपत्तीसंबंधी समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. आवडत्या कामांमध्ये यश मिळाल्यानं मन आनंदीत असेल. आरोग्य ठीक राहील.

कर्क : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याी शक्यता आहे. व्यावसायिक करार पक्का होऊ शकतो. नोकरीत पदोन्नतीसह परिवर्तनाचीही शक्यता आहे. नवे वाहन खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते.

सिंह : व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता
आज कामामध्ये सावधगिरी बाळगा. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. धन संबंधी सर्व प्रकरणांमध्ये सतर्क राहा. प्रतिस्पर्धी पद आणि प्रतिष्ठेस नुकसान पोहोचवू शकतात. वादांपासून दूर राहा. कुटुंबीयांसोबत आनंदी क्षण व्यतित कराल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : आरोग्य सुधारेल
दीर्घ आजारानंतर आरोग्यात सुधारणा होईल. नियमित दिनक्रम पाळा. व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. मित्रांसोबत सुखद भेटीगाठी होतील. सामाजिक सन्मानावर परिणाम होईल,असे कोणतेही काम करू नका.

तूळ : प्रेम व्यक्त करू नका
सध्या आवडत्या व्यक्तीकडे स्वतःचं प्रेम व्यक्त करू नका. एकमेकांना आणखी वेळ द्या. जोडीदारासोब मतभेदद वाढण्याची शक्यता आहे. नवीन कार्य करणं टाळा. रचनात्मक कामांमध्ये मन रमेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.

वृश्चिक : एखादं नवे काम सुरू करू शकता
एखादं नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. प्रॉपर्टी खरेदीची योजना आखली जाऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : डोके दुखीमुळे हैराण व्हाल
डोळे किंवा डोके दुखीमुळे अस्वस्थ होऊ शकता. जोडीदारासोबत एकांताचे क्षण व्यतित कराल. नातेसंबंध दृढ होतील. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. कठीण कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात वाढणाऱ्या व्यस्ततेमुळे गोंधळून जाऊ नका.

मकर : जुन्या संपर्कांमुळे होईल फायदा
जुन्या संपर्कांमुळे फायदा होण्याची शक्यता. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल. विवादित प्रकरण सोडवण्यास यश मिळेल. व्यावसायिक भागीदारीमुळे फायदा होईल.